Home Blog Page 183

NHM Recruitment 2024 : NHM अंतर्गत भरली जाणार नवीन पदे; 75 हजारापर्यंत मिळेल पगार

NHM Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका (NHM Recruitment 2024) आरोग्य विभागा अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून गायनॅकलॉजिस्ट, पेडियाट्रिक, अॅनेस्थेशिया, एएनएम, फार्मासिस्ट, इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग
भरले जाणारे पद – गायनॅकलॉजिस्ट, पेडियाट्रिक, अॅनेस्थेशिया, एएनएम, फार्मासिस्ट, इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर
पद संख्या – 26 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नांवे ब्युरो कार्यालय, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड कोल्हापूर
नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर
वय मर्यादा –
१८ वर्ष व कमाल वय ३८ वर्षे (राखीव प्रवर्गाकरीता कमाल वय ४३ वर्षे)

भरतीचा तपशील – (NHM Recruitment 2024)

पद पद संख्या 
गायनॅकलॉजिस्ट 06
पेडियाट्रिक 07
अॅनेस्थेशिया 01
एएनएम 05
फार्मासिस्ट 06
इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
गायनॅकलॉजिस्ट एमबीबीएस एमडी/डीजीओ
पेडियाट्रिक एमबीबीएस (NHM Recruitment 2024)
एमडी/डीएनबी/डीसीएच
अॅनेस्थेशिया एमबीबीएस आणि अॅनेस्थेशिया विषयातील पदवीव्युत्तर पदवी/पदवीका
एएनएम एसएससी पास सह एएनएम कोर्स
फार्मासिस्ट डी फार्म
इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर कोणत्याही शाखेचा पदवीधर

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
गायनॅकलॉजिस्ट ७५०००/-
पेडियाट्रिक ७५०००/-
अॅनेस्थेशिया ७५०००/-
एएनएम १८०००/-
फार्मासिस्ट १७०००/-
इम्युनायझेशन फिल्ड मॉनिटर १५०००/- + ५०००/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ई.मेलद्वारे प्राप्त झालेल्या (NHM Recruitment 2024) अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NABFID Recruitment 2024 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथे नोकरी करण्याची संधी

NABFID Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बँक फॉर (NABFID Recruitment 2024) फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपाध्यक्ष, मुख्य अर्थतज्ज्ञ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.

संस्था – नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट
भरले जाणारे पद – उपाध्यक्ष, मुख्य अर्थतज्ज्ञ
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024
E-Mail Id – [email protected].
नोकरीचे ठिकाण – मुंबई, नवी दिल्ली
वय मर्यादा – ५५ वर्षे

भरतीचा तपशील – (NABFID Recruitment 2024)

पद पद संख्या 
उपाध्यक्ष 14
मुख्य अर्थतज्ज्ञ 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
उपाध्यक्ष Graduate / Postgraduate in any discipline from a recognized University
मुख्य अर्थतज्ज्ञ Master’s degree

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (NABFID Recruitment 2024) तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
4. ई-मेल व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nabfid.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : नॅशनल हेल्थ सिस्टिम अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी!! 2,60,000 एवढा पगार

Government Job (39)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन (Government Job) केंद्र अंतर्गत सल्लागार – समुदाय प्रक्रिया / सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पदाची रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र
भरले जाणारे पद – सल्लागार – समुदाय प्रक्रिया / सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024
वय मर्यादा – ६२ वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Job)
Medical Degree (MBBS) with Post graduate degree/MD (PSM/CHA, etc.) / MS / Master’s in Public Health / PhD /MBA in Health Management.
मिळणारे वेतन –  Rs. 2,20,000/- to Rs. 2,60,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज करण्याची शेवटची (Government Job) तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nhsrcindia.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSRTC Recruitment 2024 : 8वी ते 10वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! एस. टी. महामंडळ अंतर्गत 145 पदावर भरती सुरु

MSRTC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (MSRTC Recruitment 2024) महामंडळ, सातारा अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 145 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक कार्यालय , 7 स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड जवळ , रविवार पेठ सातारा – 415001
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा

भरतीचा तपशील – (MSRTC Recruitment 2024)

पदाचे नाव पद संख्या 
मोटार मेकॅनिक वाहन 40
मेकॅनिक डिझेल 34
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर 30
ऑटो इलेक्ट्रिशियन 30
वेल्डर 2
टर्नर 3
प्रशितन व वातानुकुलिकरण 6

