करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ८ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष पूर्व विद्यार्थ्यांच्या विषय राहिलेल्या (बॅकलॉग) आणि श्रेणी सुधार परीक्षा या ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी; तसेच परीक्षांचा ऑनलाइन दर्जा वाढविण्यासाठी चांगला निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांवर विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे श्रेणीसुधार आणि विषय राहिलेल्या (बॅकलॉग) परीक्षांमध्ये या अडचणींची पुनरावृत्ती न होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. जवळपास पावणे तीन लाख विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत.श्रेणीसुधार आणि विषय राहिलेल्या (बॅकलॉग) परीक्षांची तयारी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी सराव परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्या दिवशी ४५ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com