Home Blog Page 318

Career In Architecture : आर्किटेक्ट व्हायचंय!! शिक्षणाची अट काय? कुठे मिळेल संधी? पगार किती मिळतो? इथे मिळेल संपूर्ण माहिती…

Career In Architecture

करिअरनामा ऑनलाईन । दहावी बारावी झाल्यानंतर (Career In Architecture) पुढे काय ? हा प्रश्न अनेक तरुणांना पडतो. अनेकजणांना मेडिकल आणि इंजिनियरिंगमध्ये करिअर करायची इच्छा नसते. हे विद्यार्थी करिअरची वेगळी वाट शोधत असतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला आर्किटेक्चरमधील करिअरच्या संधी विषयी सांगणार आहोत.
आर्किटेक्चर हा करिअरच्या अनेक चांगल्या पर्यायांपैकी एक पर्याय आहे. इमारतींचे डिझाईन, नियोजन आणि बांधकाम करणे याला आर्किटेक्चर म्हणतात.

काय असतं आर्किटेक्चरचं काम
1. प्रथम कोणत्याही संरचनेचा आराखडा तयार करणे आणि नंतर त्याची रचना तयार करणे त्या नंतर ते बांधकाम करणे.
2. कोणतीही वास्तू बनवण्यापूर्वी त्याची पूर्ण तयारी करावी लागते, जी वास्तुशास्त्राने केली जाते.
3. ही वास्तू कशी बांधली जाईल आणि ती कशी असेल हे आर्किटेक्चर सांगतात.
4. आर्किटेक्चरला आधी इमारतीच्या सर्व गोष्टी (Career In Architecture) माहीत असतात, मग त्याचा आराखडा बनवला जातो, आराखडा बनवल्यानंतरच पुढे इमारतीचे काम सुरू केले जाते.
5. आर्किटेक्चर विविध प्रकारचे डिझाइन तयार करण्यात माहिर असतात.

कोणता कोर्स कराल
1. आर्किटेक्चर होण्यासाठी तुम्ही गणित आणि इंग्रजी विषयात बारावी उत्तीर्ण असणे तसेच इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयांत किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असले पाहिजे.
2. जर तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा कोर्स केला असेल, तर तुम्ही आर्किटेक्चरची पदवी घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण होण्याचीही गरज नाही.
3. आर्किटेक्चरची होण्यासाठी तुम्ही 10वीनंतर आर्किटेक्टकमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स करू शकता. त्याचबरोबर 12 वी नंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ आर्किटेक्चर आणि पीएचडी देखील करता येते.
हे सॉफ्टवेअर शिकावे लागतात (Career In Architecture)
1. आर्किटेक्टला केवळ ही पदवी मिळवून पूर्ण काम मिळत नाही, त्यांना ऑटोकॅड किंवा असे काही सॉफ्टवेअर शिकावे लागते ज्यामध्ये हे लोक आर्किटेक्टक डिझाइन तयार करतात आणि या माध्यमातून ते इमारत डिझाइन करू शकतात.
2. सॉफ्टवेअरमध्ये काम करण्यासाठी, तुमच्यासाठी स्केचअप, रेविट, 3डी स्टुडिओ मॅक्स, ऑटोकॅड, व्ही-रे फोटोशॉप आणि हँड ड्रॉइंग जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

