Home Blog Page 209

ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरतीचा चौथा टप्पा ‘या’ तारखेपासून होतोय सुरु

ZP Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हा परिषदेच्या विविध (ZP Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षेचा चौथा टप्पा दि. 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागाविण्यात आले होते.

त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेतील विविध पदभरतीसाठी प्रत्यक्ष पदांच्या परीक्षेला दि. 7 ऑक्‍टोबरपासून प्रारंभ झाला आहे. विविध संवर्गासाठी परीक्षेचे आतापर्यंत 3 टप्पे झाले आहेत. परीक्षेच्या चौथ्या टप्प्यास दि. 17 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी दि. 17 व 20 नोव्हेंबर रोजी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सातारा आयटी पार्क गोडोली, कराड येथील महिला महाविद्यालयातील केंद्रांवर ही परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : गूगल इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे प्रश्न; बरोबर उत्तरे दिली तर नोकरी पक्की झाली म्हणून समजा!!

GK Updates 11 Nov.

करिअरनामा ऑनलाईन। तुम्हाला गुगलमध्ये नोकरी हवी (GK Updates) असल्यास मुलाखतीची तयारी सुरू करा. गुगलमध्ये नवीन उमेदवारांची भरती प्रक्रिया दीर्घकाळ चालते. अशा परिस्थितीत कॉल लेटर येण्याची वाट न पाहता मुलाखतीच्या टप्प्याची तयारी करणं योग्य ठरतं. यामुळे काय होतं; जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर तुमचा वेळ वाया जाणार नाही.
गुगलची मुलाखत फेरी इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच अवघड मानली जाते. भरती प्रक्रियेप्रमाणे, मुलाखत देखील अनेक फेऱ्यांमध्ये होते. जर तुम्ही Google मध्ये नोकरीसाठी अर्ज करत असाल तर आम्ही इथे काही प्रश्नांची यादी देत आहोत; या प्रश्नांच्या तयारीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

Google Background Questions (GK Updates)
1. तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगू शकता का?
2. तुमची कार्यशैली कशी आहे?
3. पुढील 5 वर्षांसाठी तुमची करिअरची उद्दिष्टे कोणती आहेत?
4. तुमच्या कमकुवतपणाबद्दल आणि सामर्थ्याबद्दल सांगा.
5. तुमच्या पुढील नोकरीकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे?
6. या नोकरीसाठी तुम्ही स्वतःला कसे पात्र समजता?

Google Situational Questions
1. आम्हाला एका घटनेबद्दल सांगा ज्यामध्ये तुम्ही आव्हानांवर मात केली आणि चांगले परिणाम दिले. यामध्ये तुमचे आव्हान, अडचण, ध्येय आणि निकाल या सर्व गोष्टी सांगा.
2. एखाद्या प्रकल्पात तुम्ही चूक केली असेल त्या घटनेबद्दल आम्हाला सांगा. तुम्ही त्यात सुधारणा कशी केली आणि तुमच्या वरिष्ठांना किंवा टीमला त्याबद्दल कसे सांगितले?
3. तुम्हाला कधी एखाद्या प्रकल्पासाठी नवीन (GK Updates) कौशल्य शिकावे लागले आहे का? तुमची शिकण्याची प्रक्रिया कशी होती?
4. जर तुम्हाला खूप प्रोजेक्ट्स एकत्र आले तर तुम्ही ते कसे हाताळाल?
5. समजा तुमच्या टीममध्ये 5 लोक आहेत. त्यापैकी 2 टीम वर्कमध्ये फारसे योगदान देत नाहीत. पण जेव्हा हे दोघे कोणतेही काम करतात तेव्हा त्याचा दर्जा उत्तम असतो. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल?
6. कोणत्या परिस्थितीत तुम्ही एखाद्या समस्येचे निराकरण एकट्याने शोधता आणि कोणत्या परिस्थितीत तुम्ही संघाची मदत घेता?
7. ज्या प्रकल्पासाठी तुम्ही ध्येय ठेवले आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. ते कसे साध्य करायचे?
8. एखाद्या प्रकल्पादरम्यान तुमचे कधी कोणाशी मतभेद झाले आहेत का? या प्रसंगी तुम्ही परिस्थितीत कशी हाताळली?
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : MBBS चं शिक्षण अर्ध्यातच सोडलं; नशिबाने यू टर्न घेतला आणि ती बनली UPSC टॉपर 

