Home Blog Page 787

Central Railway Pune Recruitment 2021। विविध पदांसाठी भरती

Central Railway Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे पुणे विभागा अंतर्गत सीएमपी जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर पदांच्या 5 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येथ असून, अर्ज ऑफलाईन पद्धतीने (ई-मेल)द्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे. अधिकृत संकेतस्थळ – www.cr.indianrailways.gov.in

Central Railway Pune Recruitment 2021

एकूण जागा- 05

पदांचे नाव – सीएमपी जनरल ड्यूटी मेडिकल प्रॅक्टिशनर

पात्रता – औषध मध्ये पदवी / एमबीबीएस

वयोमर्यादा – 53 वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.

पगार – 750000

नोकरीचे ठिकाण – पुणे.  Central Railway Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (email) द्वारे

ई मेल – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2021

मूळ जाहिरात –  PDF

अधिकृत संकेतस्थळ – www.cr.indianrailways.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Nashik Smart City Recruitment 2021। विविध पदांच्या 8 जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाइन – नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 8 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2021 आहे.

Nashik Smart City Recruitment 2021

अधिकृत वेबसाइट – http://nashiksmartcity.in/home/notices

पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी, विशेष कर्तव्य अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक, शहरी नियोजक, अनुप्रयोग व्यवस्थापक आणि सफाई कामगार

एकूण जागा – 8

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

पगार – 10,021/- रुपये ते 75,000/- रुपये (पदांनुसार) ,

नोकरीचे ठिकाण – नाशिक. Nashik Smart City Recruitment 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज करा- http://www.nashiksmartcity.in/careers/register.php

शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट – http://www.nashiksmartcit.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2021| विविध पदांच्या 120 जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाइन – (BECIL) ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 120 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2021 आहे.

BECIL Recruitment 2021

एकूण जागा – १२०

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता-
1) CSSD टेक्निशियन- १ जागा
शैक्षणिक पात्रता – B.Sc. (माइक्रोबायोलॉजी) /मेडिकल टेक्नोलॉजी + 03 वर्षे अनुभव किंवा स्टाफ नर्स + 02 वर्षे अनुभव किंवा थिएटर असिस्टंट कोर्स + 04 वर्षे अनुभव

2) नुक्लियर मेडिसिन टेक्निशियन – २ जागा
शैक्षणिक पात्रता – नुक्लियर मेडिसिन टेक्नोलॉजी पदवी किंवा फिजिक्स / केमिस्ट्री / बायोकेमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / लाइफ सायंस पदवी + DMRIT PG डिप्लोमा

3) परफ्यूझनिस्ट – २ जागा
शैक्षणिक पात्रता- परफ्यूजन टेक्नोलॉजी पदवी+02 वर्षे किंवा परफ्यूजन टेक्नोलॉजी डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव

4) लॅब अटेंडंट ग्रेड-II – ४१ जागा
शैक्षणिक पात्रता (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT

5) लॅब टेक्निशियन – १ जागा
शैक्षणिक पात्रता (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT

6) ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर/ रिसेप्शनिस्ट -१० जागा
शैक्षणिक पात्रता (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + मेडिकल रेकॉर्ड कीपिंग डिप्लोमा/कोर्स/प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव + इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि. रिसेप्शनिस्ट: मास कम्युनिकेशन / हॉस्पिटल /डमि निस्ट्रेशन / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटची पदवी + संगणक ज्ञान

7) फार्मा केमिस्ट / केमिकल एग्जामिनर – १ जागा
शैक्षणिक पात्रता – D.Pharm

8) फार्मासिस्ट ग्रेड-II – ८ जागा
शैक्षणिक पात्रता – D.Pharm

9) डार्क रूम असिस्टंट ग्रेड-II – ५ जागा
शैक्षणिक पात्रता- (i) रेडिओग्राफी डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

10) डिस्पेंसिंग अटेंडंट – ४ जागा
शैक्षणिक पात्रता- D.Pharm

11) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशिय – ३८ जागा
शैक्षणिक पात्रता-B.Sc. (मेडिकल रेकॉर्ड्स) किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + मेडिकल रेकॉर्ड कीपिंग डिप्लोमा/कोर्स/प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव + इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

12) सिनियर मेकॅनिक – ६ जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (A/C&R) (iii) 08 वर्षे अनुभव

13) ज्युनियर स्केल स्टेनो (हिंदी) – १ जागा
शैक्षणिक पात्रता- (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणीचे नियमः हिंदी शॉर्टहँड प्रति मिनिट 64 शब्दांच्या वेगाने आणि प्रति मिनिट 11 शब्दांच्या वेगाने लिप्यंतर आणि चुका 8% पेक्षा जास्त नसावेत.

