करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (Prathmesh Tupsoundar) शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पुण्यातील अनेक नामांकित शाळांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक केले जात आहे; तर दुसरीकडे 35 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेचा विद्यार्थी प्रथमेश तूपसुंदर या विद्यार्थ्याला सर्व विषयात 35 गुण मिळाले आहेत. प्रथमेशने मराठी, हिंदी ,इंग्रजी, गणित, विज्ञान व तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र या सर्व विषयात प्रत्येकी 35 गुण मिळवले आहेत.
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता लागून राहिली होती. सोमवारी (दि. 27 मे) दुपारी 1 वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाला ऑनलाइन (Prathmesh Tupsoundar) निकाल पाहता आला. या निकालात काहींना शंभर टक्के तर काहींना 90 ते 80 टक्क्यांपर्यंत गुण मिळाले आहेत. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या शाळेच्या एका विद्यार्थ्याला सर्व विषयात 35 गुण मिळाले असून तो सर्व विषयात काठावर पास झाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com