Career Success Story of IAS Taruni Pandey

करिअरनामा ऑनलाईन । तिसरीत शिकत असल्यापासून (Career Success Story) तिला डॉक्टर व्हायचं होतं. पुढे सायन्स मधून तिने शिक्षण घेतलं. नंतर MBBS ला प्रवेश घेतला. मात्र तब्येतीच्या तक्रारीमुळे तिला MBBSचे शिक्षण दुसऱ्याच वर्षात सोडावे लागले. तरीही ती खचली नाही. तिने करिअरचा दुसरा मार्ग शोधला आणि UPSC परीक्षेची तयारी सुरु केली आणि अवघ्या 4 महिन्यात तयारी करुन ती उच्च पदावर अधिकारी झाली. ही कहाणी आहे तरुणी पांडे या तरुणीची. हा लेख वाचल्यानंतर आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला निश्चित प्रोत्साहन मिळेल.

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत भरघोस कामगिरी
UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो उमेदवार रात्रंदिवस अभ्यास करतात आणि कोचिंग क्लासचीही मदत घेतात. मात्र काही लोक सेल्फ स्टडीच्या जोरावर अतुलनीय यश मिळवतात. यापैकीच एक आहे तरुणी पांडे; जीने लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी अवघ्या चार महिन्यात तयारी केली आणि या परिक्षेत संपूर्ण भारतातून चौथा क्रमांक पटकावला. या अतुलनीय कामगिरीने ती UPSC टॉपर ठरली आहे.

इंग्रजी साहित्यात घेतली पदवी (Career Success Story)
तरुणी पांडे हिचा जन्म चित्तरंजन, पश्चिम बंगाल येथे झाला. त्यानंतर तिने झारखंडच्या जामतारा येथून शिक्षण पूर्ण केले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर तरुणी पांडेला तिच्या बहिणीसोबत विविध सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागले. जिथे ती अनेक नोकरशहा आणि राजकारण्यांना भेटली. या काळात तिने आपल्या आयुष्यासाठी आणि करिअरसाठी एक नवीन मार्ग शोधला. या गर्दीच्या वेळी एक माणूस सुद्धा व्यवस्थेत मोठे बदल करू शकतो हे तिच्या लक्षात आले.

शेवटचीच संधी हातात होती
यानंतर तरुणी पांडेने सरकारी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिला 2020 मध्ये पहिल्यांदा UPSC च्या पूर्व परीक्षेस  बसायचे होते पण पेपरच्या अवघ्या चार दिवस आधी तिला कोरोनाची लागण झाली. ही संधी हुकली पण यानंतर तिने 2021 मध्ये फॉर्म भरुन परीक्षा दिली. खरे तर ही तिच्यासाठी शेवटची संधी होती. ती सामान्य श्रेणीतून आली आहे आणि 2022 मध्ये तिची परीक्षेसाठी आवश्यक वयमर्यादा संपत असल्याने ती अपात्र ठरली असती. म्हणूनच तिला या शेवटच्या संधीचं सोनं करायचं होतं.

केवळ सेल्फ स्टडी करुन बनली IAS
तरुणी हिने UPSC परीक्षेसाठी कसून अभ्यास केला आणि तिला तिच्या कष्टाचे फळ मिळाले. चार महिन्यांच्या अभ्यासातून तिने हे यश मिळवले आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी तिने (Career Success Story) यूट्यूबसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत घेतली. कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय तिने केवळ सेल्फ स्टडी केला. आत्मविश्वासाने पेपर लिहल्यामुळे तिला या परीक्षेत संपूर्ण भारतातून 4 था क्रमांक मिळाला आहे. या परिक्षेत ती अव्वल ठरली आहे; आणि IAS पदावर विराजमान झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Exam Schedule 2024 : लागा तयारीला!! MPSCचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या तारखेला होणार परीक्षा

MPSC Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या (MPSC Exam Schedule 2024) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पुढील वर्षी, २०२४ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 28 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा दि. 14 ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास उमेदवारांना योग्य रितीने करता येण्यासाठी एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार 2024 मध्ये एमपीएससीतर्फे 16 परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांचा समावेश आहे. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे.

