करिअरनामा ऑनलाईन । इंजीनियरिंग विषयी वाटणारे आकर्षण (Pune Engineering Colleges) आपल्याकडे काही नवीन नाही. याच वाढत्या आकर्षणामुळे इंजीनियरिंग क्षेत्राकडे वळणारी पावले अनेक आहेत. करिअरच्या दृष्टीने इंजीनियरिंग क्षेत्राची निवड करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडे फॅकल्टीबाबत अपुरी माहिती असते. कोणती फॅकल्टी निवडायची, त्यामध्ये नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याबद्दल पुरेशी माहिती असणं महत्त्वाचं आहे. आपल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार शाखेची निवड करणं योग्य ठरतं. इंजीनियरिंग मध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ,इलेक्ट्रॉनिक्स ,केमिकल अशा विविध शाखा उपलब्ध आहेत. या लेखातून आज आम्ही तुम्हाला इंजीनियरिंगच्या विविध शाखेबद्दल माहिती देणार आहोत
1. सिविल इंजीनियरिंग : इमारतीं, रस्ते, पूल, रेल्वे मार्ग, पाणीपुरवठा योजना, पाईप लाईन, जल जलसिंचन, बोगदे इत्यादी अनेक छोटी मोठी बांधकामं करणारं क्षेत्र म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनियर अर्थात स्थापत्य अभियंत्याला सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. सिव्हिल इंजीनियरिंगमध्ये कन्स्ट्रक्शन इंजीनियरिंग, इरिगेशन इंजीनियरिंग, स्ट्रक्चरल इंजीनियरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजीनियरिंग, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग यासारख्या उपशाखा उपलब्ध आहेत.
2. मेकॅनिकल इंजीनियरिंग : यामध्ये यंत्र व यंत्र प्रणाली चालवण्यासाठी औष्णिक आणि यांत्रिक ऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने रचना करणे व त्यांचा विश्लेषण (Pune Engineering Colleges) करणे यांचा समावेश होतो. मेकॅनिकल इंजिनियर सर्व प्रकारच्या यंत्रांची रचना चाचणी निर्मिती करण्याचं काम करतात .ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, एरोनॉटिक्स इंजीनियरिंग, मरायन इंजीनियरिंग, प्रोडक्शन इंजीनियरिंग या मेकानिकल इंजिनिअरिंगच्या उपशाखा आहेत.
3. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग : इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग ही सर्वात मोठी व विविध क्षेत्रात कार्यरत असणारी प्रभावी शाखा आहे. इलेक्ट्रिकल पावर व सिग्नल्स चा वापर केला जाणाऱ्या प्रणालींची व उपकरणांची रचना, उत्पादन, उपयोजना व विकास करणारी ही शाखा आहे. या शाखेची आता चार (Pune Engineering Colleges) मोठ्या शाखांमध्ये विभागणी केली गेली आहे. इलेक्ट्रिकल, पावर व मशिनरी इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन व कंट्रोल आणि कंप्यूटर इंजीनियरिंग अशी याची विभागणी आहे.
4. केमिकल इंजीनियरिंग : केमिकल इंजीनियरिंगमध्ये कच्च्या रसायनांचे अधिक उपयुक्त व मूल्यवान स्वरूपात रूपांतर करण्यासाठी अभ्यास केला जातो. मटेरियल इंजीनियरिंग, प्रोसेस इंजीनियरिंग या बरोबरीनेच मॉलिक्युलर व बायो मॉलिक्युलर या उपशाखांचा इथे समावेश होतो.
या व्यतिरिक्त आजकाल सॉफ्टवेअर इंजिनियर्स ए आयमध्ये (AI) विशेष कामगिरी करताना दिसतात. कृषी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभियांत्रिकी, महासागर अभियांत्रिकी, पेट्रोलियम अभियांत्रिकी इत्यादी सारखे अनेक अभियांत्रिकी अभ्यासक्रम आहेत ज्यात करिअर घडवलं जाऊ शकतं. अभियांत्रिकी क्षेत्रात (Pune Engineering Colleges) अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे आपण योग्य फॅकल्टी निवडणे महत्त्वाचे आहे. पुण्यात 129 अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. ज्यामध्ये खासगी 120 आणि शासकीय 9 अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांविषयी सविस्तर जाणून घेवूया…
1. आयआयटी पुणे (IIT-Pune) : (Pune Engineering Colleges) २०१६ मध्ये सुरू झालेल्या आयआयटी पुणे या कॉलेजने मागील दोन वर्षात चांगलीच प्रगती केली आहे. इथे मिळत असलेल्या चांगल्या प्लेसमेंटमुळे आयआयटीला विशेष प्राधान्य देण्यात येतं. १०० एकरचा कॅम्पस असलेलं हे कॉलेज पुण्यातील सर्वोत्तम कॉलेजपैकी एक आहे. JEE Mains मधून कॉलेजमध्ये प्रवेश मिळवता येतो, प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी जोसा कौन्सलिंग मधून कौन्सिलिंग केलं जातं. सध्या तरी NIRF तर्फे याला रेटिंग्स दिलेले नाहीत. एक उत्तम प्रकारचा कोडींग कल्चर आपल्याला आयआयटीमध्ये पाहायला मिळतं.
