PERA CET 2024 Exam Date : खासगी विद्यापीठांमधील प्रवेशासाठी ‘या’ तारखेला होणार ‘PERA CET’

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील खासगी विद्यापीठांच्या (PERA CET 2024 Exam Date) प्रीमिनेंट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशनच्या (PERA) वतीने दरवर्षीप्रमाणे प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. दि. 24 ते 26 मे दरम्यान PERA CET घेण्यात येणार आहे. खासगी विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी दि. 19 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे तर परीक्षेचा निकाल दि. 31 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे; अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली. पेरा सीईटीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कराड यांनी ही माहिती दिली. राज्यातील नामांकित २५ खासगी विद्यापीठांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा देणे अनिवार्य आहे.

‘या’ अभ्यासक्रमांसाठी घेतली जाते प्रवेश परीक्षा (PERA CET 2024 Exam Date)
अभियांत्रिकी, जैवअभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी, मरीन इंजिनिअरिंग, कृषी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, फाइन आर्ट्स, डिझाइन, व्यवस्थापन, विधी आणि वास्तुविशारद यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.

‘पेरा सीईटी’बाबत अधिक माहितीसाठी www.peraindia.in या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

‘PERA’ अंतर्गत येणारी विद्यापीठे
एमआयटी-एडीटी, एमआयटी-डब्ल्यूपीयू, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, संदीप युनिव्हर्सिटी, स्पायसर, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, एमजीएम युनिव्हर्सिटी, सिंबायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सोमैया विद्याविहार (PERA CET 2024 Exam Date) युनिव्हर्सिटी, विजयभूमी युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्निकल युनिव्हर्सिटी, श्री बालाजी युनिव्हर्सिटी, फ्लेम युनिव्हर्सिटी, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटी, जेएसपीएम युनिव्हर्सिटी, एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, डीईएस पुणे विद्यापीठ, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, जी.एच. रायसोनी स्किल टेक विद्यापीठ आणि संजीवनी विद्यापीठ.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com