पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा (GATE 2021) 5 फेब्रुवारीपासून

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ ही प्रवेश प्रक्रिया यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. देशातील आयआयटी, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांच्या प्रतिनिधींच्या गेट २०२१ कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ‘गेट’ परीक्षा घेण्यात येते. महामारीमुळे यंदा ही परीक्षा कशी आयोजित करायचे याचे आव्हन समितीसमोर होते. ही परीक्षा आयआयटी मुंबईतर्फे आयोजित करण्यात येते. यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत ही परीक्षा रोज दोन सत्रांमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यावर्षी या परीक्षेत दोन अतिरिक्त विषयांचा समावेश झाल्याने ही परीक्षा २७ विषयांसाठी होणार आहे. एक विद्यार्थी एका अर्जावर दोन विषयांच्या परीक्षेला बसू शकतो.

अर्जदार विद्यार्थ्यांची संख्या पाहून भविष्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असेही यावेळी ठरविण्यात आले. सध्या ही परीक्षा ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. याबाबतचा अधिक तपशील विद्यार्थ्यांना https://gate.iitb.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल.

अधिकृत वेबसाईट – https://gate.iitb.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com