करिअरनामा ऑनलाईन । भारतीय बहुराष्ट्रीय शैक्षणिक (PW Recruitment 2023) तंत्रज्ञान कंपनी म्हणजेच PhysicsWallah Private Limited येथे नोकरीची संधी निर्माण झाली आहे. कॉन्टेंट रिव्यूवर पदासाठी या कंपनीत भरती होणार आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना ज्यूडिशिएरी कॉन्टेंट रिव्यूचे काम करावे लागणार आहे.
‘PhysicsWallah Private Limited’ म्हणजेच ‘PW’ म्हणून ओळखली जाणारी ही एक भारतीय बहुराष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी आहे. हे एक भारतातील सर्वोच्च ऑनलाइन एड-टेक प्लॅटफॉर्म आहे. याचे मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश येथे आहे. २०२० मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे जून २०२२ मध्ये १.१ अब्ज डॉलरच्या मुल्यांकनात $१०० दशलक्ष उभारल्यानंतर ती युनिकॉर्न कंपनी असणार आहे.
असं आहे कामाचं स्वरुप –
Judiciary Content Reviewer पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराला प्रश्नावली (Question Bank), पुस्तके किंवा विविध चाचण्यांसाठी कॉन्टेंट तयार करण्याची आणि रिव्यूची महत्त्वाची जबाबदारी कॉन्टेंट रिव्यूवरची असेल.
शिवाय, या पदावर असताना, उमेदवारावर निर्मिती आणि गुणवत्ता तपासणी या जबाबदऱ्या असतील.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PW Recruitment 2023)
1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा.
2. न्यायिक सेवा परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
आवश्यक अनुभव –
कॉन्टेंट क्रिएशन किंवा रिव्यूचा (पुनरावलोकनाचा) किमान १ ते ५ वर्षांचा अनुभव असावा.
नोकरीचे ठिकाण – नोएडा, उत्तर प्रदेश
उमेदवराकडे आवश्यक कौशल्ये –
1. ज्यूडिशिएरीच्या सर्व विषयांचे चांगले वैचारिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
2. विविध प्रश्न तयार करणे (PW Recruitment 2023) आणि समजण्यास सोप्या भाषेत त्याचे समाधान तयार करणे.
3. चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.
4. Google डॉक्सवर काम करणे सोयीस्कर असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
या कामासाठी ३.५ लाख ते ६ लाख रुपये पगार असू शकतो.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://www.pw.live/
Content Reviewer पदावर अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com