Home Blog Page 42

Big News : धक्कादायक!! 30 टक्के भावी शिक्षक परीक्षेत नापास; वाचा सविस्तर…

Big News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Big News) घेतलेल्या डीएड (D.El.Ed) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत मराठी व इंग्रजी माध्यमाचे तब्बल 30 टक्के शिक्षक नापास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचा डी.एड. चा निकाल 71.66 टक्के लागला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे.

राज्य परीक्षा परिषदेने जून 2024 मध्ये 6 जून ते 14 जून या कालावधीत परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना (Big News) निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्यासाठी 21 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

पास, नापास आकडेवारी अशी आहे (Big News)
डीएड द्वितीय वर्ष परीक्षेसाठी मराठी माध्यमाच्या 12 हजार 342 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 11 हजार 948 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले. प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 8 हजार 656 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 3 हजार 686 विद्यार्थी नापास झाले. मराठी माध्यमातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या (Big News) उत्तीर्णतेची टक्केवारी 70.13 टक्के आहे. इंग्रजी माध्यमातून 1 हजार 739 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 1 हजार 689 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 1 हजार 237 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा एकूण निकाल 71.13 टक्के एवढा लागला आहे.

डी. एड. द्वितीय वर्षाच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे –
1. माध्यम – मराठी, पास विद्यार्थी – 11948, नापास विद्यार्थी – 3686, टक्केवारी – 70.13%
2. माध्यम – उर्दू, पास विद्यार्थी – 2817, नापास विद्यार्थी – 648, टक्केवारी – 77.48%
3. माध्यम – हिंदी, पास विद्यार्थी – 301, नापास विद्यार्थी – 65, टक्केवारी – 78.96%
4. माध्यम – इंग्रजी, पास विद्यार्थी – 1689, नापास विद्यार्थी – 502, टक्केवारी – 71.13%
5. माध्यम – कन्नड, पास विद्यार्थी – 34, नापास विद्यार्थी – 03, टक्केवारी – 91.43%
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Business Success Story : 12 वर्षे दुसऱ्याची चाकरी; एक आयडिया आणि उभारली 41 हजार कोटींची कंपनी

Business Success Story of Gracias Saldanha

करिअरनामा ऑनलाईन । 12 वर्षे दुसऱ्याची चाकरी केल्यानंतर, ग्रेसियस सलधना (Business Success Story) यांना जाणवले की त्यांनी स्वतःसाठी इतके कष्ट घेतले असते तर काय झाले असते. पण ही गोष्ट त्यांना उशिरा लक्षात आली असली तरी सलधना यांनी केवळ एक लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची सुरुवात 1977 मध्ये झाली आहे. आज या कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 41,000 कोटी रुपये आहे. त्यांची उत्पादने लाखो लोकांचे प्राण वाचवत आहेत. कृपा सलधना आणि त्यांच्या कंपनीची यशोगाथा खूपच रंजक आहे.

गोव्यातील साळीगाव या छोट्या पण अतिशय सुंदर गावात जन्मलेल्या ग्रेसियस सलधना (gracias saldanha) यांनी आपल्या कंपनीचे नाव आपल्या दोन मुलांवर ठेवले आहे. कंपनीचे नाव पहिल्यांदा ऐकून (Business Success Story) तुम्हाला वाटेल की ती परदेशी आहे, पण तसे नाही. सलधना यांना दोन मुले आहेत. एकाचे नाव ग्लेन आणि दुसऱ्याचे नाव मार्क. आतापर्यंत कंपनीचे नाव तुमच्या लक्षात आले असेलच. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स असे या कंपनीचे नाव आहे.