वयोमर्यादा- २२ फेब्रुवारी २०२१ रोजी, १८ ते ४० वर्षे.
(SC/ST – ०५ वर्षे सूट) (OBC – ०३ वर्षे सूट)

परीक्षा शुल्क- जनरल/ओबीसी ८३० रुपये/- [SC/ST/PWD/EWS: ₹600/-]

पगार-
1) CSSD टेक्निशियन -३३,४५० रु

2) नुक्लियर मेडिसिन टेक्निशियन -४२,९५०रु

3) परफ्यूझनिस्ट – ४२,९५० रु

4) लॅब अटेंडंट ग्रेड-II – १७,३०३ रु

5) लॅब टेक्निशियन -२७,२५० रु

6) ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर/ रिसेप्शनिस्ट – १७,३०३ रु

7) फार्मा केमिस्ट / केमिकल एग्जामिनर – २७,२५० रु

8) फार्मासिस्ट ग्रेड-II – २७,२५० रु

9) डार्क रूम असिस्टंट ग्रेड-II – २३,५५० रु

10) डिस्पेंसिंग अटेंडंट – २३,५५० रु

11) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन -२३,५५० रु

12) सिनियर मेकॅनिक (A/C&R) -२३,५५० रु

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 फेब्रुवारी 2021

अधिकृत संकेतस्थळ – www.becil.com

मूळ जाहिरातPDF

ऑनलाइन अर्जासाठी-  https://becilaiimsbhopalp2.cbtexam.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahila Bal Vikas Recruitment 2021 | 36 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

Mahila Bal Vikas Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाइन | महिला व बाल विकास विभागा अंतर्गत विविध पदांची ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने (ई-मेल)द्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारिख 13 फेब्रुवारी 2021 आहे. Mahila Bal Vikas Recruitment 2021

एकूण जागा – ३६

पदांचे नाव – बाल /समुपदेशन मानसशास्त्रज्ञ/ Child /Counselling Psychologist

शैक्षणिक पात्रता- भारतीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून समुपदेशन मानसशास्त्र / बाल मानसशास्त्रातील पदवीधर किमान ६०% गुणांसह / पदव्युत्तर पदवी / पीएच.डी.

वयाची अट – १३ फेब्रुवारी २०२१ रोजी २५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही. Mahila Bal Vikas Bharti 2021

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र Mahila Bal Vikas Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाइन / (ई-मेल)

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ फेब्रुवारी २०२१ आहे.

अधिकृत संकेतस्थळ – www.wcdcommpune.org

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.अंतर्गत 650 जागांसाठी मेगाभरती

ECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाइन | (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 650 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. ECIL Recruitment 2021

एकूण जागा – 650

पदाचे नाव – टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी)

शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. SC/ST: 50% गुण 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा – 31 जानेवारी 2021 रोजी 18 ते 30 वर्षे पूर्ण
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही. ECIL Recruitment 2021for

पगार – 23000-/ रुपये

नोकरीचे ठिका – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021

अधिकृत संकेतस्थळ – ecil.co.in

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाइन अर्ज – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

शेतमजूर माय-बापाचा लेक झाला मोठा ‘साहेब’, UPSC परीक्षेत शरण कांबळे देशात 8 वा

सोलापूर | जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे गावचे सूपूत्र शरण गोपीनाथ कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०१९मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट ( ग्रुप ए ) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी आई-बापाच्या कष्टाचं जीझ झालं आहे.
शरण यांच्या निकालाची वार्ता कळताच गावकऱ्यांनी जल्लोष केला, आपला लेक एवढा मोठा साहेब झाला, या आनंदाने आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले.