आर्किटेक्टमध्ये करिअरच्या संधी
1. आर्किटेक्चर म्हणून तुम्ही खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी कोणत्याही क्षेत्रात तुमचे करिअर करू शकता. सार्वजनिक क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, आरोग्य यांसारख्या विभागांमध्ये आर्किटेक्चरांची मागणी कायम आहे.
2. तसेच सरकारी क्षेत्रात, तुम्ही पुरातत्व विभाग, संरक्षण मंत्रालय, रेल्वे, स्थानिक एजन्सी, राज्य विभाग, गृहनिर्माण येथे नोकऱ्या शोधू शकता. तुम्हाला काही वर्षांचा (Career In Architecture) अनुभव मिळाल्यास, तुम्ही सल्लागार आणि कन्स्ट्रक्टर म्हणून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. बांधकाम क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीमुळे वास्तुकलाची मागणी सातत्याने वाढत आहे. तज्ञांच्या मते, भारतातील वास्तुकलाची मागणी आणि पुरवठा यामध्ये अजूनही मोठी तफावत असल्याचे दिसून येते.
किती मिळू शकतो पगार
1. आर्किटेक्चर म्हणून काम करताना संस्थेच्या आकारावर आणि तुमच्या अनुभवावर पगार अवलंबून असतो.
दोन ते चार वर्षांच्या अनुभवानंतर, तुमचा मासिक पगार 50,000 रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. दुसरीकडे सरकारी क्षेत्रातील वेतनश्रेणीनुसार तुम्हाला लाखात पगार मिळू शकतो.
2. आर्किटेक्चरमधल्या करिअरमध्ये मोठ्या कमाईची क्षमता आहे. विशेषत: ज्यांच्याकडे यशस्वी प्रकल्पांचा मजबूत पोर्टफोलिओ आहे, उच्च-गुणवत्तेचं (Career In Architecture) काम वितरीत केल्याची ओळख आहे आणि व्यवसाय वाढवण्याची क्षमता आहे, ते या क्षेत्रात भरपूर कमाई करू शकतात. आर्किटेक्ट्सना चांगला पगार मिळतो. भारतातल्या आर्किटेक्ट्सना सरासरी 9 लाख 50 हजार रुपये वार्षिक पगार मिळत आहे. हे आकडे अनुभव, ठिकाण आणि नियोक्त्याच्या प्रकारानुसार बदलू देखील शकतात.

करिअरमध्ये लवचिकता
लवचिकता हा या क्षेत्रात करिअर करण्याचा एक मोठा फायदा आहे. आर्क्टिटेक्टकडे आर्किटेक्चर फर्म, सरकारी एजन्सी, ना-नफा संस्था किंवा सेल्फ-एम्प्लॉइड (Career In Architecture) कन्सल्टंट म्हणून काम करण्यासारखे विविध प्रकारचे पर्याय आहेत. यामुळे आर्क्टिटेक्ट्सना आपली आवड, कौशल्यं आणि इतर उद्दिष्टांसाठी सर्वोत्तम पर्याय निवडण्याची संधी मिळते.
आर्किटेक्चर कोर्स करण्यासाठी देशातील इन्स्टिट्यूट
1.स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, नवी दिल्ली
2. IIT खरगपूर (IIT खरगपूर)
3. IIT रुड़की (IIT रुड़की)
4. सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (Career In Architecture)
5. NIT, तिरुचिरापल्ली (NIT, तिरुचिरापल्ली)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : डिप्लोमा/ग्रॅज्युएट्ससाठी यंग फेलोंची भरती; दरमहा मिळवा 35 हजार पगार

Government Jobs (40)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज (Government Jobs) संस्थेअंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग फेलो पदाच्या एकूण 141 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था
भरले जाणारे पद – यंग फेलो
पद संख्या – 141 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मे 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/पीजी डिप्लोमा इन सोशल सायन्स आणि सॉफ्ट स्किल्स ऑनलाइन प्रशिक्षण आणि एमएस ऑफिसमध्ये प्रवीणतेसह रिपोर्टिंग.
मिळणारे वेतन – 35,000/- रुपये दरमहा
वय मर्यादा – 35 वर्ष
अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS – 300/- रुपये
SC/ST – फि नाही. (Government Jobs)
PWD/ Female – फि नाही.

असा करा अर्ज –
1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था च्या अधिकृत वेबसाईट www.nirdpr.org.in ला भेट द्या.
3. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 8 मे 2023 आहे.
4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Government Jobs)
6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.nirdpr.org.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : Competitive Examमध्ये प्रभावी व्यक्तींबद्दल विचारले जातात ‘हे’ प्रश्न, जाणून घ्या उत्तरे

GK Updates 3 May

करिअरनामा ऑनलाईन । विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक प्रभावशाली (GK Updates) व्यक्तींच्या योगदानातून हे जग निर्माण झाले आहे. हे योगदान मानवी समाजासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना प्रश्न विचारले जातात. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करुन सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण अशाच काही व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेणार आहोत…
प्रश्न 1. थिऑसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण होते आणि भारतात होम रूल लीगची सुरुवात केली?
(A) अॅनी बेझंट
(B) आचार्य नरेंद्र देवी
(C) लाल-बाल-पाली
(D) वरीलपैकी काहीही नाही
उत्तर- A
प्रश्न 2. राजीव गांधी यांची हत्या कोणत्या वर्षी झाली?
(A) १९९०
(B) १९९१
(C) १९९२
(D) १९९३
उत्तर – B (GK Updates)

