Home Blog Page 55

RAMETI Recruitment 2024 : पुण्यात नोकरी!! ‘इथे’ निवड होणाऱ्यास मिळेल 1 लाख 75 हजारापर्यंत पगार

RAMETI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (RAMETI Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालयीन अधिक्षक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, पुणे
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक प्राध्यापक
2. वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक
3. कार्यालयीन अधिक्षक
4. ग्रंथपाल
पद संख्या – 10 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – Principal, Regional Agricultural Extension Management Training Institute (RAMETI) Pune and Divisional Administrative Training Institute, Pune – 5
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

भरतीचा तपशील – (RAMETI Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक07
वसतागृह तथा आवार व्यवस्थापक01
कायांलयोन अधिक्षक01
ग्रंथपान्न01

मिळणारे वेतन –

पदवेतन
सहाय्यक प्राध्यापकएस-१९ (५५१००- १. १७५१००)
वसतागृह तथा आवार व्यवस्थापकएस-१३ (३५४०० ११२४००)
कायांलयोन अधिक्षकएस-१३ (३५८०० ११२४००)
ग्रंथपान्नएम-८ (२५५०० : ८११००)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
3. अर्जासोबत आवश्यक (RAMETI Recruitment 2024) कागदपत्र जोडा.
4. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://vanamati.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC CGL Recruitment 2024 : तब्बल 17,727 जागांवर बंपर भरती!! SSC CGL अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी; त्वरा करा..

SSC CGL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरतीची (SSC CGL Recruitment 2024) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. यावर्षी SSC CGL पदभरती अंतर्गत तब्बल 17,727 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून SSC भारत सरकारच्या अंतर्गत विविध संस्था, विभाग आणि कार्यालयांसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.

SSC CGL भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रुप ‘B’ आणि ग्रुप ‘C’ पदे भरली (SSC CGL Recruitment 2024) जातील. यामध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इंस्पेक्टर, सब- इंस्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, सीनियर सेक्रेट्रिएट असिस्टंट/ अपर डिविजन क्लर्क, ऑडिटर, टॅक्स असिस्टेंट, अकाउंटंट/ जूनियर अकाउंटंट,जूनियर स्टेट्सटिकल ऑफिसर आणि स्टेट्सटिकल इनवेस्टिगेटर ग्रेड- II या पदांचा समावेश आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – कर्मचारी निवड आयोग
भरले जाणारे पद – स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर
पद संख्या – 17,727 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2024

अर्ज फी – रु. – 100/-
महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) आणि Exservicemen (ESM) यांच्यासाठी कोणतेही शुल्क नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षेचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
SSC CGLभरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तथापि, जे सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी/सहाय्यक लेखाधिकारी पदासाठी अर्ज करत आहेत त्यांच्याकडे पदवी आणि CA/CS/MBA/Cost & Management Accountant/Masters in Commerce/Masters in Business Studies असणे आवश्यक आहे. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (JSO) पदासाठी, मान्यताप्राप्त संस्थेची पदवी (12वी मध्ये किमान 60% गणित) आवश्यक आहे.
वय मर्यादा – (SSC CGL Recruitment 2024)
1. ज्या पदांसाठी वयोमर्यादा १८-२७ वर्षे आहे: जन्म २ ऑगस्ट १९९७ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००६ नंतर नसावा.
2. ज्या पदांसाठी वयोमर्यादा २० ते ३० वर्षे आहे : जन्म २ ऑगस्ट १९९४ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००४ नंतर नसावा.
3. ज्या पदांसाठी वयोमर्यादा १८-३० वर्षे आहे : जन्म २ ऑगस्ट १९९४ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००६ नंतर नसावा.
4. ज्या पदांसाठी वयोमर्यादा १८-३२ वर्षे आहे : जन्म २ ऑगस्ट १९९२ पूर्वी आणि १ ऑगस्ट २००६ नंतर नसावा.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना PDF/संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.
5. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी (SSC CGL Recruitment 2024) फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे तपासणे आवश्यक आहे.
6. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल/दुरुस्ती/फेरफार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै आहे.