माहितीनुसार शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होणार आहे.  रिक्त पदांचा तपशील जाहिरातीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे वेळापत्रक संभाव्य असून त्यामध्ये बदल होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. असा बदल झाल्यास त्याबाबतची माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांचा समावेश आहे. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

परीक्षेच्या संभाव्य तारखा – (MPSC Exam Schedule 2024)
1. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ष पूर्व परीक्षा – दि. 17 मार्च 2024
2. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – दि. 18 एप्रिल 2024
3. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा – दि. 16 जून 2024
4. राज्यसेवा मुख्य परीक्षा – दि. 14 ते 16 डिसेंबर 2024
5. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – दि. 23 नोव्हेंबर 2024
6. अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा – दि. 9 नोव्हेंबर 2024
7. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – दि. 23 नोव्हेंबर 2024
8. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – दि. 23 नोव्हेंबर 2024
9. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा – दि. 28 ते 31 डिसेंबर 2024
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RERA Recruitment 2023 : 50 हजार पगाराची नोकरी मिळवा; रेरा अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

RERA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । गोवा रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (RERA Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून नियोजन सहाय्यक (तांत्रिक) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – गोवा रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण
भरले जाणारे पद – नियोजन सहाय्यक (तांत्रिक)
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
वय मर्यादा – 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – O.S.D., गोवा रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण.
मिळणारे वेतन – Rs. 50,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे (RERA Recruitment 2023) अगोदर सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2023 आहे.
उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://rera.goa.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : पोलिस विभागात होतेय विधी अधिकाऱ्यांची भरती; ही संधी सोडू नका

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे पोलिस विभाग अंतर्गत रिक्त (Job Notification) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – ठाणे पोलिस विभाग, ठाणे
भरले जाणारे पद – विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी
पद संख्या – 14 पदे (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे पिन नं. 4600601

नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
वय मर्यादा –
विधी अधिकारी गट अ – 62 वर्षे
विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी – 60 वर्षे
निवड प्रक्रिया –
1. लेखी परिक्षा
2. तोंडी परिक्षा

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
विधी अधिकारी गट अ 01
विधी अधिकारी गट ब 04
विधी अधिकारी 09

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी गट अ पदवीधर
विधी अधिकारी गट ब पदवीधर
विधी अधिकारी पदवीधर

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
विधी अधिकारी गट अ मासिक वेतन रूपये 30,000/- + दुरध्वनी व प्रवासखर्चासाठी रूपये 5,000/-
एकूण मासिक देय रक्कम रूपये 35,000/-
विधी अधिकारी गट ब मासिक वेतन रूपये 25,000/- + दुरध्वनी व प्रवासखर्चासाठी रूपये 3,000/-
एकूण मासिक देय रक्कम रूपये 28,000/-
विधी अधिकारी मासिक वेतन रूपये 20,000/- + दुरध्वनी व प्रवासखर्चासाठी रूपये 3,000/-
एकूण मासिक देय रक्कम रूपये 23,000/-


असा करा अर्ज –

1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून (Job Notification) आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.thanepolice.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

NHM Recruitment 2023 (12)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Recruitment 2023) अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, मिषक, सर्जन, इएनटी सर्जन, रेडिओलॉजिस्ट व अस्थिरोग तज्ज्ञ या पदांच्या 97 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा जिल्हा
भरली जाणारी पदे – स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, मिषक, सर्जन, इएनटी सर्जन, रेडिओलॉजिस्ट व अस्थिरोग तज्ज्ञ
पद संख्या – 97 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 70 वर्षे
अर्ज फी – रु.५००/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि. प. सातारा