संपूर्ण गोव्याला कृपा सलधना यांचा अभिमान ( Business Success Story)
आता फक्त त्यांच्या गावालाच नाही तर संपूर्ण गोव्याला कृपा सलधना यांचा अभिमान आहे. विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या साळगावच्या पहिल्या पदवीधरांपैकी ते एक होते. त्यांनी विज्ञानाची पदवी घेतल्यानंतर नोकरीला सुरुवात केली. नोकरी करत असताना ते एकदा गावी परत आले तेव्हा त्यांना गावातील लोकांची तब्येत बिघडलेली दिसली. तिथूनच त्यांनी ठरवले की लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला काहीतरी करायचे आहे. त्यांनी जे केले ते आज आपल्या सर्वांसमोर आहे.

सर्व सामान्यांना परवडणारी प्रभावी औषधे बनवण्याचे स्वप्न
‘ग्लेनमार्क’ कंपनी सुरू करण्याचा हेतू फक्त जेनेरिक औषधे आणि API तयार करणे असा होता. एपीआय हे औषधाचे मुख्य घटक आहेत, ज्यामुळे औषध प्रभावी कार्य करते. काही औषधांमध्ये एकापेक्षा जास्त API असतात, जे शरीरात वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. आता जेनेरिक औषधांबद्दल बोलूया. ब्रँडेड औषधांपेक्षा जेनेरिक औषधे स्वस्त आहेत. यामध्ये ब्रँडेड औषधांसारखेच API असतात, जरी आवश्यक नसलेले घटक वेगळे असू शकतात. ते ब्रँडेड औषधांप्रमाणेच काम करतात. जेनेरिक आणि एपीआय तयार करण्यासाठी धडपडत असताना, त्याला वेळ लागेल हे कृपा सलधना यांना माहित होते.

औषधे ठरली सुपरहिट
1979 मध्ये, ग्लेनमार्क यांनी त्वचा रोगांच्या बाजारपेठेत प्रवेश (Business Success Story) केला आणि बुरशीजन्य संसर्गासाठी कॅन्डिड क्रीम लाँच केले. त्याचे परिणाम पाहून डॉक्टरांनी त्याची शिफारस करण्यास सुरुवात केली आणि हे औषध बघता बघता हिट झाले. सलधना यांनी 1985 मध्ये खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी एस्कोरिल लॉन्च केले आणि ते औषध सुध्दा सुपरहिट ठरले.

गोवा ते ग्लोबल मार्केट
Candid आणि Ascoril ने केवळ भारतीय बाजारपेठेतच धुमाकूळ घातला नाही, तर इतर देशांमध्येही या औषधांची मागणी वाढली. गोव्यातील ग्लेनमार्क कंपनी 1999 मध्ये जागतिक स्तरावर पोहोचली. औषध विकासावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने, कंपनीने नाशिकमधील सिन्नर येथे संशोधन आणि विकास (R&D) केंद्र उघडले. 2000 पर्यंत कंपनीबद्दल बरीच चर्चा झाली. त्याचवर्षी कंपनीने शेअर बाजारात आपला IPO लॉन्च केला. कंपनी 1760 कोटी रुपयांच्या मुल्यांकनावर सूचीबद्ध झाली होती.

भारतातील 5वी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी
संशोधनावर लक्ष केंद्रित करून कंपनीने दोन एपीआय सुविधा सुरू केल्या. ग्लेनमार्क 1760 कोटी रुपयांच्या मुल्यांकनाने शेअर बाजारात लिस्ट झाला. त्यांनी संशोधनावर लक्ष केंद्रित केले आणि दोन API वैशिष्ट्ये उघडली. 2008 मध्ये, चार मेगा आउट-परवाना सौद्यांवर स्वाक्षरी केल्यानंतर 8160 कोटी रुपयांच्या मुल्यांकनासह ती भारतातील 5वी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी बनली.

परदेशातून होते 66 टक्के कमाई
ग्लेनमार्कचे उत्पन्न 2003 मधील 260 कोटी रुपयांवरून 2014 मध्ये 6010.37 कोटी रुपयांपर्यंत वाढले. विक्रीतूनच ही कंपनी 1 अब्ज डॉलर्सची कंपनी बनली आणि तिच्या कमाईपैकी 66% यूएसए, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधून आले.