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
मोटार मेकॅनिक वाहन
  • कमीतकमी एसएसी पास असणे आवश्यक आहे.
  • सरकारमान्य आयटीआय मधील २ यांचा मेंर्कानक मोटार व्हेईकल कोर्स (ट्रेड) उत्तीणं असणे आवश्यक आहे.
मेकॅनिक डिझेल
  • कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे.
  • सरकारमान्य आयटीआय १ वर्षाचा मेकॅनिक डिझेल कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर
  • इयत्ता ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सरकारमान्य आयटीआय १ वर्षाचा शिटमेटल/ ब्लॅकस्मिथ कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ऑटो इलेक्ट्रिशियन
  • कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे.
  • सरकारमान्य आयटीआय २ वर्षाचा इलेक्ट्रिशियन कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
वेल्डर
  • कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे.
  • सरकारमान्य आयटीआय १ वर्षांचा वेल्डर कोर्स ट्रेड उत्तोणं असणे आवश्यक आहे (MSRTC Recruitment 2024)
टर्नर
  • कमीत कमी एसएसी पास असणे आवश्यक आहे.
  • सरकारमान्य आयटीआय मधील २ वर्षाचा टर्नर [ट्रेड] उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशितन व वातानुकुलिकरण
  • कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे.
  • सरकारमान्य आयटीआय १ वांचा प्रशितन व वातानुकुलिकरण कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
मोटार मेकॅनिक वाहन रु.८०५०.००/- = [दरमहा] २ वर्ष
मेकॅनिक डिझेल रु.७७००.००/- दरमहा १ वर्ष
मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर रु.७७००.००/- दरमहा १ वर्ष
ऑटो इलेक्ट्रिशियन रु.८०५०.००/- : दरमहा २ वर्ष
वेल्डर रु.७७००.००/- दरमहा १ वर्ष
टर्नर रु.८०५०.००/- [दरमहा] १ वर्ष
प्रशितन व वातानुकुलिकरण रु.७७००.००/ दरमहा १ वर्ष

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावी.
3. अर्ज सादर करण्याच्या (MSRTC Recruitment 2024) सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : कोणत्या देशात महिलांना विश्वचषक सामने पाहण्यास बंदी आहे? मुलाखतीत चक्रावून टाकणारे प्रश्न 

GK Updates 22 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. ते काय आहे जे वर्षातून एकदाच आणि शनिवारी येते?
उत्तर: हिंदी अक्षर ‘व’ वर्षातून आणि शनिवारी एकदाच येते?
प्रश्न 2. जर 2 कंपनी असेल आणि 3 गर्दी असेल तर 4 आणि 5 किती असतील?
उत्तर: 4 आणि 5 नेहमी 9 असतात.
प्रश्न 3. आठ माणसांना भिंत बांधायला दहा तास लागतात, तर चार माणसांना किती वेळ लागेल?
उत्तर: अजिबात वेळ लागणार नाही; कारण भिंत आधीच तयार केली गेली आहे.

प्रश्न 4. (GK Updates) तुम्ही सलग 3 दिवसांची नावे बोलू शकता, परंतु बुधवार, शुक्रवार, रविवार येऊ नये?
उत्तरः काल, आज आणि उद्या
प्रश्न 5. असा कोणता प्राणी आहे ज्याचा मेंदू त्याच्या शरीरापेक्षा मोठा आहे?
उत्तर: मुंगी
प्रश्न 6. कोणत्या देशात महिलांना विश्वचषक सामने पाहण्यास बंदी आहे?
उत्तर: इराण

प्रश्न 7. संपूर्ण जगात असा कोणता देश आहे जिथे शेती केली जात नाही?
उत्तर : सिंगापूर
प्रश्न 8: भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण होती?
उत्तरः अण्णा रमजान मल्होत्रा (GK Updates)
प्रश्न 9. बिहारच्या पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्र्याचे नाव काय आहे?
उत्तर : अब्दुल गफूर खान
प्रश्न 10. ती कोणती गोष्ट आहे जी पाणी प्यायल्याबरोबर मरते?
उत्तर: तहान
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SET Exam 2024 : ‘या’ तारखेला होणार SET परीक्षा; पहा अर्ज प्रक्रियेविषयी

