करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्यातील (PAT Exam 2024) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयासाठी तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन 1 घेण्यात आली आहे.
शासनामार्फत राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट दि. २ ते ४ एप्रिलदरम्यान घेण्यात येणार आहे. त्याचदरम्यान 2 एप्रिल रोजी नाथषष्ठीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाने सुटी जाहीर केलेली आहे. त्यामुळे दोन (PAT Exam 2024) तारखेला मुलांनी परीक्षा घ्यावी की, सुटी? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक बदलून आता दि. ४ ते ६ एप्रिलदरम्यान परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षेच्या तारखेसह वेळही बदलली
दुसरी संकलित मूल्यमापन चाचणी ता. २ ते ४ एप्रिलदरम्यान राज्यभरातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार होती; परंतु दोन एप्रिलरोजी नाथषष्ठी असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विभागीय आयुक्त कार्यालयाने सुटी जाहीर केली आहे. तसेच त्याच दिवशी म्हणजे दोन एप्रिलला तिसरी ते (PAT Exam 2024) सहावीसाठी ११ ते १२.३० वाजता; तर सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ११ ते १ यावेळेत प्रथम भाषेचा पेपर घेण्यात येणार होता. त्यामुळे दोन एप्रिलला परीक्षा घ्यायची की नाथषष्ठीनिमित्त मुलांना सुटी द्यायची? असा प्रश्न शाळांकडून विचारला जात होता. याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. तसेच 2 तारखेचा पेपर पुढे ढकलण्यात यावा; अशी मागणीही शाळांनी वृत्तपत्र माध्यमातून केली होती. या वृत्ताची दखल घेत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने २ ते ४ ऐवजी ४ ते ६ एप्रिलदरम्यान परीक्षा घेण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत.
जुन्या वेळापत्रकानुसार चाचणी परीक्षेची वेळ दुपारी एक वाजेपर्यंत होती. मात्र, आता तारखेत बदल करण्यात आला असून चाचणी परीक्षा सकाळी 8 ते १० दरम्यान घेण्यात येणार आहे.
नवीन वेळापत्रक असे आहे – (PAT Exam 2024)
ता.४ एप्रिल – प्रथम भाषा
(सर्व माध्यमे)
तिसरी व चौथी – सकाळी ८ ते ९.३० पाचवी व सहावीची ८ ते ९.४५
सातवी व आठवीची ८ ते १०
ता. ५ एप्रिल – गणित (सर्व माध्यमे)तिसरी व चौथी ः सकाळी ८ ते ९.३० पाचवी व सहावीची ८ ते ९.४५
सातवी व आठवीची ८ ते १०
ता. ६ एप्रिल – इंग्रजी
तिसरी व चौथी – सकाळी ८ ते ९.३०
पाचवी व सहावीची ८ ते ९.४५
सातवी व आठवीची ८ ते १०
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com