कंपनीची 6 हजार उत्पादने
2018 पर्यंत, ग्लेनमार्कने कँडीड क्रीमपासून 6000 उत्पादनांपर्यंत विस्तार केला, ज्यामध्ये श्वसन, त्वचा आणि कर्करोग (ऑन्कॉलॉजी) या क्षेत्रांचा समावेश होता. 9,185.34 कोटी रुपयांच्या कमाईसह आणि 80 देशांमध्ये ऑपरेशन्ससह, ती भारतातील चौथी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आणि दुसरी सर्वात वेगाने वाढणारी कंपनी बनली.

रेवेन्यूच्या बाबतीत घोड्यावर स्वार आहे कंपनी
जर आपण मार्च 2024 च्या वार्षिक आकडेवारीवर नजर टाकली तर, कंपनीने 9,059.1 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यापैकी निव्वळ नफा 5,167.3 कोटी रुपये होता. भारतीय देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) जून 2023 तिमाहीपासून कंपनीतील त्यांची भागीदारी सातत्याने वाढवली आहे.
एकूणच, ग्रेसियस सलधना यांनी एक कंपनी तयार केली आहे जीने जगभरात आपले स्थान निर्माण केले आहे. 2011 मध्ये सलधाना गोव्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले गेले. 2012 मध्ये कृपा सलधना यांनी जगाचा निरोप घेतला. आता त्यांचे कुटुंब ही कंपनी सांभाळत आहे. सलधना फॅमिली ट्रस्टकडे कंपनीचे ४५.४५ टक्के शेअर्स आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Digital India Corporation Recruitment 2024 : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी; लगेच करा Apply

Digital India Corporation Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची मोठी संधी (Digital India Corporation Recruitment 2024) निर्माण झाली आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या रिक्त पदे, पात्रता, अर्ज प्रक्रिया…

संस्था – डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन
भरले जाणारे पद – हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार
पद संख्या – 118 पदे (Digital India Corporation Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
हेड SeMT३१
सल्लागार४७
 वरिष्ठ सल्लागार४०

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Digital India Corporation Recruitment 2024)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
हेड SeMTB.E. / B. Tech. /MCA, M.Tech/ M.S/ MBA
सल्लागारB.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S
वरिष्ठ सल्लागारB.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक खाली दिली आहे.
3. मुदती नंतर प्राप्त (Digital India Corporation Recruitment 2024) झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.
निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. मुलाखतीसाठी केवळ (Digital India Corporation Recruitment 2024) निवडलेल्या उमेदवारांना बोलावले जाईल.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
dic.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : सांगू शकाल?? कोणत्या देशात मुलीचं लग्न झाल्यावर सरकारी नोकरी मिळते? जनरल नॉलेज वाढवणारे प्रश्न..

GK Updates 7 Aug.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

1. (GK Updates) असा कोणता देश आहे जिथं मुलीचं लग्न झाल्यावर सरकारी नोकरी मिळते?
उत्तर- आइसलँड
2. कोणत्या प्राण्याचं रक्त निळं असतं?
उत्तर- गोगलगाय, कोळी आणि ऑक्टोपस

3. कोणत्या देशात सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे फ्री आहे?
उत्तर- लक्झमबर्ग (GK Updates)
4. कोणत्या देशात एकही नदी नाही?
उत्तर- सौदी अरेबिया

5. पृथ्वीवरील कोणत्या देशात एकही रेल्वे ट्रॅक नाही?
उत्तर- भूतान, सायप्रस, आइसलँड इत्यादी असे देश आहेत की जिथं एकही रेल्वे ट्रॅक नाही.
6. ताजमहालची निर्मिती मुमताजच्या मृत्यूच्या आधी झाली की नंतर?
उत्तर- मुमताज यांचं निधन (GK Updates) बुरहानपूर येथे १७ जून १६३१ रोजी झालं होतं. त्यानंतर ताजमहालची निर्मिती झाली ज्याचं काम १६३४ साली पूर्ण झालं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaTransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत तब्बल 2623 पदांवर मेगाभरती जाहीर

