Pench Tiger Reserve Recruitment 2023 : 10 वी पास ते ग्रॅज्युएट्सना नोकरीचा गोल्डन चान्स!! पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘ही’ पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पेंच व्याघ्र प्रकल्प (Pench Tiger Reserve Recruitment 2023) संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर अंतर्गत भरतीची नवीन जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ञ, ग्राफिक डिझायनर, सिव्हिल इंजिनियर, बचाव मदत टीम पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी 05 ऑगस्ट 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

संस्था – पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर
भरली जाणारी पदे –
1. जीवशास्त्रज्ञ – 01 पद
2. पशुवैद्यकीय अधिकारी – 01 पद
3. निसर्ग पर्यटन व्यवस्थापक – 02 पदे
4. सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक – 02 पदे
5. उपजीविका तज्ञ – 02 पदे
6. सर्वेक्षण सहाय्यक – 01 पद
7. GIS तज्ञ – 01 पद (Pench Tiger Reserve Recruitment 2023)
8. ग्राफिक डिझायनर – 01 पद
9. सिव्हिल इंजिनियर – 01 पद
10. बचाव मदत टीम – 04 पदे
पद संख्या – 16 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 05 ऑगस्ट 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
जीवशास्त्रज्ञ वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रामध्ये पदव्युत्तर किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी.
पशुवैद्यकीय अधिकारी स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.
निसर्ग पर्यटन व्यवस्थापक कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका
सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका
उपजीविका तज्ञ सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान २ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव.
सर्वेक्षण सहाय्यक कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी ४० शप्रमी, मराठी ३० शप्रमी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव.
GIS तज्ञ विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी. ए. व जीआयएस विषयाचा कमीत कमी ३ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव.
ग्राफिक डिझायनर कोणत्याही शाखेतील पदवीधर, ग्राफिक डिझायनिंग मध्ये पदवी किंवा पदविका.
सिव्हिल इंजिनियर Civil Engineer पदवीधर, सदर क्षेत्रात काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव
बचाव मदत टीम किमान SSC उत्तीर्ण, MS-CIT उत्तीर्ण, उमेदवारास वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव
प्रमाणपत्र

 

मिळणारे वेतन – (Pench Tiger Reserve Recruitment 2023)

पदाचे नाव दरमहा वेतन 
जीवशास्त्रज्ञ रु. 30,000/-
पशुवैद्यकीय अधिकारी रु. 50,000/-
निसर्ग पर्यटन व्यवस्थापक रु. 25,000/-
सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक रु. 15,000/-
उपजीविका तज्ञ रु. 30,000/-
सर्वेक्षण सहाय्यक रु. 15,000/-
GIS तज्ञ रु. 30,000/-
ग्राफिक डिझायनर रु. 20,000/-
सिव्हिल इंजिनियर रु. 30,000/-
बचाव मदत टीम रु. 10,000/-

 

महत्वाच्या सूचना –
1. सर्व पदांसाठी मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
2. वरील तक्त्यातील दर्शविलेल्या मुख्यालया व्यतीरिक्त निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रा मधील ईतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
3. पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) मधील पदाकरिता Resume व अर्ज तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
4. उमेदवार हा कोणत्याही इतर शासकिय, निमशासकिय अशासकीय संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकरी असता कामा नये.
5. सदर पदे ही पूर्णवेळ असल्याने या काळात (Pench Tiger Reserve Recruitment 2023) उमेदवाराला इतरत्र काम किंवा प्रॅक्टीस करता येणार नाही.
6. नियुक्ती झालेल्या जलद बचाव गट सदस्यास २४ तास सेवे करीता तत्पर राहणे बंधनकारक राहील. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे आदेशान्वये पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रा बाहेर व कोणत्याही ठिकाणी जलद बचाव गटाचे कार्य करावे लागेल.
7. वरिल सर्व पदांसाठी उमेदवराकडे संगणकाचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com