SET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यस्तरावरील सहाय्यक प्राध्यापक (SET Exam 2024) पदासाठीची पात्रता परीक्षा (SET) दि. 7 एप्रिल 2024 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल; अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

विद्यापीठाकडून 1995 सालापासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी सेट परीक्षा घेतली जाते. आता विद्यापीठाकडून शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसंबंधीची घोषणा होणे अपेक्षीत होते. अखेरीस सेट विभागाच्या वतीने संभाव्य तारखेची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुमारे एक महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर परीक्षा अर्जांची छाननी, प्रवेशपत्र तयार करणे, आदी गोष्टींसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या विद्यापीठामध्ये सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याच्या कामाला वेग आला असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. ती झाल्यानंतरच ऑनलाईन अर्जांना सुरुवात होणार आहे.

ही असेल शेवटची ऑफलाईन SET परीक्षा (SET Exam 2024)
मागील काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) नेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार की ऑफलाईन याबाबत शंका होती. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत समितीची ऑक्टोबर महिन्यात एक बैठक झाली. त्या बैठकीत सर्वसाधारणपणे एप्रिल २०२४ मध्ये होणारी सेट परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावी; मात्र त्यानंतरच्या पुढील सर्व (SET Exam 2024) परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, असे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ७ एप्रिल २०२४ मध्ये शेवटची ऑफलाईन म्हणजेच लेखी परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर ४० वी सेट परीक्षा ऑनलाइन (संगणकावर) पद्धतीने आयोजित होईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
सेटच्या ३९ व्या परीक्षेची घोषणा झाली असून ७ एप्रिल २०२४ रोजी पार पडणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका संच तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. ही प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपेल, त्यानंतर लगेचच उमेदवारांना ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ खुले करण्यात येईल; असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : IIT मधील आपयशानंतर प्लॅन ‘B’ निवडला; 13 मुलाखती दिल्यानंतर मिळाला मनासारखा जॉब; आज घेते तगडं पॅकेज

Career Success Story of Riti Kumari

करिअरनामा ऑनलाईन । रितीला आयआयटी करायचे होते; पण यामध्ये (Career Success Story) तिला यश आले नाही. ती शाळेपासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जायची. तिने दहावी आणि बारावीच्या परिक्षेत चांगले मार्क मिळवले होते. आयआयटी (IIT) करता न आल्यामुळे ती निराश झाली नाही. तिने ठरवलेल्या Plan B च्या माध्यमातून तिने वाटचाल केली आणि ती सॉफ्टवेअर इंजिनियर झाली. करिअर घडवण्याच्या वाटेवरचा तिचा प्रवास कसा होता ते पाहूया…

आता सर्व संपले असं वाटू लागलं
रीति कुमारी हिने आयआयटी प्रवेशासाठी प्रयत्न केला तेव्हा यामध्ये तीला अपयश आले. त्यामुळे आपण जीवनात आता पुढे जावू शकणार नाही असे तिला वाटले. वडीलांचे पैसे वाचविण्यासाठी तिने सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी ती कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तिला आयआयटी क्रॅक करायची होती. तिने GATE ची तयारी सुरु करण्याचा विचार केला होता. परंतू तो विचार तिने सोडून दिला.

13 मुलाखती दिल्यानंतर मिळाला जॉब (Career Success Story)
रिती कुमारी हीला आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला नाही तेव्हा तिला वाटले होते आता सर्व संपले आहे. तिच्या ट्वीटर अकाऊंटवर तशी पोस्ट तिने केली होती. तिला दहावीत 9.6 सीजीपीए आणि बारावीत 91 टक्के मार्क मिळाले होते. त्यामुळे तिने प्रतिष्ठीत आयआयटी संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी JEE परीक्षा दिली. परंतू तिला यश न मिळाल्याने तिने हार मानली नाही. तिने तिचा प्लान बी सुरु केला आणि 13 मुलाखती दिल्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून वॉलमार्ट कंपनीत तीला नोकरी मिळविली आहे.

