करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका, कर आकारणी (PMC Recruitment 2023) व कर संकलनविभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IT इंजिनियर्ससाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी समक्ष पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे
भरली जाणारी पदे –
1. वरिष्ठ डेटाबेस अभियंता
2. डेटाबेस प्रशासक
3. सॉफ्टवेअर अभियंता
4. सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा)
5. सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा)
6. वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता (PMC Recruitment 2023)
7. सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2)
8. पासपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता
9. कर संकलन आणि सामंजस्य
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – समक्ष
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालया मध्ये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (PMC Recruitment 2023)
1. किमान वय 18 वर्षे
2. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे
3. मागास जातीच्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 5 वर्षासाठी शिथील
मिळणारे वेतन –
1. वरिष्ठ डेटाबेस अभियंता Rs. 60,000/- per month
2. डेटाबेस प्रशासक Rs. 35,700/- per month (PMC Recruitment 2023)
3. सॉफ्टवेअर अभियंता Rs. 42,300/- per month
4. सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा) Rs. 42,300/- per month
5. सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा) Rs. 42,300/- per month
6. वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता Rs. 30,400/- per month
7. सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2) Rs. 29,900/- per month
8. सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता Rs. 26,000/- per month
9. कर संकलन आणि सामंजस्य Rs. 26,000/- per month
आवश्यक कागदपत्रे –
1. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला
2. शाळा सोडल्याचा दाखला
3. इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे (PMC Recruitment 2023)
4. जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र
5. अनुभव विषयक प्रमाणपत्रे
6. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित छायाप्रती
7. अर्जावर स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो चिकटवणे
असा करा अर्ज – (PMC Recruitment 2023)
1. या पदासाठी उमेदवारांनी समक्ष पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. उमेदवाराने सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करण्यात येईल. (PMC Recruitment 2023)
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
7. वरील पदांसाठी मा. महापालिका आयुक्त यांचे नावे असणारा, पुणे मनपाच्या www.pmc.gov.in या वेबसाईट वर असणारा छापील अर्ज Download करण्यात यावा. हा अर्ज सुवाच्च अक्षरात पूर्णपणे भरून मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालयामध्ये दि. 10 जुलै 2023 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत (कार्यालयीन सुट्टया वगळून) समक्ष सादर करायचा आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (PMC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com