प्रश्न 3. सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व कोणत्या वर्षी मिळाले?
(A) १९८२
(B) १९८४
(C) १९८५
(D) १९८७
उत्तर – B
प्रश्न 4. भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती कोण आहेत?
(A) एम व्यंकय्या नायडू
(B) मोहम्मद हमीद अन्सारी
(C) ओम बिर्ला
(D) जगदीप धनखड
उत्तर- D
प्रश्न 5. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
(A) पंडित जवाहरलाल नेहरू
(B) लाल बहादूर शास्त्री
(C) गुलजार लाल नंदा (GK Updates)
(D) वरीलपैकी काहीही नाही
उत्तर- A
प्रश्न 6. उझबेकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?
(A) अब्दुल हाशिम मुतालोवी
(B) ओस्तागर सुलतानोव
(C) इस्लाम करीमोव्ह
(D) निगमटिल्ला युलदाशेव
उत्तर- C

प्रश्न 7.  खालीलपैकी कोणती प्रख्यात व्यक्ती, जो चक्री घराण्यातील राम नववा म्हणून थायलंडचा नववा सम्राट होता?
(A) सिरिकित किटियाकर
(B) वजिरालोंगकॉर्न
(C) आनंद महिदोली
(D) भूमिबोल अदुल्यादेज
उत्तर- D
प्रश्न 8. एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली महिला आणि प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई करून सातही शिखरे सर करणारी पहिली महिला कोण बनली?
(A) जुनको तबीक
(B) बचेंद्री पाली
(C) संतोष यादव
(D) प्रेमलता अग्रवाल
उत्तर- A
प्रश्न 9. भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण?
(A) सुषमा स्वराज
(B) जयललिता (GK Updates)
(C) प्रतिभा पाटील
(D) इंदिरा गांधी
उत्तर- D
प्रश्न 10. खालीलपैकी कोणाला पॉकेट हरक्यूलिस म्हणून ओळखले जाते?
(A) ए. माइक टायसन
(B) मनोहर आईच
(C) मनोतोष रॉय
(D) मुहम्मद अली
उत्तर – B
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2023 : 8वी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी!! BECIL मध्ये भरतीसाठी आजच करा Apply

BECIL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया (BECIL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 आहे.
संस्था – ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड
पद संख्या – 50 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BECIL Recruitment 2023)
1) वैद्यकीय अधिकारी – 04 पदे
उमेदवार स्पेशॅलिटी मध्ये एमडी /एमएस (Ayu) असणे आवश्यक.
2) लॅब अटेंडंट- 03 पदे
उमेदवाराकडे कोणत्याही बोर्डातून 12वी उत्तीर्ण सह 04 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी सह 02 वर्षे अनुभव असावा.
3) प्रभाग परिचर – 10 पदे
उमेदवार 8वी परीक्षा उत्तीर्ण सह 01 वर्षे अनुभव असावा.
4) डेटा एंट्री ऑपरेटर- 15 पदे
उमेदवार पदवीधर, एक वर्षाचा डिप्लोमा इन संगणक अनुप्रयोग, 01 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
5) स्थापत्य अभियंता- 01 पद (BECIL Recruitment 2023)
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठाकडून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई./बी.टेक, 02 वर्षे अनुभव किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा, 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

6) विद्युत अभियंता- 01 पद
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठाकडून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई./बी.टेक, तसेच 02 वर्षे अनुभव किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा, 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक.
7) पॅथॉलॉजिस्ट (बायोकेमिस्ट) – 01 पद
उमेदवाराकडे एमसीआयने मान्यताप्राप्त संबंधित प्रवाहात पीजी पदवी सह 01 वर्षे अनुभव असावा.
8) सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01 पद
उमेदवाराकडे एमसीआयने मान्यताप्राप्त संबंधित प्रवाहात पीजी पदवी सह 01 वर्षे अनुभव असावा.
9) ईसीजी तंत्रज्ञ- 01 पद (BECIL Recruitment 2023)
उमेदवाराकडे विज्ञान विषयात 10+2, मान्यताप्राप्त संस्थापासून ईसीजी तंत्रज्ञ डिप्लोमा, तसेच 01 वर्षे अनुभव असावा.
10) गार्डनर – 02 पदे
उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
11) एमटीएस – 10 पदे
उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
12) चालक – 01 पद
उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक, तसेच जड वाहने चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे, 03 ते 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

