PMC Recruitment 2023 : पुणे महापालिकेत ‘या’ पदांवर भरती सुरु; काय आहे पात्रता?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकेत रिक्त पदांच्या भरतीसाठी (PMC Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. पुणे शहरातील पुणे मनपा कोर्ट, पुणे जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालये, ग्राहक मंच व हरित लवाद तसेच महसुल खात्याकडील पुणे महानगरपालिका पक्षकार असलेल्या दाव्यांमध्ये तसेच महापालिकेच्या निरनिराळया खात्यांस अभिप्राय देणेकामी पुणे महानगरपालिकेचे वतीने वकील म्हणून कामकाज पाहण्यासाठी वकिलांच्या मान्य फी धोरणानुसार शर्ती अटींवर नेमणूक केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र वकिलांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे.

संस्था – पुणे महानगर पालिका, पुणे

भरले जाणारे पद – वकील

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विधी विभाग खोली क्र. २१९ दुसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर पुणे-४११००५

निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PMC Recruitment 2023)

1. मान्यताप्राप्त विदयापीठाची विधी शाखेची पदवी

2. किमान 10 वर्षे मे. न्यायालयात प्रत्यक्ष प्रॅक्टीसचा अनुभव / कन्व्हेयांसींग व कायदेशीर सल्लागार म्हणून कामकाज करण्याचा 10 वर्षाचा अनुभव

असा करा अर्ज –

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे. (PMC Recruitment 2023)
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2023 आहे.
  5. वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

महत्वाचे –

  1. सदरची नेमणूक अस्थायी स्वरुपाची 3 वर्षे कालावधी करीता मानधन व पॅनेल तत्वावर असल्याने या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती मागण्याचा हक्क असणार नाही.
  2. उमेदवारांनी अर्जासोबत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, आवश्यक मुळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती व अनुभवाच्या मूळ सत्यप्रतीचे दोन संच सादर करणे आवश्यक आहे.
  3. उमेदवारास नियुक्ती देण्याबाबत सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्त यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकाराचा दावा सांगता येणार नाही. (PMC Recruitment 2023)
  4. निवड झालेल्या वकिलांना मुख्य विधी अधिकारी, विधी विभाग पुणे मनपा यांचे कार्यालयात दररोज वेळेवर उपस्थित राहून रोजचे रोज त्यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज करावयाचे असून सदर कामाचे स्वरुप ठरविण्याचे अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना राहतील.
  5. मुलाखातीस येणा-या उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
  6. शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीचा अनुभव असल्यास नमुद करावा.

काही महत्वाच्या लिंक्स – (PMC Recruitment 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्जाचा नमुना Download करा – Application 

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com