Combined Graduate Level Examination 2024 संबंधित महत्वाच्या तारखा

Dales tor submission of online applications24-06-2024  to 24-07-2024
Last date and time for receipt of onlineapplications24-07-2024(23:00)
Last date and lime for making online fee payment25-07-2024)23:00)
Dates of “Window for Application Form Correction* including online pa\merit.10-08-2024 lo 11-08-2024(23:00)
Tentative Schedule of lier-I (Computer BasedKxamination)Sep-Oct. 2024
Tentative Schedule of Tier-II (Computer Based Examination)December. 2024

काही महत्वाच्या लिंक्स – (SSC CGL Recruitment 2024)
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर वायु भरती परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

Agniveer Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन एअर फोर्स ने त्यांच्या (Agniveer Recruitment 2024) अधिकृत वेबसाइटवर अग्निवीर एअर पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक जारी केली आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

IAF अग्निवीर वायु प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्याबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देण्यात आली आहे. शॉर्ट नोटिसमध्ये पुढे असे लिहिले आहे की; अग्नीवीर वायु सेवा 01/2025 च्या फेज-II चाचणीच्या पहिल्या बॅचचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध आहे. या लिंकवरुन https://agnipathvayu.cdac.in/avregcycle5/candidate/login उमेदवार प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात.

यापूर्वी जाहीर केलेल्या निवड प्रक्रियेनुसार, भारतीय (Agniveer Recruitment 2024) वायुसेनेच्या अग्निवीरवायू निवड प्रक्रियेत 3 टप्प्यांचा समावेश असेल. ज्यामध्ये फेज 1 ऑनलाइन परीक्षा, फेज 2 ऑनलाइन परीक्षा, फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT) आणि अनुकूलता चाचणी 1 आणि 2 आणि फेज 3 वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असेल.

वायुसेना अग्निवीर वायु प्रवेशपत्र 2024 असं करा डाउनलोड (Agniveer Recruitment 2024)
1. अग्निवीर वायू सेवा 01/2025 साठी फेज II चाचणी फेरीच्या पहिल्या बॅचसाठी उपस्थित राहिलेले उमेदवार खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण केल्यानंतर त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
2. भारतीय हवाई दल (IAF) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://agnipathvayu.cdac.in/.
3. आता होमपेजवर येणाऱ्या घोषणेवर जा.
4. तेथे तुम्हाला अग्निवीरवायू प्रवेश 01/2025 च्या पहिल्या बॅचच्या फेज-II चाचणीसाठी उमेदवारांच्या लॉगिनमध्ये प्रवेश पत्रांची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
5. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यावर आवश्यक तपशील टाका आणि लॉगिन करा.
6. लॉगिन केल्यानंतर, तुमचे प्रवेशपत्र तुमच्या समोर असेल, आता तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि पुढील वापरासाठी त्याची प्रिंट काढू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : फर्ग्युसन महाविद्यालयात ‘हे’ तीन अभ्यासक्रम शिकता येणार

Education

करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Education) फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) बौद्धिक संपदा अधिकार, औद्योगिक जैव संगणकीत मूलभूत कोर्स आणि जिओ इकॉनॉमिक्स हे तीन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहेत; अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

‘बौद्धिक संपदा अधिकार’ या अभ्यासक्रमात पेटंट कायदा, ट्रेडमार्क कायदा, नोंदणी प्रक्रिया, औद्योगिक डिझाईन नोंदणी, कॉपीराईट या विषयांचा समावेश असेल. पदवी घेणारे विद्यार्थी किंवा या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. ‘औद्योगिक जैव संगणकीत मूलभूत कोर्स’मध्ये नवीनतम (Education) जैवसंगणकीत साधने आणि तंत्रांचा वापर करून व्यावहारिक अनुभव मिळेल. ज्यामुळे जैविक डेटाचे प्रभावी विश्लेषण आणि अर्थ लावणे सोपे जाईल. विज्ञान शाखेतील पदवीधर, फार्मसी, एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, संगणक विज्ञान या क्षेत्रांतील विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.