Packages : Highest package -40 L,Average Package – 17.2L, Medium Package – 9L/ 1 Year tution fee: 2.34L
Address : Ambegaon BK, Pune, Maharashtra 411041
2. सीओईपी पुणे( College Of Engineering Pune Technological University) : 1854 मध्ये स्थापना झालेले हे कॉलेज पुण्यातील अनेक जुन्या कॉलेजेस पैकी एक आहे. ३६ एकरचा आकर्षक कॅम्पस या कॉलेजमध्ये पाहायला मिळतो. जुनी इमारत हे या कॉलेजचे वैशिष्ट्य आहे. NIRF ने याला 52nd इंजीनियरिंग कॉलेजचा रँक दिला आहे. एसटी, एससी किंवा ओबीसी विद्यार्थ्यांना येथे स्कॉलरशिपची सुद्धा मिळते. हे कॉलेज केवळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश देतं.
Packages : Highest Package – 39.2L, Average Package – 7-8L, Cse package – 9-10L / 1 Year tuition fees: 90L
Address : Wellesley Rd, Shivajinagar, Pune, Maharashtra 411005.
3. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग(Bharti Vidyapeeth College Of Engineering) : १९८३ मध्ये सुरूवात झालेलं हे कॉलेज सुप्रसिद्ध आहे. ८५ एकर जमिनीवर याचा कॅम्पस आहे. विद्यापीठाद्वारे BVCET नावाची परीक्षा घेतली जाते ज्यानंतर मुलांना सदर कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. हे कॉलेज विशेषतः प्लेसमेंट आणि इंटर्नशिपसाठी ओळखलं जातं. NIRF ने याला 96th इंजीनियरिंग कॉलेजचा रँकिंग दिलेलं आहे. इथे विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप उपलब्ध आहेत.
Packages : Highest Package 34L, Average Package- 6.-7, Medium- 5.5 LPA/ 1 year tuition Fees: 1.2L
Address : Pune-Satara Road, Pune-411043.
4. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Army Institute Of Technology/ AIT) : पुण्यातील सर्वोत्तम कॉलेजपैकी एक असलेल्या AIT पुणे ची स्थापना १९९४ मध्ये झाली. हे कॉलेज सुमारे ३० एकर या कॅम्पसमध्ये विस्तारले आहे. येथे JEE Mains मधून प्रवेश मिळवला जाऊ शकतो. तसेच हे कॉलेज कौन्सिलिंगच्या प्रक्रियेनंतर प्रवेश मिळवून देते. शैक्षणिकदृष्ट्या AITला चांगलाच मान आहे. NIRF ने याला 139th रँकिंग दिलेला आहे.आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे केवळ सैन्यात भरती झालेल्या किंवा निवृत्त (Pune Engineering Colleges) सैनिकांच्या मुलांनाच प्रवेश दिला जातो.
Packages : Highest package- 39L, Average Package – 7.28L / 1 year tuition fees: 1.96L
Address : Alandi Rd, Dighi, Pune, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411015
5. व्ही आय टी पुणे (Vishwakarma Institute of Technology) : वर्ष १९८३ मध्ये सुरू झालेल्या ह्या कॉलेजचा एकूण कॅम्पस हा १७ एकर चा आहे. येथे Mhtech Mains मधून ऍडमिशन मिळवलं जाऊ शकतं. NIRF ने याला 122nd रँक दिलेला आहे.
