करिअरनामा ऑनलाईन । पुणे महापालिका प्रशासनाने (PMC Scholarship 2024) शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. 10 वी आणि 12 वीची परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. चांगल्या गुणाने उतीर्ण झालेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर 2024 असून यादीवशी सायंकाळी ५:30 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. 10 वी व 12 वीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत अर्थसाह्य केले जाते.
इथे करा अर्ज –
पुणे महापालिकेच्या या शिष्यवृत्तीचा लाभ (PMC Scholarship 2024) घेण्यासाठी विद्यार्थ्यांना https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/ या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विद्यार्थी सायंकाळी ५:30 पर्यंत अर्ज करु शकतात.
पात्र विद्यार्थ्यांना ‘एवढी’ मिळणार शिष्यवृत्ती (PMC Scholarship 2024)
या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या 10 वीच्या विद्यार्थ्यांना रुपये १५ हजार, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना रुपये २५ हजार इतके अर्थसाह्य महापालिकेकडून दिले जाणार आहे. महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या दहावी व बारावीमध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत अर्थसाह्य केले जाते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना
पुणे महापालिकेच्या शाळेतील ७० टक्के गुण मिळवलेले मागासवर्गीय विद्यार्थी, ४० टक्के अपंगत्व असलेल्या व ६५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थी यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेंतर्गत इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाह्य दिले जाते. यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. दहावी, बारावीनंतर शासनमान्य संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com