करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारने सुरू केलेल्या (PM Rojgar Mela 2023) पीएम रोजगार मेळाव्यात 22 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 70,000 तरुणांना नियुक्ती पत्र देणार आहेत. यापूर्वी अनेकवेळा पीएम मोदींनी तरुणांना नियुक्तीपत्र दिले आहे. यामध्ये आतापर्यंत देशातील साडेतीन लाखांहून अधिक तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
दि. 22 जुलै रोजी 7 व्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. PM रोजगार मेळा अंतर्गत कोणती पदे उपलब्ध आहेत आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा? याविषयी जाणून घेऊया….
रोजगार मेळाव्यासाठी अशी करा नोंदणी –
1. रोजगार मेळाव्यात नोंदणी करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmrpy.gov.in वर जावे लागेल.
2. तुम्हाला ज्या विभागासाठी अर्ज करायचा आहे त्याचा फॉर्म भरा.
3. आवश्यक पात्रतेचे (PM Rojgar Mela 2023) तपशील भरून नोंदणी करा.
4. नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता.
5. अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.
या विभागांमध्ये नोकऱ्या उपलब्ध – (PM Rojgar Mela 2023)
पीएम रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य मंत्रालयाच्या 38 विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार पोस्ट निवडू शकता. पीएम रोजगार मेळ्याअंतर्गत, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांना नियुक्ती पत्र देतात. यामध्ये विविध राज्यातील तरुण सहभागी होतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुम्ही या वर्षाच्या अखेरीस या योजनेसाठी अर्ज करू शकता.
देशातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना अनेक टप्प्यांत नियुक्ती पत्रांचे वाटप (PM Rojgar Mela 2023) करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 6 टप्प्यात नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. 7 व्या टप्प्यात 22 हून अधिक राज्यांमधील 45 केंद्रांवर रोजगार मेळावा आयोजित केला जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com