भूतकाळाती आठवणी जागवताना, वडील गोपीनाथ आणि आई  सुदामती यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर, थोरला भाऊ दादासाहेब यानंही लहान्या भावाचं अभिनंदन केलं, गावातील मित्रांनी एकत्र येऊन शरणच्या गळ्यात हार घालून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

शरणने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण प्रशाला तडवळे, या आपल्या मूळगावातच पूर्ण केले. त्यानंतर, बारावीचे शिक्षण विद्या मंदीर वैराग तर वालचंद कॉलेज इंजिनिअरींग कॉलेज सांगली येथे २०१६ मध्ये बी टेक झाले. पुढील शिक्षणासाठी इंडीयन इन्स्टुट ऑफ सायन्स बेंगलोर मधून २०१८मध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी पूर्ण केली. एम.टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका खासगी कंपनीने वीस लाखाचे पॅकेज देऊ केले होते पण शरण यांनी ते पॅकेज नाकारले. दरम्यानच्या काळात, युपीएससी परीक्षांच्या अभ्यास शरण यांनी केला होता. त्यामुळे, नोकरीवर न जाता, आपण युपीएससी परीक्षेतून सरकारी सनदी अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना, शरणने पहिल्याच प्रयत्नात आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. मुलगा मोठा अधिकारी झालाय, पण ही वस्तुस्थिती आजही आई-वडिलांना स्वप्नासारखीच वाटतेय. लेकानं घराण्याचं नाव काढलं, गावाचं नाव काढलं एवढच काय आई-वडिलांना लय भारी वाटतंय. पण, पोरंग नेमक कोणता ‘साहेब’ होणार हे अद्यापही त्यांना माहिती नाही.

शरणने ऑगस्ट २०१९मध्ये पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि ते देशात आठव्या क्रमांकांने उत्तीर्ण झाले सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सद्वारे विविध दलामध्ये भरती केली जाते शरण हा सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेमध्ये पाहिल्याच प्रयत्नात देशात आठवा आला आहे या परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF, सेंट्रल रिर्झव्ह पोलीस फोर्स CRPF, सेंट्रल इंडी स्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स CISF, इंडो -तिबेटीयन बॉर्डर पोलीस IT BP, सशस्त्र सीमा बल SSB या दलामध्ये निवड केली जाते. शरण कांबळेचे आईवडील मोलमजूरी करतात, मुलगा हुशार असल्यामूळे त्यांनी रक्ताचे पाणी करून मुलाला क्लास वन बनविले शरण कांबळे उर्तीर्ण झाल्याचे कळताच गावात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली गावातील अनेकांनी शरण कांबळेचे अभिनंदन केले आहे .

शरण कांबळेचे आईवडील मोलमजुरी करतात, मुलगा हुशार असल्यामुळे त्यांनी कष्टाच्या जोरावर मुलाला क्लासवन बनविले. शरण कांबळे उर्तीर्ण झाल्याचे कळताच गावकऱ्यांनाही अत्यानंद झाला,पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

कर्नाटक विद्यापीठामध्ये PhD करण्याची संधी! 17 फेब्रुवारीपर्यंत करू शकता अर्ज

धारवाड | धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठामध्ये 2020- 21 या शैक्षणिक वर्षाकरिता PhD साठी ‘ऍडमिशन नोटिफिकेशन’ आले आहे. एकूण 40 विषयांसाठी पूर्णवेळ PhD आणि पार्ट टाईम PhD प्रोग्रॅम अवेलेबल आहेत.

अर्जाचा दिनांक आणि अर्जाची फी:
अर्ज स्विकारण्याची शेवटचा दिनांक 17 फेब्रुवारी 2021 आहे. तसेच प्रवेश परीक्षा ही 26 फेब्रुवारी 2021 रोजी आहे. खुल्या गटासाठी प्रवेश परीक्षा शुल्क हे 2000 रुपये असून एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क 1000 रुपये इतके आहे.

PhD साठी एकूण 277 रिक्त जागा आहेत. यापैकी फॅकल्टी ऑफ आर्टसाठी 62, फॅकल्टी ऑफ कॉमर्ससाठी 04, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट करिता 18, फॅकल्टी ऑफ लॉ’साठी 2, सोशल सायन्सकरिता 63, तर सायन्ससाठी 128 इतक्या जागा आहेत. यामध्ये फुल टाइम एचडी आणि पार्टटाईम एचडीसाठी प्रवेश घेऊ शकता.

प्रवेश परीक्षा, प्रवेश परीक्षामधून exempted विद्यार्थी, सिलेक्शन प्रोसिजर आणि अशा इतर माहितीसाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा
वेबसाईट लिंक: https://www.kud.ac.in/cmsentities.aspx?type=notifications

IBPS परीक्षेतील CRP- Clerks-X चा निकाल जाहीर; मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र इथे करा डाऊनलोड

करिअरनामा ऑनलाईन | आयबीपीएस मार्फत घेण्यात येणारी क्लर्क परीक्षेचा निकाल लागला आहे. आपण परीक्षा दिली असल्यास तो निकाल पाहू शकता. सोबतच काही दिवसावर आलेल्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्रही वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.

