करिअरनामा ऑनलाईन । मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा (Radhika Merchant) राधिका मर्चंटशी साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला आहे. आता हे दोघे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. राधिक मर्चंटला यापूर्वीही अनंत अंबानींसोबत अनेकदा पाहिले गेले आहे. साखरपुड्याचा सोहळा पर पडल्यापासून राधिका मर्चंट सोशल मिडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राधिका मर्चंट कोण आहे? तिने कुठे आणि किती शिक्षण घेतले? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची कन्या (Radhika Merchant)
राधिका मर्चंट ही एक भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे. आणि ती तिच्या पालकांसह एन्कोर हेल्थकेअर या फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालक मंडळाचा एक भाग आहे. ती वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ असलेले त्यांचे वडील भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आहेत.
या शाळेत शिकली
मर्चंट कुटुंब हे मूळचे गुजरातमधील कच्छ येथील आहे. राधिका मर्चंटचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन (Radhika Merchant) कॉनन स्कूलमधून तिने सुरुवातीचे शिक्षण घेतले. यासोबतच बीडी सोमनी इंटरनॅशनल स्कूलमधून आयबी डिप्लोमा पूर्ण केला. यानंतर राधिकाने न्यूयॉर्क विश्वविद्यालयातून राजकारण आणि अर्थशास्त्रामध्ये डिग्री पूर्ण केली आहे.
राधिका आहे भरतनाट्यम् नृत्यांगना
राधिकाने आठ वर्षे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे आणि ती श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांची शिष्या आहेत. तिचा पहिला ऑन-स्टेज डान्स (Radhika Merchant) परफॉर्मन्स 5 जून रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये पाहायला मिळाला. अंबानींची सून राधिका मर्चंट प्राण्यांच्या कल्याणासाठी देखील काम करते.
आमिर खान, सलमान खान, रणवीर सिंग, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांची दोन मुले आदित्य आणि तेजस ठाकरे (Radhika Merchant) यांच्यासह अनेक राजकीय आणि बॉलिवूडच्या दिग्गजांनी राधिका आणि अनंत यांच्या रोका सोहळ्याला हजेरी लावली होती.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com