Packages : Highest package- 34L, Average package – 6-6.5. L / 1 year tuition fees: 1.8L
Address : Upper Indira Nagar, Bibwewadi, Pune, Maharashtra 411037
6. पी आय सी टी पुणे( SCTR’S Pune Institute of Computer Technology) : ५ एकर्सचा कॅम्पस असलेल्या या कॉलेजची स्थापना १९८३ रोजी झाली. Mhtech, JEE mains या परीक्षांमधून येथे प्रवेश मिळवला जावू शकतो. तसेच Mhtech कडून विशेष कौन्सिलिंगची सोय प्रवेशादरम्यान केली गेली आहे. NIRF ने याला 201-250th असे रेटिंग दिलेले आहे. मायक्रोसॉफ्ट, फोन पे, याहू यासारख्या कंपनी येथून आपले कर्मचारी निवडतात.
Packages : Highest Package -43.33L, Average Package – 7.5L, Cse average – 8L / 1 year tution fee: 1L
Address : Survey No. 27, Near, Trimurti Chowk, Bharati Vidyapeeth Campus, Dhankawadi, Pune, Maharashtra 411043
7. सिंबायोसिस इन्स्टिट्यूट पुणे (Symbiosis Institute of Technology) : सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची सुरुवात २००८ मध्ये झाली. सुमारे ३०० एकर्सचा कॅम्पस असलेल्या या कॉलेजमध्ये संस्थेद्वारे प्रवेश परीक्षा घेतली जाते याव्यतिरिक्त इतर कुठल्याही इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाममधून इथे प्रवेश मिळवला जाऊ शकतो किंवा JEE Mains ही देखील परीक्षा इथे घेतली जाते( Sltee, ASEee, Jee). आपल्या सुंदर कॅम्पससाठी सिंबायोसिस ओळखलं जातं. हे स्वायत्त कॉलेज असल्यामुळे इतर कॉलेजच्या तुलनेत याची फी जास्त आहे.
Packages : Highest Package -12L, Average Package – 6-6.5L / 1 year tuition fees: 2.60L
Address : Symbiosis International University Near Lupin Research Park, Gram: Lavale, Tal:, Mulshi, Maharashtra 412115
8. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे(MIT World Peace University) : सर्वात महत्त्वाचं म्हणजे एमआयटी पुणे हे त्याच्या सुंदर कॅम्पससाठी प्रसिद्ध आहे. इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक सुंदर कॅम्पस लाईफ अनुभवायला मिळते. एमआयटी पुणे ची सुरुवात १९८४ पासून झाली कॉलेजचा एकूण कॅम्पस हा १७ एकरचा आहे यात JEE Mains मधून ऍडमिशन मिळवलं जाऊ शकतं सदर (Pune Engineering Colleges) कॉलेजला NIRFने 150th रेंक दिलेला आहे
Packages : Highest Package – 37.256L,Average Package – 6.5L / 1year tuition fee 3.1L
Address : Survey No, 124, Paud Rd, Kothrud, Pune, Maharashtra 411038
9. डी वाय पाटील कॉलेज पुणे( D Y Patil College) : पुण्यातले अनेक कॉलेजेस हे त्यांच्या सुंदर कॅम्पससाठी ओळखले जातात आणि डी वाय पाटील हे त्यातीलच एक उदाहरण आहे. १९८४ मध्ये सुरुवात झालेल्या या कॉलेजचा कॅम्पस 32 एकरात विस्तारला आहे. ज्यामध्ये Mhtech किंवा Jee Mains मधून ऍडमिशन मिळवले जाऊ शकते. याला NIRF ने 172nd रँक दिलेला आहे.
Packages : Highest Package- 12.5L,Average Package – 5 L / 1 year tuition fee: 1.23L
Address : D. Y. Patil Educational Complex, Sector 29, Nigdi Pradhikaran, Akurdi, Pune 411044
10. पीसीसीओई पुणे( Pimpri Chinchwad College Of Engineering) : पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिक्षणाच्या बाबतीत जरा शिस्तीचं मानलं जातं. या कॉलेजची सुरुवात १९९९ मध्ये झाली असून १३ एकर्समध्ये हे कॉलेज (Pune Engineering Colleges) उभारले आहे. येथे Mhtech, Jee Mains मधून ऍडमिशन घेतलं जाऊ शकतं. या कॉलेजला 192nd NIRF रँकिंग आहे.
Packages : Higgest Package – 32L, Average Package – 4-4.5L /1 year tuition fee: 1.18L
Address : Near Akurdi Railway Station Road, Sector No. 26, Pradhikaran, Nigdi, Pimpri, Maharashtra 411044
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com