‘जिओ इकॉनॉमिक्स’ या (Education) अभ्यासक्रमात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भूराजकीय परिस्थिती, परराष्ट्र धोरण व अर्थनीती, दहशतवाद व राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण व विकासात्मक प्रश्न या विषयांचा समावेश असेल. पदवी किंवा त्यापुढील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. तीनही अभ्यासक्रमांच्या अधिक माहितीसाठी www.fergusson.edu या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : गुरं राखणार तरुण बनला IPS; 6 वर्षात क्रॅक केल्या 12 सरकारी परीक्षा

UPSC Success Story of IPS Premsukh Delu

करिअरनामा ऑनलाईन । प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत विलक्षण (UPSC Success Story) यश मिळवणाऱ्या लोकांच्या कथा खूप प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी असतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे प्रेमसुख देलू यांची, जे एकेकाळी गुरंढोरं राखायचे. हो.. हे खरं आहे. गुरं राखणारे प्रेमसुख आज IPS अधिकारी बनले आहेत. जाणून घेवूया त्यांचा प्रवास कसा होता याविषयी….

घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची
राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील नोखा तहसीलमधील रायसर नावाच्या एका छोट्या गावात देलू कुटुंबीय वास्तव्य करतात. प्रेमसुख देलू यांचा जन्म 3 एप्रिल 1988 रोजी झाला. त्यांच्या (UPSC Success Story) कुटुंबाला शेतीची पार्श्वभूमी आहे पण पुरेशी शेत जमीन नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर खर्च भागत नव्हता. यासाठी त्यांचे वडील उंटाची गाडी चालवत आणि शेतीची साधने घेऊन जात. आर्थिक संकटे समोर उभी होती. यातून मार्ग काढण्यासाठी प्रेमसुखने सरकारी नोकरीत सामील होण्याचा विचार केला.

गुरं राखण्यासोबत केला अभ्यास
प्रेमसुख देलू (IPS Premsukh Delu) यांना सरकारी सेवेत दाखल व्हायचे होते. यासाठी त्यांना खूप अभ्यास करायला लागणार होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते कुटुंबाला हातभार लागावा यासाठी काम करत. एवढच नव्हेतर लहानपणी ते गुरे पाळण्याचे काम करायचे. गुरे राखण्यासोबतच त्यांचा अभ्यास सुरू होता.

6 वर्षात मिळाल्या 12 सरकारी नोकऱ्या
आपल्या अथक परिश्रमाने प्रेमसुख यांनी 6 वर्षात 12 सरकारी नोकऱ्या मिळवल्या. सुरुवातीला त्यांची बिकानेरमध्ये पटवारी म्हणून नियुक्ती झाली होती, पण त्यांना मोठे यश मिळवायचे होते म्हणून त्यांनी इतर स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यानंतर राजस्थान येथे झालेल्या ग्रामसेवक परीक्षेत त्यांनी दुसरा क्रमांक (UPSC Success Story) पटकावला. त्यानंतर राजस्थान पोलिसात उपनिरीक्षक पदासाठी निवड होऊनही त्यांनी हे पद न स्वीकारता राजस्थान सहायक कारागृह तुरुंग परीक्षेत यश मिळवून सहाय्यक जेलरच्या नोकरीला प्राधान्य दिले.

IPS होण्याचा ध्यास पूर्ण झाला
प्रेमसुख यांनी काही काळ शिक्षण विभागात शालेय अधिव्याख्याता म्हणून काही काळ काम केले आहे. त्यांचे स्वप्न आणखी मोठी ध्येय साध्य करण्याचे होते, म्हणून त्यांनी UPSC (UPSC) नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. 2015 मध्ये त्यांनी UPSC ची दुसऱ्यांदा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण भारतातून 170 वी रॅंक प्राप्त केली आणि ते IPS अधिकारी बनले.

