Home Blog Page 180

Mahavitaran Recruitment 2024 : ITI पास विद्यार्थ्यांसाठी महावितरणमध्ये नोकरीची संधी; त्वरा करा!!

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Mahavitaran Recruitment 2024) पारेषण कंपनी लिमिटेड, हिंगोली येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) पदाच्या एकूण 80 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, हिंगोली
भरले जाणारे पद –
1. वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 40 पदे
2. तारतंत्री (वायरमन)- 40 पदे
पद संख्या – 80 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी – फी नाही (Mahavitaran Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – हिंगोली (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : याला म्हणतात जिद्द!! तीनवेळा संधी हुकली पण हरली नाही; IAS बनून वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंच

UPSC Success Story of IAS Mudra Gairola

करिअरनामा ऑनलाईन । शालेय जीवनापासूनच कोणाला (UPSC Success Story) डॉक्टर बनायचं असतं तर कोणाला इंजिनियर. आयुष्यात प्रत्येकाने एक स्वप्न पहिलेलं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यामध्ये तुम्ही चांगले करिअर करु शकता. तर असे काही लोक आहेत जे आयुष्यात खूप आनंदी असतात तरीही त्यांना अजून काहीतरी मिळवायचं असतं. त्यांची ही इच्छा त्यांना लोकांच्या गर्दीपासून वेगळे ठेवते. आयएएस अधिकारी मुद्रा गायरोला यापैकीच एक आहे. आज आपण तिच्या विषयी जाणून घेणार आहोत.

शाळेत टॉपर विद्यार्थी म्हणून ओळख (UPSC Success Story)
मुद्रा गायरोला ही लहानपणापासूनच हुशार मुलगी म्हणून ओळखली जायची. तीला अभ्यासात खूप रस वाटायचा. ती परिक्षेत नेहमी चांगले गुण मिळवायची त्यामुळेशाळेत ती नेहमी टॉपर विद्यार्थीनी म्हणून ओळखली जायची. मुद्राला 10वी बोर्डाच्या परीक्षेत 96 टक्के आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळाले होते. तिच्या शालेय जीवनात, तिला भारताच्या पहिल्या महिला IPS किरण बेदी यांनी सन्मानित केले आहे.

मुंबईत घेतले मेडिकलचे शिक्षण
मुद्रा ही उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयाग येथील रहिवासी आहे. सध्या तिचे कुटुंब दिल्लीत राहते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुद्राने वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तिने मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी कोर्सला प्रवेश घेतला. कॉलेजच्या अभ्यासातही तिने टॉप केले आणि बीडीएसमध्ये सुवर्णपदक मिळवले. नंतर तिने दिल्लीला येऊन एमडीएसमध्ये (MDS) प्रवेश घेतला, पण तिने आयएएस अधिकारी व्हावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केली जोरदार तयारी
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुद्राने एमडीएसचे (MDS) शिक्षण अर्धवट सोडले आणि यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. 2018 मध्ये मुद्राने UPSC चा पहिला प्रयत्न केला, ज्यामध्ये ती मुलाखत फेरीपर्यंत पोहोचली. 2019 मध्ये ती पुन्हा UPSC च्या मुलाखत फेरीत पोहोचली, परंतु तिची निवड झाली नाही. यानंतर ती 2020 मध्ये मुख्य परीक्षाही पास करु शकली नाही.
शेवटी बाजी मारलीच
IAS मुद्रा गायरोला 2021 मध्ये पुन्हा UPSC परीक्षेला बसली. यावेळी (UPSC Success Story) तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आणि ती आयपीएस (IPS) झाली. मुद्राने पुन्हा आयएएस होण्याचा प्रयत्न केला. तिने पुन्हा परीक्षा दिली आणि 2022 मध्ये ती संपूर्ण भारतातून 53 व्या रँकसह UPSC पास झाली आणि ती IAS बनण्यात यशस्वी झाली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teachers Jobs : शिक्षकांसाठी महत्वाचे… आश्रम शाळेतील रिक्त पदे भरण्यासाठी मिळाली शासनाची मंजूरी 

Teachers Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी (Teachers Jobs) तुमच्याकडे चालून आली आहे. B. Ed आणि D. Ed. पदवी घेतलेले उमेदवार या संधीचा फायदा घेवू शकतात. महाराष्ट्र शासनाने नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दली घोषणा केली आहे. राज्यातील 141 खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी तब्बल 282 शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी दोन विषय शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. मंत्री अतुल सावे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे आता राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी व विज्ञान विषयांसाठी शिक्षक मिळणार आहेत.

यासह कला, वाणिज्य, आणि विज्ञान अशा दोन विद्या शाखेमध्ये (Teachers Jobsschool असलेल्या आश्रमशाळांसाठी एकूण आठ शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेसाठी वाढीव दोन शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. ज्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत कनिष्ठ महाविद्यालयात कला/वाणिज्य आणि विज्ञान अशा दोन विद्याशाखा आहेत; त्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत एकूण आठ शिक्षकांची पदे अनुज्ञेय होतील.

