पुणे प्रतिनिधी | सावित्रबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच एटीकेटी परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार होत्या. मात्र आता किमान एका आठवड्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच राष्ट्रीय पात्रता चाचणी (एनईटी), सामान्य प्रवेश चाचणी (सी ई टी) यासारख्या स्पर्धा परीक्षा याच कालावधीत होणार असल्याने पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
पुणे विद्याीठाने १२ ऑक्टोबर पासून पुढे परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी या परीक्षा ५ ऑक्टोबर पासून होणार होत्या. मात्र १, ५ आणि ९ ऑक्टोबर ला नेट परीक्षा होणार आहे, तसेच ४ ऑक्टोबर ला युपीएससी परीक्षा होणार आहे. तर ११ ऑक्टोबर ला एमपीएससी परीक्षा होणार आहे. याबरोबरच नुकताच इतर कर्मचारी वेगाचा संप सुरू आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व परीक्षा ३० ऑक्टोबरच्या आधी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता राज्यातील विद्यापीठे तसे नियोजन करीत आहेत. आता पुणे विद्यापीठाच्या परीक्षा या १२ ऑक्टोबर पासून होणार आहेत.