परीक्षा फी – (BECIL Recruitment 2023)
जनरल/ओबीसी, ESM : 885/- रुपये
(लागू केलेल्या प्रत्येक अतिरिक्त पोस्टसाठी अतिरिक्त – 590/- रुपये)
[SC/ST – 531/- रुपये (लागू केलेल्या प्रत्येक अतिरिक्त पोस्टसाठी
अतिरिक्त 354/- रुपये)]
मिळणारे वेतन – 19,900/- रुपये ते 1,38,300/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया –
1. लेखी परीक्षा
2. मुलाखत (BECIL Recruitment 2023)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2023 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नवीन उमेदवारांना संधी; 203 पदांसाठी ‘या’ तारखेला होणार मुलाखत 

PCMC Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध (PCMC Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 203 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखत दिनांक 15 मे ते 17 मे 2023 रोजी होणार आहे.
संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पद संख्या – 203 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 58 वर्षापर्यंत
परीक्षा फी – फी नाही

भरली जाणारी पदे – (PCMC Recruitment 2023)
स्त्रीरोग विभाग –
1) कन्सल्टंट – 14 पदे
2) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 13 पदे
3) हाऊसमन – 24 पदे
भूलतज्ञ् विभाग –
4) भूलतज्ञ् विभाग कन्सल्टंट – 13 पदे
5) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 13 पदे
बालरोग विभाग –
6) बालरोग विभाग कन्सल्टंट – 14 पदे
7) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 18 पदे (PCMC Recruitment 2023)
8) बालरोग विभाग (हाऊसमन) – 24 पदे
मेडिसीन विभाग –
9) मेडिसिन फिजिशियन (कन्सल्टंट ) – 23 पदे
10) मेडिसिन कन्सल्टंट रजिस्ट्रार – 11 पदे
सर्जरी विभाग –
11) सर्जन कन्सल्टंट – 6 पदे
12) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 6 पदे
अस्थिरोग विभाग –
13) अर्थपिडिक सर्जन (कन्सल्टंट ) – 3 पदे
14) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 6 पदे
नेत्ररोग विभाग –
15) नेत्रतज्ज्ञ (कन्सल्टंट ) – 2 पदे
16) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 2 पदे
कान-नाक-घसा विभाग –
17) कान-नाक-घसा(कन्सल्टंट ) – 2 पदे
18) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 2 पदे
मानसोपचार विभाग –
19) मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट ) – 2 पदे
त्वचा रोग विभाग –
20)ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार- 3 पदे

मिळणारे वेतन –
स्त्रीरोग विभाग – (PCMC Recruitment 2023)
1) कन्सल्टंट – 1,25,000/- रुपये दरमहा
2) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /- रुपये दरमहा
3) हाऊसमन – 80,000/- रुपये दरमहा रुपये दरमहा
भूलतज्ञ् विभाग –
4) भूलतज्ञ् विभाग कन्सल्टंट – 1,25,000/- रुपये दरमहा
5) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /- रुपये दरमहा
बालरोग विभाग –
6) बालरोग विभाग कन्सल्टंट – 1,25,000/- रुपये दरमहा
7) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /- रुपये दरमहा
8) बालरोग विभाग (हाऊसमन) – 80,000/- रुपये दरमहा
मेडिसीन विभाग –
9) मेडिसिन फिजिशियन (कन्सल्टंट ) – 1,25,000/- रुपये दरमहा
10) मेडिसिन कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /- रुपये दरमहा
सर्जरी विभाग –
11) सर्जन कन्सल्टंट – 1,25,000/- रुपये दरमहा
12) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /- रुपये दरमहा
अस्थिरोग विभाग –
13) अर्थपिडिक सर्जन (कन्सल्टंट ) – 1,25,000/- रुपये दरमहा
14) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /- रुपये दरमहा
नेत्ररोग विभाग –
15) नेत्रतज्ज्ञ (कन्सल्टंट ) – 1,25,000/- रुपये दरमहा
16) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार -1,00,000 /- रुपये दरमहा
कान-नाक-घसा विभाग –
17) कान-नाक-घसा(कन्सल्टंट ) – 1,25,000/- रुपये दरमहा
18) ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार – 1,00,000 /- रुपये दरमहा
मानसोपचार विभाग –
19) मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट ) – 1,25,000/- रुपये दरमहा
त्वचा रोग विभाग –
ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार- 1,00,000 /- रुपये दरमहा (PCMC Recruitment 2023)

