करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येकाची निवड IAS, IPS, IFS आणि IRS या पदांवर रँक नुसार केली जाते. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची रँक चांगली असते त्यांना IAS मिळते. यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सर्व निवडलेल्या विद्यार्थ्यांना मसूरी स्थित लाल बहादुर शास्त्री प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी बोलवले जाते. प्रशिक्षणाच्या वेळी पहिल्या महिन्यात IAS अधिकाऱ्यांना पगार मिळणे सुरु होते. एका IAS अधिकाऱ्याचे वेतन त्याच्या पदोन्नती (प्रमोशन) नुसार वाढत जाते.
IAS अधिकाऱ्याची पहिली पोस्टिंग ही SDM असते. त्यानंतर त्यांची पदोन्नती होत आणि त्यांना वेगवेगळी पदे मिळत जातात. जाणून घेऊया एक IAS अधिकारी कोणत्या पोस्ट मिळवू शकतो? प्रशिक्षण पूर्ण करून आल्यावर IAS अधिकारी खालीलप्रमाणे पदभार स्वीकारतो:
1- SDM / अवर सचिव / सहाय्यक सचिव (1 ते 4 वर्षापर्यंत काम केल्यानंतर)
२- अतिरिक्त जिल्हा मॅजिस्ट्रेट (ADM) / उप सचिव / अवर सचिव (5 ते 8 वर्षापर्यंत काम केल्यानंतर)
3- जिल्हा मॅजिस्ट्रेट/ संयुक्त सचिव / उपसचिव (9 ते 12 वर्षापर्यंत काम केल्यानंतर)
4- जिल्हा मॅजिस्ट्रेट / विशेष सचिव / निर्देशक (13 ते 16 वर्षे काम केल्यानंतर)
5- डिव्हिजनल कमिशनर / सचिव-सह-आयुक्त / संयुक्त सचिव (16 ते 24 वर्षापर्यंत काम केल्यानंतर)
6- प्रमुख सचिव / अप्पर सचिव (25 ते 30 वर्षे काम केल्यानंतर)
7- अप्पर मुख्य सचिव (30 ते 33 वर्षापर्यंत काम केल्यानंतर)
8- प्रधान सचिव / सचिव (30 ते 36 वर्षापर्यंत काम केल्यानंतर)
9- भारताचे कॅबिनेट सचिव (37 वर्षांहून अधिक काम केल्यानंतर)
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com