MahaTransco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल 2623 पदे भरली जाणार आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
भरले जाणारे पद – विद्युत सहाय्यक
पद संख्या – 2623 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 18 ते 38 वर्ष

अर्ज फी – (MahaTransco Recruitment 2024)
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. ५००/-
2. BC, EWS, अनाथ उमेदवार – रु. २५०/-
मिळणारे वेतन –
विद्युत सहाय्यक – रु. १५,०००/- ते रु. १७,०००/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
3. ऑनलाईन अर्ज सादर (MahaTransco Recruitment 2024) करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
4. उमेदवारांनी नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.mahatransco.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2024 : बंपर भरती!! पश्चिम-मध्य रेल्वेत तब्बल 3317 पदांवर भरती सुरू; पात्रता 10 वी, 12 वी पास

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेत नोकरी करण्याची अनेक तरुणांची (Railway Recruitment 2024) इच्छा असते. अशा तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 3317 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – पश्चिम-मध्य रेल्वे, भारत सरकार
भरले जाणारे पद – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पद संख्या – 3317 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) –
1. मेडिकल लॅब टेक्निशियन – 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology), NCVT/SCVT
2. उर्वरित ट्रेड – 10वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण
अशी होणार निवड –
उमेदवारांची निवड गुणवत्ता (Railway Recruitment 2024) यादीच्या आधारे केली जाईल. 10वी परीक्षेत मिळालेल्या सरासरी गुणांवर किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) तसेच ITI/ट्रेड गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

वय मर्यादा – (Railway Recruitment 2024)
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट
3. OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/ – ₹ 141/-
2. SC/ST/PWD/महिला – ₹41/-

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – nitplrrc.com

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : ‘या’ठिकाणी सरकारी नोकरीची मोठी संधी!! अर्ज केल्यानंतर द्या थेट मुलाखत

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय (Government Job) वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ निवासी, आवासी भिषक, वरिष्ठ निवासी, प्रबंधक या पदांच्या एकूण 128 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड
भरले जाणारे पद –
1. कनिष्ठ निवासी
2. आवासी भिषक
3. वरिष्ठ निवासी
4. प्रबंधकांची
पद संख्या – 128 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नांदेड
अर्ज फी – Rs.200/-

अर्ज करण्याची पद्धत (Government Job) – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवासी निवासी विभाग, मा. अधिष्ठाता यांचे कार्यालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी नांदेड
मुलाखतीची तारीख – 29 ऑगस्ट 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
कनिष्ठ निवासी05
आवासी भिषक20
वरिष्ठ निवासी95
प्रबंधकांची08

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे (Government Job) अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
4. अधिक माहितीसाठी drscgmcnanded.in या वेबसाईटला भेट द्या.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे.
7. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने दिलेल्या (Government Job) तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
4. मुलाखतीची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
5. मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
पद क्र. 1 – PDF
पद क्र. 2 – PDF
पद क्र. 3 – PDF
पद क्र. 4 – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.drscgmcnanded.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Department of Space Recruitment 2024 : भारत सरकारच्या अंतरिक्ष विभागात विविध पदांवर नोकरीची संधी

Department of Space Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Department of Space Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकार, अंतरिक्ष विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक, सहायक संचालक आणि विभाग अधिकारी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – भारत सरकार, अंतरिक्ष विभाग
भरली जाणारी पदे –
1. उपसंचालक
2. सहायक संचालक
3. विभाग अधिकारी
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर 2024
वय मर्यादा – 50 वर्ष

भरतीचा तपशील – (Department of Space Recruitment 2024)

पदपद संख्या 
उपसंचालक04
सहायक संचालक09
विभाग अधिकारी02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
उपसंचालकB.E. / B.Tech. OR M.Sc. with minimum 65% marks or 6.84 CGPA from a recognized University OR equivalent qualification.
सहायक संचालकB.E. / B.Tech. OR M.Sc. with minimum 65% marks or 6.84 CGPA from a recognized University OR equivalent qualification.
विभाग अधिकारीDegree in Law with 1st Class from recognised University or equivalent.

