PMC Recruitment 2023 : विना परीक्षा थेट द्या मुलाखत; पुणे महापालिकेत 4 थी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगपालिका, समाज विकास विभाग (PMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून समुपदेशक, समुहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर), स्वच्छता स्वयंसेवक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ), एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक या पदांच्या 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2023 आहे. मिळालेल्या (PMC Recruitment 2023) अर्जामधून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता सदर ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतर पात्र यादीतील उमेदवारांनी दि. 8 जून रोजी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.

संस्था – पुणे महानगपालिका, पुणे
भरली जाणारी पदे – (PMC Recruitment 2023)
1. समुपदेशक 6 पदे
2. समुहसंघटिका 15 पदे
3. कार्यालयीन सहाय्यक 4 पदे
4. रिसोर्स पर्सन 2 पदे
5. विरंगुळा केंद्र समन्वयक 4 पदे
6. सेवा केंद्र मुख्य समन्वयक 2 पदे
7. सेवा केंद्र समन्वयक 3 पद
8. संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर) 1 पद
9. स्वच्छता स्वयंसेवक 6 पदे (PMC Recruitment 2023)
10. फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक 1 पद
11. फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक 2 पदे
12. ब्युटी पार्लर प्रशिक्षक 2 पद
13. चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक 1 पद
14. कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक 1 पद
15. इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक 2 पदे
16. जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक 1 पद
17. संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक 1 पद
18. संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक 3 पदे
19. शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ) 1 पदे
20. एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार 1 पद
21. प्रशिक्षण केंद्र समन्वयक 1 पद
22. प्रकल्प समन्वयक 1 पद (PMC Recruitment 2023)
23. प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक 1 पद

पद संख्या – 62 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत्त – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे 411011
निवड प्रक्रिया – मुलाखत (PMC Recruitment 2023)
मुलाखतीची तारीख – 08 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
समुपदेशक – MSW/MA
समुहसंघटिका – MSW/MA
कार्यालयीन सहाय्यक – 12th Pass
रिसोर्स पर्सन – M.Com
विरंगुळा केंद्र समन्वयक – 12th Pass
सेवा केंद्र मुख्य समन्वयक – 10th Pass
सेवा केंद्र समन्वयक – 7th Pass (PMC Recruitment 2023)
संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर) – 12th Pass
स्वच्छता स्वयंसेवक – 4th Pass
फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक विषयाकिंत डिप्लोमा/शासनमान्य आय.टी.आय. उत्तीर्ण

फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण
ब्युटी पार्लर प्रशिक्षक ब्युटी पार्लर प्रशिक्षक उत्तीर्ण
चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक – 12th Pass
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक BA
जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक ब्युटी पार्लर प्रशिक्षक उत्तीर्ण
संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक – B.E
संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक BCA,MCA, BCS, MCS, MCM
शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ) —
एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार —
प्रशिक्षण केंद्र समन्वयक – MSW/पदवीधर
प्रकल्प समन्वयक – MSW/पदवीधर
प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक साक्षर

आवश्यक कागदपत्रे –
1. पासपोर्ट साईज फोटो (PMC Recruitment 2023)
2. जन्मतारखेकरीता (वयाचा दाखला/ दहावीची टीसी / सनद / जन्म प्रमाणपत्र)
3. फोटो आयडी / रहिवाशी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका / रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र / अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC नोंदणी / नोंदणी नूतनीकरण / अनुभव प्रमाणपत्र) या अनुषंगाने इतर आवश्यक सत्य प्रत / साक्षांकित प्रती )
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com