मागील वर्षी 1 सप्टेंबर 2020 रोजी ibps-clerk-x परीक्षेचे फॉर्म सुटले होते. यानंतर 05 डिसेंबर 2020 पासून 13 डिसेंबर 2020 पर्यंत आयबीपीएस- क्लर्कची पूर्व परीक्षा झाली. निकाल हा पंधरा ते वीस दिवसात येत असतो. पण यावेळी निकालासाठी तब्बल अडीच महिने विद्यार्थ्यांना वाट पहावी लागली. यासोबतच मुख्य परीक्षेला दिवस कमी बाकी असल्यामुळे, मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्रही लगेच उपलब्ध करून दिले गेले आहे.

निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबर किव्वा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारिख तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. खाली निकाल आणि मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र पाहण्यासाठी लिंक देत आहोत.

निकाल डाऊनलोड करण्याची लिंक : ibps.in/crp-clerical-cadre-x/http://ibps.in/crp-clerical-cadre-x/

मुख्य परीक्षा प्रवेशपत्रासाठी लिंक: ibps.in/crp-clerical-cadre-x/

मुख्य परीक्षा दिनांक: 28 फेब्रुवारी 2021

IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक यांची लव्ह स्टोरी आहे खूपच भारी; कसं अन् कुठं जुळलं जाणुन घ्या

करिअरनामा ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे जुळली याबाबत..

मोक्षदा पाटील आणि अस्तिक कुमार हे दोघेही एका बॅचचे अधिकारी आहेत. यांची पहिली भेट मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमीमध्ये फाउंडेशन कोर्स मध्ये झाली. ओळखीतून मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसानंतर लग्नाच्या गाठी मध्ये अडकले. तेव्हापासून आजपर्यंत आठ वर्षाचा संसारात आणि देशसेवा सांभाळून दोघे एकमेकांसोबत आहेत. एकमेकांना प्रोत्साहन देत आहेत.

लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमी मध्ये मोक्षादा पाटील यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील आले असताना आस्तिक पांडे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनतर त्याच्या प्रेमाबद्दल सांगितले. आणि वडिलांनीही त्यांची चौकशी केल्यानंतर होकार कळवला. त्यानंतर दोघेही लग्नाच्या गाठीत अडकले. आता दोघाचीही पोस्टिंग औरंगाबादमध्ये असून आस्तिक पांडे हे औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. तर मोक्षदा पाटील या औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक म्हणून सेवा देत आहेत.

UPSC ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी दिलासादायक बातमी! वाढणार एक प्रयत्न

UPSC Bharti 2021

नवी दिल्ली | करोना लोकडाऊनच्या काळात UPSC आणि इतर परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही मोठा फटाका बसला. भितीदायक वातावरणामध्ये परीक्षा द्याव्या लागल्या. यामुळे मुलांना एक प्रयत्न वाढवून मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. त्यावर केंद्र शासनाने निर्णय घेतला असून, ऑक्टोबर 2020 मध्ये ज्या विद्यार्थ्याने आपला शेवटचा अटेम्प्ट दिला त्यांना एक अटेम्प्ट वाढवून मिळणार आहे.

यूपीएससीच्या यावर्षी येणाऱ्या नागरी सेवा परीक्षासाठी हा वाढीव अटेम्प्ट लागू असेल. त्यानंतर पुढील परिक्षेकरीता ही सुविधा उपलब्ध नसेल. खुल्या गटातील विद्यार्थी हे 32 वयापर्यंत 6 वेळा परीक्षा देऊ शकतात. तर ओबीसी विद्यार्थी वयाच्या 35 पर्यंत 9 वेळा परीक्षा देऊ शकतो. आणि एससी व एसटी प्रवर्गातील मुले हे वयाच्या 37 पर्यंत अमर्यादित वेळा परीक्षा देऊ शकतात.

कोरोनामुळे 31 मे 2020 रोजी होणारी परीक्षा ही 4 ऑक्टोबर 2020 ला घेण्यात आली. जवळपास 4.80 लाख वियार्थी या परीक्षेला बसले होते. मुख्य परीक्षा 8-17 जानेवारी दरम्यान घेतली गेली होती. यासाठी देशभरातून जवळपास 10,000 विद्यार्थी पूर्व परीक्षेतून निवडले गेले होते. यावर्षीचे नागरी सेवा परीक्षेचे नोटिफिकेशन हे 10 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.