PMC Recruitment : पुणे महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आरोग्य खात्याकडील पुणे शहर (PMC Recruitment) एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका यांच्या गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटकरिता पुणे मनपा रुग्णालयांतील FICTC केंद्रांकडे विविध पदांवर नवीन उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 8 दिवसांपर्यंत सोमवार ते शुक्रवार (शासकीय सुट्टी वगळून) सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत समक्ष अर्ज सादर करायाचा आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे
भरले जाणारे पद –
1. समुपदेशक – 11 पदे
2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 11 पदे
पद संख्या – 12 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत्त – उमेदवाराने समक्ष पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411002
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 8 दिवसांपर्यंत (13 जून 2023)
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
समुपदेशक – (PMC Recruitment)
1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण.
2. एच. आय. व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ –
1. मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी. व डी.एम.एल.टी. उत्तीर्ण
2. एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत
3. जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील ८ दिवसांपर्यंत सोमवार ते शुक्रवार (शासकीय सुट्टी वगळून) सकाळी 4. ११.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत समक्ष अर्ज सादर करावयाचा आहे. (PMC Recruitment)
5. पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, ६६३, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे ४११००२ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील.
6. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करण्यात येतील.

काही महत्वाच्या लिंक्स – (PMC Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com