अर्ज पाठवण्याचा पत्ता – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड
महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी १८
मुलाखतीची तारीख – 15 मे 2023 ते 17 मे 2023
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Vacancy Details
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : कोरोनाग्रस्त पालकांची काळजी घेत केला अभ्यास; मेन्सच्या तयारीसाठी बर्फात हात गोठवले; अखेर अशी झाली IAS अधिकारी

UPSC Success Story IAS Kriti Raj

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळात अनेक अडचणींचा (UPSC Success Story) सामना करत कृती राज यांनी 2020 मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. ही परीक्षा पास होवून त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण शहराचे नाव उंचावले आहे. त्या उत्तर प्रदेशातील झाशी येथील रहिवासी आहेत. त्या सध्या उत्तर प्रदेश केडरमध्ये तैनात आहेत. त्या अनेकवेळा  विद्यार्थ्यांसाठी UPSC परीक्षेच्या तयारीच्या अनेक टिप्स शेअर करत असतात. आज आपण IAS कृती राज यांचा प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत…

UPSC Success Story IAS Kriti Raj

B.Tech पदवीधर आहेत कृती राज
IAS कृती राज या उत्तर प्रदेशातील झाशी या ऐतिहासिक शहराच्या रहिवासी आहेत. झाशीच्या सेंट फ्रान्सिस कॉन्व्हेंट स्कूलमधून त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर (UPSC Success Story) जय अकादमीतून 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाली. कृती राज यांनी BIET झांसी येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech ची पदवी घेतली आहे.

UPSC Success Story IAS Kriti Raj

सामाजिक कार्याची आवड (UPSC Success Story)
B.Tech पूर्ण केल्यानंतर कृती यांना त्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा नव्हती. त्यांना सर्व सामान्य जनतेसाठी, तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी कल्पवृक्ष वेल्फेअर फाऊंडेशन नावाची एनजीओ सुरू केली. यामध्ये महिला आणि बालकल्याणाची कामे केली जातात. हे काम करत असताना त्यांनी नागरी सेवेत अधिकारी होण्याचा निर्णय घेतला आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. समाजसेवेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरी सेवा हा उत्तम मार्ग ठरू शकतो; हा दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवला.

 

 

 

 

 

UPSC Success Story IAS Kriti Raj

कोरोनाग्रस्त पालकांची काळजी घेत केला अभ्यास
कृती राज यांनी 2020 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा दिली. दरम्यान, कोरोना महामारीचा कहर शिगेला पोहोचला होता. परीक्षेची तयारी करत असताना त्यांच्या पालकांना (UPSC Success Story) रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा परिस्थितीत आई-वडिलांची काळजी घेत कृती राज यांनी परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला होता. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 106 वा क्रमांक मिळवून IAS पद मिळवलं आहे.

 

UPSC Success Story IAS Kriti Raj

थंड पाण्यात हात गोठवायच्या
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार होती. मात्र कोरोना महामारीमुळे ही परीक्षा जानेवारीमध्ये घेण्यात आली. या काळात उत्तर भारतात हिवाळा शिगेला पोहोचला होता. UPSC Mains मध्ये उमेदवारांना दोन शिफ्टमध्ये 6 तास लिहावे लागते. कृती राजने यांनी एका (UPSC Success Story) मुलाखतीत सांगितले होते की, थंडीतही पेपर लिहिता यावा यासाठी त्यांनी योग्य सराव केला होता. त्या रोज पहाटे तीन वाजता उठायच्या आणि थंड पाण्यात हात बुडवून हात गोठवायच्या. यानंतर त्या सलग तीन तास मॉक पेपर लिहायच्या. त्यांनी स्वतःला असे तयार केले होते जेणेकरून अत्यंत वाईट स्थितीतही पेपर लिहिता येईल.

 

UPSC Success Story IAS Kriti Raj

कर्फ्यूमधून गाठलं परीक्षा केंद्र
IAS कृती राज यांनी 2020 मध्ये UPSC परीक्षा दिली होती. या दरम्यान कोरोनामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यूसारखी परिस्थिती होती. त्यांनी सेल्फ स्टडी करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. गेल्या UPSC मुख्य परीक्षेच्या वेळी भोपाळमध्ये कर्फ्यू होता. अशा स्थितीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी कृती राज यांना कसेबसे परीक्षा केंद्रावर नेले. परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या 10 मिनिटे आधी त्या केंद्रावर पोहोचू शकल्या होत्या.