असा मिळाला वॉलमार्टमध्ये जॉब
एकदा रीति कुमारी लिंक्डइनवर सर्च करीत असताना तिला कंपन्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची गरज होती अशी माहिती मिळाली. त्यानंतर तिने करीअरचा नवा पर्यायनिवडला. तिचा पहिला इंटरव्यूह एकोलाईटमध्ये झाला. तिने यावेळी एकूण 12 जॉब इंटव्यूह दिले.
रिति कुमारी हीने ट्वीटरवर लिहीले आहे की, “माझी सर्वांना विनंती आहे….लोक अपयश आल्यानंतर धीर सोडतात आणि उदास होतात. आपणापैकी प्रत्येकजण या परिस्थितीतून गेला आहे आणि एक चांगला यशस्वी माणूस म्हणून बाहेर आला आहे. आयआयटीत प्रवेश मिळविण्यात अयशस्वी झाले म्हणून (Career Success Story) माझे काही नुकसान झाले नाही. कारण मी आता जेथे काम करत आहे तेथे केवळ अग्रगण्य कॉलेजातील लोकच काम करतात. त्यामुळे एक संधी गेली तरी दुसरी संधी आपल्यासाठी दार ठोठावते. वेळीच ही संधी ओळखून तुम्हाला त्याचं सोनं करता यायला हवं.” रिती कुमारी हिने वीबीयूच्या युनिर्व्हसिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग एण्ड टेक्नॉलॉजीमधून तिचे इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : सार्वजनिक आरोग्य विभागात ‘या’ पदावर भरती सुरु; महिन्याला मिळवा 85 हजार पगार

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.  भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी गट–अ पदाच्या एकूण 46 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दर महिन्याच्या 1 व 15 तारखेला होणार आहे.

संस्था – सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी गट – अ
पद संख्या – 46 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. किंवा अॅलोपॅथिक विषयातील पदव्युत्तर पदवी/पदविका परिक्षा उत्तीर्ण केली असावी. पदवी/पदविका प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सील मुंबई येथे नावाची नोंदणी होऊन नोंदणी प्रमाणपत्र वैध कालावधी असलेले आवश्यक आहे.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 58 वर्षापर्यं असावे.
परीक्षा फी – फी नाही (Job Notification)
मिळणारे वेतन – 75,000/- रुपये ते 85,000/- रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग, (ओरोस) ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग पिन कोड – 416812

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.arogya.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या मृदा जलसंधारण विभागात होणार तब्बल 670 पदांवर भरती; डिप्लोमाधारक/ इंजिनियर्ससाठी मोठी संधी!!

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत (Government Jobs) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील तब्बल 670 रिक्त पदे भरली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

संस्था – मृद व जलसंधारण विभाग
भरले जाणारे पद – जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
पद संख्या – 670 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2024

वय मर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
दिव्यांग उमेदवारांसाठी – ४५ वर्षा पर्यंत
पात्र खेळाडुंसाठी – ४३ वर्षा पर्यंत
अनाथ उमेदवारांसाठी – ४३ वर्षा पर्यंत
अर्ज फी – (Government Jobs)
अमागास – रु.१०००/-
मागासवर्गीय / आ.दु.घ./अनाथ / दिव्यांग – रु./-९००
(सूचना – उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतीरीक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरीक्त असतील. तसेच परीक्षा शुल्क ना-परतावा (Non Refundable) आहे.)

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
1. जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता प्राप्त केली असावी.
मिळणारे वेतन – ४१, ८००/- ते १,३२,३००/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणीक अर्हता
2. वयाचा पुरावा (Government Jobs)
3. शैक्षणीक अर्हता इत्यादीचा पुरावा
4. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
5. आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
6. वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Government Jobs)
7. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
8. खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
9. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
10. विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
11. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन

काही महत्वाच्या तारखा –
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://swcd.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

How to Become Content Writer : तुम्हाला लेखनाची आवड असेल तर बनू शकता कंटेंट रायटर; पहा कसे….

How to Become Content Writer

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षापासून (How to Become Content Writer) आपण छोटीशी गोष्ट जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च करतो, आपल्या डोक्यातील प्रश्नाचे उत्तर सर्च इंजिनवर उपलब्ध लाखो वेबसाइट्स देतात. अशा परिस्थितीत, या वेबसाइट्ससाठी सामग्री लेखन कार्य करणाऱ्या व्यावसायिकांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. एका सर्वेनुसार, येत्या काळात भारतात ऑनलाइन लेखनाची मागणी बरीच वाढणार आहे. त्यामुळे तुम्हीही या क्षेत्रात तुमचे भविष्य घडवू शकता. जर तुम्ही पत्रकारितेचा अभ्यास केला असेल आणि तुम्हाला लेखनाची आवड असेल, तर कंटेंट रायटिंग हे क्षेत्र तुमच्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून वाट पाहत आहे.

