पुणे ।सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात असून राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यापीठाने आज गुरुवारी (१५ ऑक्टोबर ) होणाऱ्या सर्व ऑनलाईन, ऑफलाईन विषयाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाच्या वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो त्यामुळे इंटरनेटची अडचणी येऊ शकतात,तसेच अतिवृष्टीमुळे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचणी येऊ शकतात.या पार्श्वभूमीमुळे विद्यापीठाने १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व विषयाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com