UPSC Success Story IAS Kriti Raj

25 मिनिटे चालली UPSCची मुलाखत (UPSC Success Story)
कृती राज यांच्या UPSC मुलाखतीदरम्यान एक मजेदार घटना घडली. जेव्हा त्या मुलाखत देण्यासाठी पोहोचल्या तेव्हा दुपारचे साडे चार वाजले होते. बोर्ड सदस्याने त्यांना जेवण केले की नाही का? असं विचारलं. यावर त्यांनी सकाळचा नाश्ता करून आल्याचे उत्तर दिले. त्यांचे उत्तर ऐकून सर्व मंडळाचे सदस्य हसू लागले आणि वातावरण अतिशय खेळीमेळीचे झाले. त्यांची मुलाखत सुमारे 25 मिनिटे चालली आणि यामध्ये त्यांना त्या चालवत असलेली एनजीओ आणि हवामान याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

UPSC Success Story IAS Kriti Raj

रोज 8 ते 10 तास अभ्यास
IAS कृती राज यांनी UPSC 2020 परीक्षेत 106 वा क्रमांक मिळविला. त्यांनी जुलै 2019 पासून नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीचे काही महिने त्यांनी (UPSC Success Story) रोज 8 ते 10 तास अभ्यास केला. त्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर त्यांनी आपली अभ्यासाची रणनीती बदलली आणि चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित केले. यूपीएससीच्या मुलाखतीदरम्यान तुमच्या क्षेत्राशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची माहिती घेणे महत्त्वाचे असते, असा सल्ला त्या यूपीएससी उमेदवारांना देतात. त्यांचा हा प्रवास यूपीएससी उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MMRDA Recruitment : मुंबईमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी!! MMRDA अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

MMRDA Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये विविध (MMRDA Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक (वित्त), संचालक (देखभाल), महाव्यवस्थापक (देखभाल) ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2023 असणार आहे.
संस्था – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
भरली जाणारी पदे –
1. संचालक (वित्त)
2. संचालक (देखभाल)
3. महाव्यवस्थापक (देखभाल)
पद संख्या – 03 पदे (MMRDA Recruitment)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जून 2023

आवश्यक कागदपत्रे – (MMRDA Recruitment)
1. Resume (बायोडेटा)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो (MMRDA Recruitment)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment : पात्रता फक्त 8 वी पास; महावितरण अंतर्गत ‘या’ शहरात 100 पदांवर नवीन भरती

Job Notification (47)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Mahavitaran Recruitment) कंपनी लिमिटेड, जालना अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वायरमन पदाच्या एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना
भरले जाणारे पद – वायरमन
पद संख्या – 100 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – जालना (Mahavitaran Recruitment)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार8 वी पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Rs. 5,000 ते 7,000/- दरमहा

असा करा अर्ज – (Mahavitaran Recruitment)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन www.apprenticeshipindia.gov.in वेबसाईट वर नोंदणी करायची आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतात.
3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. (Mahavitaran Recruitment)
4. अपूर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात आणि अर्ज करण्यासाठी लिंक – CLICK

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : NHM अंतर्गत राज्याच्या ‘या’ शहरात होणार नवीन उमेदवारांची निवड; 10वी/12 वी/पदवीधरांना उत्तम संधी 

Job Notification (46)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर
पद संख्या – 49 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) वैद्यकीय अधिकारी यु.पी.एच.सी. (पूर्णवेळ) – 04 पदे
शैक्षणिक पात्रता – MBBS
2) वैद्यकीय अधिकारी प्रसूतिगृह (अर्धवेळ)- 02 पदे
शैक्षणिक पात्रता – MBBS
3) वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)- 07 पदे
शैक्षणिक पात्रता – 01) स्त्रीरोग मध्ये एमडी / डीएनबी / डीसीएच 02) बालरोग मध्ये एमडी / डीएनबी / डिजिओ
4) स्त्री रोग व प्रसूती तज्ञ – 01 पद (Job Notification)
शैक्षणिक पात्रता – स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र मध्ये एमडी / डीएनबी / डिजिओ
5) साथरोग तज्ञ- 01 पद
शैक्षणिक पात्रता – कोणताही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH / MHA/ एमबीए
6) जी.एन.एम – 01 पद
शैक्षणिक पात्रता – GNM/ B.sc नर्सिंग
7) लॅब टेक्निशियन – 01 पद
शैक्षणिक पात्रता – B.SC /DMLT
8) फार्मासिस्ट – 02 पदे
शैक्षणिक पात्रता – B.Farm / D.Farm
9) ए.एन.एम- 30 पदे
शैक्षणिक पात्रता – 10वी व ANM कोर्स उत्तीर्ण