1. तांत्रिक लेखन
तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रमाच्या क्षेत्रात गुंतलेल्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांबद्दल आणि त्यांच्या कार्यांबद्दल ग्राहकांना सतत अपडेट करावे लागते. तांत्रिक लेखक त्यांच्या लिखानाच्या कौशल्यातून हे अवघड वाटणारे काम सोपे करतात. तांत्रिक लेखकाला तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर लेखन करावे लागते.
2. वेब सामग्री लेखक (How to Become Content Writer)
प्रिंट मध्यमापेक्षा इलेक्ट्रॉनिक माध्यमात लिहिणे अधिक कठीण मानले जाते. हे करताना वेब लेखकाचे लेखन सोप्या भाषेत असावे आणि त्यांनी लिखान करताना गुणांचा जास्तीत जास्त वापर करावा.
विशिष्ट वेबसाइटच्या जाहिरातीसाठी लिहिलेली सामग्री या अंतर्गत येते. उदाहरणार्थ, सामग्री लेखक म्हणून, तुम्हाला एक कीवर्ड दिला जातो, म्हणजे एक विषय दिला जातो; ज्यामध्ये तुम्हाला त्या विषयावर मर्यादित किंवा निश्चित शब्दांमध्ये लिखान करायचे असते. सामग्री लेखन अनेक प्रकारचे असू शकते.

3. विज्ञान लेखन
संशोधन आणि विकास कार्यात वाढ झाल्यामुळे विज्ञान लेखकांची मागणी झपाट्याने वाढू लागली आहे. विशेषत: विज्ञान लेखक शास्त्रज्ञ आणि संशोधकांना त्यांचे शोधनिबंध (How to Become Content Writer) तयार करणे, विज्ञान जर्नल्ससाठी लेख लिहिणे, शोधनिबंध तयार करणे इत्यादींमध्ये मदत करतात. विज्ञान लेखक होण्यासाठी तुमची संबंधित विषयांवर चांगली पकड असणे आवश्यक आहे.

कंटेंट रायटर होण्यासाठी कोणती पात्रता आहे आवश्यक?
मास कम्युनिकेशनची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना कंटेंट रायटिंगमध्ये अधिक महत्त्व दिले जाते. तांत्रिक विषयांव्यतिरिक्त, तांत्रिक लेखनासाठी तुमच्याकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
कशा आहेत जॉबच्या संधी?
आयटी क्षेत्राच्या वाढत्या प्रभावामुळे आज जगभरात वेबसाईट्सचा पूर आला आहे, त्यामुळे सर्वाधिक रोजगाराच्या संधी वेबसाईट डेव्हलपमेंटशी संबंधित कंपन्यांमध्ये आहेत. याशिवाय, आयटी, पर्यटन आणि इतर क्षेत्रांशी संबंधित प्रकाशन संस्था आणि कंपन्यांमध्ये सामग्री लेखकांची आवश्यकता आहे.

सुरुवातीला किती मिळतो पगार?
कंटेंट रायटर म्हणून तुम्ही सुरुवातीला 15 ते 20 हजार रुपये दरमहा कमवू शकता. याशिवाय तुम्ही फ्रीलांसिंग करून किंवा अर्धवेळ काम करून प्रति लेख 200 ते 1000 रुपये कमवू शकता.
नोकरी कशी मिळवायची?
एचआर, मीडिया, मार्केटिंग, मॅनेजमेंट, अॅडमिन, ग्राफिक आणि डेटाशी संबंधित अनेक फील्ड आहेत, जिथे तुम्हाला कंटेंट रायटिंगसाठी नोकरी मिळेल. याशिवाय कंटेंट रायटिंगच्या मदतीने इतर क्षेत्रातही नोकऱ्या मिळवणे सोपे होते.

या संस्थेतून करु शकता कोर्स (How to Become Content Writer)
1. सेंट झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई
2. आरके फिल्म्स अँड मीडिया अकादमी, नवी दिल्ली
3. TWB संस्था, बेंगळुरू
4. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पुणे
5. जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
6. IIMM, नवी दिल्ली
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com