IPS प्रेमसुख देलू यांना गुजरात केडर देण्यात आले होते (UPSC Success Story) आणि सुरुवातीला ते अमरेली, गुजरात येथे SP म्हणून तैनात होते. सध्या ते जामनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अशाप्रकारे, आयपीएस प्रेमसुख देलू यांची कथा ही यश आणि अथक परिश्रम आणि दृढनिश्चयाचे उत्तम उदाहरण आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : बँकेत मिळवा नोकरी!! जी.पी. पारसिक सहकारी बँकेत मॅनेजरसह विविध पदांवर भरती सुरू

Job Notification (16)

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची (Job Notification) इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही अपडेट महत्वाची आहे. जी.पी. पारसिक सहकारी बँकेत जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स) पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

संस्था – जी.पी. पारसिक सहकारी बँक
भरली जाणारी पदे –
1. जनरल मॅनेजर
2. डेप्युटी जनरल मॅनेजर
3. मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स)
पद संख्या – 07 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
31 जुलै 2024
भरतीचा तपशील – (Job Notification)

पदपद संख्या 
जनरल मॅनेजर02 पदे
डेप्युटी जनरल मॅनेज02 पदे
मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स)03 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजरGraduate/Post Graduate/MBA from recognized university and CAIIB and/or CA/CS/ICWA
डेप्युटी जनरल मॅनेजGraduate/Post Graduate/ MBA/ CA/ CS/ ICWA/ LL.B from recognized university and CAIIB
मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स)Qualified Chartered Accountant

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mai) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवशक (Job Notification) कागदपतत्राची प्रत जोडा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://gpparsikbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2024 : BECIL अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर/ज्युनिअर असिस्टंट पदावर नोकरीची संधी

BECIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट (BECIL Recruitment 2024) इंडिया लि.मध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे.

संस्था – ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लि.
भरले जाणारे पद –
डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन)
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता (पदानुसार) –
1. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – Educational Qualifications: Bachelor Degree or equivalent in
Computer Science/ Information Technology.
Preferable Experience in handling of FICS, INFOLNET, MS
Word, Excel and Laboratory information management
system (BECIL Recruitment 2024)
Required Experience: Minimum 1 year of experience in
handling the files and computer-related work of
Government Organization/ FSSAI notified Food Testing
Laboratory/Research Institute/any other organization.
2. कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन) (Multi-Tasking Staff) –
Educational Qualifications: SSLC/HSC (10th pass)
Required Experience: Minimum 1 year of experience in handling
the Food samples, Files/ Glass wares of FSSAI notified Food
Testing Laboratory/Research Institute/any other organization.
Proficient in Marathi and Hindi.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी – 885/- (SC/ST: Rs. 531/-)
मिळणारे वेतन – (BECIL Recruitment 2024)
1. डेटा एंट्री ऑपरेटर / कनिष्ठ सहाय्यक (प्रशासन)- 29,850/- रुपये दरमहा
2. मल्टी-टास्किंग स्टाफ (एमटीएस) – 27,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://becilregistration.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

National Housing Bank Recruitment 2024 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत मॅनेजर, ऑफिसर पदाच्या विविध जागांवर भरती; त्वरा करा

National Housing Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध (National Housing Bank Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, अर्ज विकसक, वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी, प्रकल्प वित्त अधिकारी, प्रोटोकॉल अधिकारी पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय गृहनिर्माण बँक
भरली जाणारी पदे –
1. महाव्यवस्थापक
2. सहायक महाव्यवस्थापक
3. उपव्यवस्थापक
4. सहाय्यक व्यवस्थापक
5. मुख्य अर्थशास्त्रज्ञ
6. अर्ज विकसक
7. वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी
8. प्रकल्प वित्त अधिकारी
9. प्रोटोकॉल अधिकारी
पद संख्या – 48 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2024
भरतीचा तपशील – (National Housing Bank Recruitment 2024)