भरतीचा तपशील – (NHM Recruitment 2023)

पद पद संख्या 
स्त्रीरोग तज्ज्ञ 30 पदे
बालरोग तज्ज्ञ 29 पदे
भूलतज्ज्ञ 18 पदे
मिषक 07 पदे
सर्जन 03 पदे
इएनटी सर्जन 03 पदे
रेडिओलॉजिस्ट 03 पदे
अस्थिरोग तज्ज्ञ 07 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोग तज्ज्ञ MD (Gynac)/ DGO
बालरोग तज्ज्ञ MD (Ped/ MBBS DCH
भूलतज्ज्ञ MD ((Anes)/ DA
मिषक MD Medicine/ DNB
सर्जन MS General Surgery/ DNB
इएनटी सर्जन MS ENT/DORL/DNB
रेडिओलॉजिस्ट MD Radiology/DMRD
अस्थिरोग तज्ज्ञ M.S. (Ortho)/ D (Ortho)

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
स्त्रीरोग तज्ज्ञ
  • असिस्टेड डिलेव्हरी रु.१५००/- प्रती केस
  •  मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
  • मायनर सर्जरीरु. २०००/- प्रती केस
  • सोनोग्राफी रु.४००/- प्रती केस
बालरोग तज्ज्ञ
  • मेजर सर्जरीरु. २०००/- प्रती केस
  • इर्मजन्सी ऑनकॉल बेसीसरु. १,०००/- प्रती केस
भूलतज्ज्ञ
  • मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
  • Stand By रु.२०००/- प्रती केस
मिषक
  • इर्मजन्सीज (क्रिटिकल केसेस) रु.३,०००/- प्रती केस
  • इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु.१,०००/- प्रती दिवस
  • प्रीऑनेस्टेटिक चेकअप रु १,०००/- प्रती केस:
सर्जन
  • मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
  • मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती केस
  • इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु. १,०००/- प्रती दिवस
इएनटी सर्जन
  • मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
  • मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती केस
  • इर्मजन्सी ऑनकॉल बेसीस रु.१,०००/- प्रती दिवस
रेडिओलॉजिस्ट
  • सोनोग्राफी ४००रु /- प्रती केस
  • एक्स रे ५० रु /- प्रती केस
  • सी टी स्कॅन ४०० रु /- प्रती केस
अस्थिरोग तज्ज्ञ
  • मेजर सर्जरीरु. ४०००/- प्रती केस
  • मायनर सर्जरीरु. १०००/- प्रती म
  • इर्मजन्सी ऑनकॉल १०००/- प्रती दिवस

असा करा अर्ज –
1. या पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी (NHM Recruitment 2023) अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत नर्स पदावर भरती; 100 पदे रिक्त 

Job Alert (82)

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून परिचारिका (नर्स) पदाच्या 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिका, ठाणे
भरले जाणारे पद – परिचारिका (नर्स)
पद संख्या – 100 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे. तसेच GNM किंवा B.Sc (नर्सिंग) कोर्स पूर्ण केला असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – दरमहा 30,000/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
मुलाखतीचे ठिकाण – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Postal Department Recruitment 2023 : टपाल विभागात 1899 पदांवर होणार मेगाभरती!! 10 वी/12 वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी

Indian Postal Department Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुण (Indian Postal Department Recruitment 2023) उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भारतीय टपाल विभाग अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 1899 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2023 आहे.