मिळणारे वेतन –

पदवेतन
उपसंचालकRs. 2,46,780/per month (Level 13 A)
सहायक संचालकRs. 1,52,640/per month (Level 12)
विभाग अधिकारीRs. 91,080/per month (Level 8)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या (Department of Space Recruitment 2024) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.
5. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.inspace.gov.in/inspace

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : व्यवस्थापक, लिपिक, शिपाई पदावर मोठी भरती; ‘इथे’ करा अर्ज

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Banking Job) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक, उप व्यवस्थापक, लिपिक, शिपाई पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 09 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
पद संख्या – 179 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. व्यवस्थापक (MGR) – 03 पदे
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
2 . उप व्यवस्थापक (Dy. MGR) – 06 पदे
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
3. लिपिक (Clerk) – 131 पदे
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
4. शिपाई (Peon) – 39 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024 (04:00 PM)
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 40 वर्षे
परीक्षा फी – ₹1000/- (Banking Job)
नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी

मिळणारे वेतन (Banking Job) –
1. व्यवस्थापक – 43,204/- रुपये दरमहा
2. उप व्यवस्थापक- 36,674/- रुपये दरमहा
3. लिपिक (Clerk)- 21,855/- रुपये दरमहा
4. शिपाई – 19,090/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://ratnagiridccbank.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Engineering Admission 2024 : इंजिनिअरिंग प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक पहा एका क्लिकवर

Engineering Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET) इंजिनिअरिंग (Engineering Admission 2024) प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्ष, एमबीए आणि एमसीए (Engineering First Year (BE/ BTech), Engineering Direct Second Year, (MBA and MCA) या अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी दि. 14 ऑगस्टला जाहीर होणार आहे तर अंतिम गुणवत्ता यादी दि. 8 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार
अभियांत्रिकी प्रथम वर्ष बीई/बीटेक पदवी प्रवेशासाठी (Engineering Admission 2024) यावर्षी 1 लाख 92 हजार 360 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांची दि. 8 ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरायचे आहेत. तर पहिली गुणवत्ता यादी दि. 14 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. या वर्षी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहे त्यातील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तर शेवटची फेरी संस्थास्तरावर होईल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर आहे.

असं आहे प्रवेश प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक (Engineering Admission 2024)
1. दि. ८ ऑगस्ट रोजी पहिली अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार.
2. दि. ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान, पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवता येणार.
3. दि. १४ ऑगस्ट रोजी पहिली प्रवेश यादी प्रसिद्ध होणार.
4. दि. १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार.
5. दि. १९ ऑगस्ट रोजी दुसर्‍या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर केल्या जाणार.
6. दि. २० ते २२ ऑगस्ट रोजी दुसर्‍या यादीचे पसंतीक्रम नोंदवता येणार.
7. दि. २६ ऑगस्ट रोजी दुसरी (Engineering Admission 2024) गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार.
8. दि. २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत दुसर्‍या यादीतील उमेदवारांना प्रवेश घेता येणार.
9. दि. ३० ऑगस्ट रोजी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध केला जाईल.
10. दि. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर रोजी पसंतीक्रम नोंदवता येणार.
11. दि. ५ सप्टेंबर रोजी तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार.
12. दि. ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या यादीतील उमेदवारांना प्रवेश घेता येणार.
13. दि. १० ते १३ सप्टेंबर या कालावधीत संस्थास्तरावर उमेदवारांचे प्रवेश घेतले जाणार.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com