पदपद संख्या 
महाव्यवस्थापक01 पदे
सहायक महाव्यवस्थापक01 पदे
उपव्यवस्थापक03 पदे
सहायक व्यवस्थापक18 पदे
मुख्य अर्थशास्त्रज्ञ01 पदे
अर्ज विकसक01 पदे
वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी10 पदे
प्रकल्प वित्त अधिकारी12 पदे
प्रोटोकॉल अधिकारी01 पदे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शुल्क भरणे (National Housing Bank Recruitment 2024) अनिवार्य आहे.
4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 आहे.
6. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
nhb.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IHMCL Recruitment 2024 : इंजिनियर्स/CA यांच्यासाठी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनीत भरती; मिळेल 1 लाख 40 हजारपर्यंत पगार

IHMCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अभियंता (ITS), अधिकारी (वित्त) पदांच्या एकूण 31 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. अभियंता (ITS)
2. अधिकारी (वित्त)
पद संख्या – 31 पदे
वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2024
भरतीचा तपशील – (IHMCL Recruitment 2024)

पदपद संख्या 
अभियंता (ITS)30
अधिकारी (वित्त)01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
अभियंता (ITS)Bachelor’s Degree of Engineering
अधिकारी (वित्त)Chartered Accountants (CA)

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
अभियंता (ITS)Rs. 40,000-1,40,000/-
अधिकारी (वित्त)Rs. 40,000-1,40,000/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (IHMCL Recruitment 2024) तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://ihmcl.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Air India Recruitment 2024 : Air India च्या 600 पदांसाठी 25 हजार तरुण रांगेत; मुंबई विमानतळावर गोंधळ आणि चेंगराचेंगरी

करिअरनामा ऑनलाईन । बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस (Air India Recruitment 2024) गंभीर बनत चालली आहे. भारतात अनेक दशकांपासून बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. पण अजूनही देशातील बेरोजगारी मिटली नाही. याचं ताजं उदाहरण आज मुंबईत पाहायल मिळालं. एअर इंडियाने (Air India) भरती जाहीर केली होती. 600 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. या 600 जागांसाठी मुलाखत द्यायला तब्बल 25 हजार तरुणांनी गर्दी केली. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. एअर इंडियातर्फे एअरपोर्ट लोडर पदासाठी (Airport Loader) भरती काढण्यात आली होती. पण 600 जागांसाठी 25 हजाराहून अधिक बेरोजगरांनी गर्दी केल्याने मुंबई विमानतळावर एकच तारांबळ उडाली. एअर इंडिया कर्मचाऱ्यांना गर्दी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागली.

कोणत्या पदासाठी निघाली भरती?
एअर इंडियात ‘लोडर’ पदासाठी ही भरती करण्यात येत आहे. या नोकरीत विमानातून सामान उतरवण्याचं आणि चढवण्याचं काम असतं. प्रत्येक विमानातील सामान, कार्गो आणि इतर (Air India Recruitment 2024) सामान उतरवण्यासाठी किंवा चढवण्यासाठी 5 ते 6 लोडर असतात. लोडरचा दरमहा पगार 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत असतो. ओव्हरटाईम केल्यास पगार 30 हजारांपर्यंत जातो. लोडर पदासाठी शिक्षणाची अट 10 वी पास असते पण उमेदवार शरीराने तंदरुस्त असायला हवा अशीही अट असते.

उमेदवारांची एकमेकांना धक्काबुक्की (Air India Recruitment 2024)
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई विमानतळावरची ही दृश्ये देशातील बेरोजगारीची भीषणता दाखवण्यासाठी पुरेशी असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावरुन आता राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत मुंबई विमानतळावर तरुणांची तुफान गर्दी दिसतेय. आपला नोकरीचा अर्ज काऊंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी हजारोंच्या संख्यने आलेले तरुण एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com