Post Matric Scholarship : विद्यापीठांना आता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप नाकारता येणार नाही; हाय कोर्टाचा मोठा निर्णय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अभिमत विद्यापीठामध्ये (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) शिक्षण (Post Matric Scholarship) घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणारी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आता नाकारता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच राज्य सरकारने याबाबतचा सुधारित शासन निर्णय (GR) येत्या दोन महिन्यांत काढावा, असेही आदेशात नमूद केले आहे.

राज्यात 21 अभिमत विद्यापीठे

राज्यात 21 अभिमत विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे. सांगली येथील भारती विद्यापीठातील मेडिकल कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. जी. एस. पटेल आणि न्या. एस. जी. दिघे यांनी हा निर्णय दिला. राज्य सरकारने विनाअनुदानित शैक्षणिक संस्था आणि (Post Matric Scholarship) अभिमत विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत भेदभाव करू नये, असे न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा (Post Matric Scholarship)

2012 साली मुंबई उच्च न्यायालयात सर्वप्रथम याबाबतची जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. 2015 साली न्यायालयाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करावी, असा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली.

त्यानंतर राज्य सरकारद्वारे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. २०२१ साली शिष्यवृत्तीबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारने समितीदेखील नेमली. या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र, न्यायालयाच्या आताच्या निर्णयाने अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा

राज्य सरकारकडे निधीचा अभाव असल्याचे कारण पुढे करत अभिमत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारत होते. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयाने (Post Matric Scholarship) विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना अडचणी निर्माण होणार नाहीत, अशी भावना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनचे डॉ. सिद्धांत भरणे यांनी व्यक्त केली.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com