विभाग – भारतीय टपाल विभाग |
भरले जाणारे पद – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
पद संख्या – 1899 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज फी – 100/-

भरतीचा तपशील – (Indian Postal Department Recruitment 2023)

पद पद संख्या 
पोस्टल असिस्टंट 598 पदे
सॉर्टिंग असिस्टंट 143 पदे
पोस्टमन 585 पदे
मेल गार्ड 03  पदे
मल्टी टास्किंग स्टाफ 570 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
पोस्टल असिस्टंट Degree
सॉर्टिंग असिस्टंट Degree
पोस्टमन 12th
मेल गार्ड 12th
मल्टी टास्किंग स्टाफ 10th

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
पोस्टल असिस्टंट Rs. 25,500 – 81,100/-
सॉर्टिंग असिस्टंट  Rs. 25,500 – 81,100/-
पोस्टमन   Rs. 21,700 – 69,100/-
मेल गार्ड Rs. 21,700 – 69,100/-
मल्टी टास्किंग स्टाफ Rs. 18,000 – 56,900/-

 

महत्वाची कागदपत्रे –
1. Original Marks/ Board Sheet
2. Original Community / Caste Certificate
3. Original PWD Certificate (Indian Postal Department Recruitment 2023)
4. Original Transgender Certificate
5. Original Date of Birth Proof.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2023 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Circle and Cadre Wise Vacancy –
Indian Post Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AI Syllabus : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट!! आता शाळेत मिळणार AI चे धडे; पहा कसा आहे सिलॅबस 

AI Syllabus

करिअरनामा ऑनलाईन । AI म्हणजेच आर्टिफिशियल (AI Syllabus) इंटेलिजन्सचे वर्चस्व अनेक क्षेत्रांत वाढू लागले आहे. येत्या काही वर्षांत तंत्रज्ञान पूर्णपणे बदलणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना भविष्यात कोणतीही अडचण येवू नये यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे क्षेत्र खूप व्यापक आहे. यामध्ये करिअर करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये सहज कमवू शकता. आता शालेय अभ्यासक्रमात एआय (AI) अभ्यासक्रमांचाही समावेश केला जात आहे. बारावीनंतरही AI शी संबंधित विषय अभियांत्रिकी आणि आयटीआय विद्यार्थ्यांना तसेच नॉन-आयटी पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातील. शाळांमध्ये एकूण 60 तासांचा एआय अभ्यासक्रम शिकवला जाईल. हा अभ्यासक्रम वर्गानुसार विभागला जाईल. शाळेत प्रत्येक इयत्तेप्रमाणे कोणत्या AI विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे ते पाहूया…

असा आहे AI Syllabus –

इयत्ता 6वी ते 8वी (7.5 तास अभ्यास)
-AI म्हणजे काय?
-AI आणि नीतिशास्त्र
-एआय टूल्सचा वापर- फोटो, संगीत, दस्तऐवज आणि वेबसाइट तयार करण्यासाठी जनरेटिव्ह एआय टूल्सचा वापर.
इयत्ता 9 वी ते 10वी (22.5 तास अभ्यास)
– AI आणि AI साधनांच्या मूलभूत संकल्पना
– AI आणि नीतिशास्त्र
– AI प्रोग्रामिंगचा परिचय
– मिनी प्रकल्प
– कला, संगीत, गेम डिझायनिंगमध्ये मशीन लर्निंग

इयत्ता (AI Syllabus) 11वी ते 12वी (30 तास अभ्यास)
– AI साठी गणित आणि सांख्यिकी
– मूलभूत AI ऍप्लिकेशन्समध्ये AI टूल्सचा वापर (AI टूल्स)
– डेटा सुरक्षा आणि गोपनीयता
– एआय सॉफ्टवेअरमधील नैतिकता
– AI लायब्ररी, टूल्स आणि फ्रेमवर्क
– AI- NLP, कॉम्प्युटर व्हिजनचा अनुप्रयोग
ITI विद्यार्थ्यांसाठी एआय AI अभ्यासक्रम
– ChatGPT आणि वेबसाइट डिझाइनचा बार्ड
– AI मधील मूलभूत गोष्टी
– प्रॉम्प्ट अभियांत्रिकीची मूलभूत माहिती

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी AI अभ्यासक्रम
– AI अल्गोरिदम
– मशीन लर्निंग (AI Syllabus)
– सखोल शिक्षण
– डेटा विश्लेषण
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com