वय मर्यादा – (Job Notification)
01 मे 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी / स्त्री रोग व प्रसूती तज्ञ : 70 वर्षापर्यंत.
परीक्षा फी – 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी यु.पी.एच.सी. (पूर्णवेळ) -60,000/- रुपये दरमहा
2. वैद्यकीय अधिकारी प्रसूतिगृह (अर्धवेळ) -60,000/- रुपये दरमहा
3. वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) – 30,000/- रुपये दरमहा
4. स्त्री रोग व प्रसूती तज्ञ – 75,000/- रुपये दरमहा
5. साथरोग तज्ञ – 35,000/- रुपये दरमहा
6. जी.एन.एम – 17,000/- रुपये दरमहा (Job Notification)
7. लॅब टेक्निशियन -17,000/- रुपये दरमहा
8. फार्मासिस्ट -17,000/- रुपये दरमहा
9. ए.एन.एम -18,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना- 4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.zpsolapur.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHB Recruitment 2023 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत नवीन भरती जाहीर; ‘या’ पदांवर मिळवा दरमहा साडे 3 लाख पगार 

NHB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत रिक्त पदांच्या (NHB Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी, प्रकल्प वित्त अधिकारी पदांच्या एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय गृहनिर्माण बँक
भरले जाणारे पद –
1. वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी – 20 पदे
2. प्रकल्प वित्त अधिकारी – 20 पदे
पद संख्या – 40 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2023

वय मर्यादा – (NHB Recruitment 2023)
1. वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी – 40 ते 59 वर्षे
2. प्रकल्प वित्त अधिकारी – 35 ते 59 वर्षे
अर्ज फी –
इतर उमेदवार – रु. 850/-
SC/ ST/ PwD – रु.175/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी –
1. Graduate in any discipline CA/ICWA/MBA (Finance) or equivalent will be preferred.
2. Officers with a minimum working experience of 15 years in SCBs/Financial Institutions of which a minimum of 10 years of experience (NHB Recruitment 2023) in handling Credit/ Project Finance. The last post held by the candidate should be at SMG Scale V or above in PSBs / Grade D or above in Financial Institutions with the last drawn gross salary equivalent to SMG Scale- V of IBA scale.
प्रकल्प वित्त अधिकारी –
Graduate in any discipline CA/ICWA/MBA (Finance) or equivalent will be preferred.2. Officers with a minimum working experience of 10 years in SCBs/Financial Institutions of which a minimum of 5 years of experience in handling Credit/ Project Finance. The last post held by the candidate should be at MMG Scale III or above in PSBs / Grade B or above in Financial Institutions with last drawn gross salary equivalent to MMG Scale – III of the IBA scale.
मिळणारे वेतन –
1. वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी – Fixed compensation of Rs 3.5 lacs per month.
In case of outstation duty, travelling and halting allowances will be as applicable to TEG Scale VI cadre (IBA Scale). (NHB Recruitment 2023)
2. प्रकल्प वित्त अधिकारी – Fixed compensation of Rs 2.5 lacs per month.
In case of outstation duty, travelling and halting allowances will be as applicable to SMG Scale IV cadre (IBA Scale).

निवड प्रक्रिया – (NHB Recruitment 2023)
1. निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल.
2. मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या पात्र उमेदवारांची शॉर्ट-लिस्टिंगसाठी स्क्रीनिंग कमिटी केली जाईल.
3. निवड शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता, पात्रता नंतरचा अनुभव आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.
4. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडीसाठी गुणवत्ता यादी उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.
5. जाहिरात केलेल्या पदांसाठी मुलाखतीसाठी उपस्थित असताना, उमेदवाराने वैध विहित कागदपत्रे सादर केली पाहिजेत
काही महत्वाच्या तारखा –
1. Commencement of on-line registration of application – 14/04/2023
2. Closure of registration of application – 13/05/2023
3. Closure for editing application details – 13/05/2023 (NHB Recruitment 2023)
4. Last date for printing your application – 28/05/2023
5. Online Fee Payment – 14/04/2023 to 13/05/2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – nhb.org.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com