करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना पुण्यात नोकरी करायची इच्छा (PMC Recruitment 2023) आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 288 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे
पद संख्या – 288 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. 7. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे 411005
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षांपर्यंत असावे.
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) वैद्यकीय अधिकारी – 96 पदे
शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS असणे आवश्यक
2) स्टाफ नर्स – 96 पदे (PMC Recruitment 2023)
शैक्षणिक पात्रता – उमेदवार GNM/B.Sc. (नर्सिंग) असणे आवश्यक.
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – 96 पदे
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12वी (विज्ञान) उत्तीर्ण तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केला असणे आवश्यक.
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – (PMC Recruitment 2023)
1. वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये दरमहा
2. स्टाफ नर्स – 20,000/- रुपये दरमहा
3. बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – 18,000/- रुपये दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com