नव्याने गणित, विज्ञान विषयासाठी मंजूर होणारी (Teachers Jobs) दोन पदे असतील. त्यापैकी कला, वाणिज्य विशेष विषय शिक्षकांची दोन आणि मराठी व इंग्रजी विषय शिक्षकांची दोन पदे असतील. याशिवाय उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या विज्ञान शाखेस गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विशेष विषयांकरीता प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार विषय शिक्षक अनुज्ञेय राहतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Fair : नोकरीसाठी वणवण थांबणार.. .हजारो तरुणांना मिळणार नोकरी; ‘या’ तारखेला होतोय रोजगार मेळावा

Job Fair (2)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात वणवण फिरणाऱ्या (Job Fair) तरुणांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. बेरोजगार तरुणांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातर्फे दरवर्षी 16 रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये 12 ऑनलाइन आणि 4 ऑफलाईन मेळावे होणार आहेत. महत्वाचे म्हणजे 10 वी पास तरुणांपासून ते पदवी  घेतलेल्या विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. दि. 29 डिसेंबर आणि दि. 31 जानेवारीपूर्वी असे दोन मेळावे होणार आहेत.

कुशल कामगारांचा अभाव
सध्या अशी परिस्थिती आहे की सरकारी नोकऱ्या मर्यादित असून त्याची भरती देखील वेळेत होत नाही. राज्याच्या विविध विभागांमध्ये दोन लाखांवर पदे रिक्त आहेत. काही पदांची भरती यावर्षी झाली आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे, की सरकारी नोकरीत एका जागेसाठी तब्बल 200 ते 250 उमेदवार अर्ज करतात तर दुसरीकडे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातर्फे होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी जागांच्या तुलनेत अर्जच येत नाहीत. त्यामुळे कुशल कामगारांचा अभाव निर्माण झाला आहे.

इतक्या तरुणांना मिळणार रोजगार (Job Fair)
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दरवर्षी रोजगार मेळावे होतात. काहीवेळा महिन्यातून एकदा तर कधी दोनवेळा मेळाव्यांचे आयोजन केले जाते. आता दि. 29 डिसेंबरला ऑनलाइन मेळावा होणार असून त्याद्वारे जवळपास 700 जणांना रोजगार मिळू शकतो. त्यानंतर दि. 31 जानेवारीपूर्वी विभागीय मेळावा होणार असून त्यातही चार ते पाच हजार तरुण- तरुणींना रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता आहे. गरजू तरुण-तरुणींनी या मेळाव्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त हणमंत नलावडे यांनी केले आहे.

कोणती कौशल्ये विकसित करता येणार
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून ग्राफिक डिझायनर, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, कृषी, ब्युटी ॲण्ड वेलनेस, सोलार पॅनल (Job Fair) इन्स्टॉलेशन, डेअरी प्रॉडक्ट प्रोसेसर, फिटर- फॅब्रिकेशन, ॲनिमेटर, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, इलेक्ट्रिकल-टेक्निशियन, वेब डेव्हलपर, सोलर ॲण्ड एलईडी टेक्निशियन,  अशा कोर्सेसच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण संस्थांची निवड झाल्यानंतर बेरोजगार तरुण- तरुणींसाठी ही सोय केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था अंतर्गत ‘विजिटिंग फॅकल्टी’ पदासाठी थेट द्या मुलाखत

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन (Job Alert) आणि खानपान तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विजिटिंग फॅकल्टी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 03 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था (Maharashtra State Institute of Hotel Management and Catering Technology, Pune)
भरले जाणारे पद – विजिटिंग फॅकल्टी
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखती (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 03 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – प्राचार्य कार्यालय, महाराष्ट्र राज्य हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्था, शिवाजी नगर, पुणे

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. उमेदवार 03 जानेवारी 2024 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर राहतील.
4. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.msihmctpune.org.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS Recruitment 2024 : विना परीक्षा थेट द्या मुलाखत!! IBPS अंतर्गत विविध पदावर भरती सुरु

IBPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन, मुंबई (IBPS Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून विश्लेषक प्रोग्रामर – पायथन, विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net, IT डेटाबेस प्रशासक, प्रोग्रामिंग सहाय्यक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 02 आणि 04 जानेवारी 2024 आहे.

संस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन, मुंबई
भरले जाणारे पद – विश्लेषक प्रोग्रामर – पायथन, विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net, IT डेटाबेस प्रशासक, प्रोग्रामिंग सहाय्यक
नोकरीचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 02 आणि 04 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – बँकिंग कर्मचारी संस्था निवड, IBPS घर, 90 फूट डीपी रोड, ठाकूरच्या मागे पॉलिटेक्निक, बंद. W E महामार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१
वय मर्यादा – 23 वर्षे ते 30 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IBPS Recruitment 2024)

पद शैक्षणिक पात्रता
विश्लेषक प्रोग्रामर – पायथन Full Time B. Tech/ B.E. (Computer Science / Comp. Engineering) / MCA / M.Sc. (IT)/ M.Sc. (Comp. Science)
from a recognized University / Institute
विश्लेषक प्रोग्रामर – ASP.Net Full Time B. Tech/ B.E. (Computer Science / Comp. Engineering) / MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (Comp. Science) from a recognized University / Institute
IT डेटाबेस प्रशासक Full Time B. Tech / B.E. (Computer Science/ Comp. Engineering) / MCA / M.Sc. (IT) / M.Sc. (Comp. Science) from a recognized University / Institute
प्रोग्रामिंग सहाय्यक Full time BSc-IT, BCA, BSc- Computer Science or equivalent

 

निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया (IBPS Recruitment 2024) मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. उमेदवार 02 आणि 04 जानेवारी 2024 या तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर राहतील.
4. मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

M. Phil Degree : एम. फील डिग्री आता कायमची बंद होणार; UGCने दिलं ‘हे’ कारण

M. Phil Degree

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एक महत्त्वपूर्ण (M. Phil Degree) अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत पुढील सत्रापासून एमफिल (M. Phil) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या आधारावर नवीन सत्रापासून या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
महाविद्यालयीन एम. फील डिग्री आता कायमची बंद होणार आहे. या धर्तीवर देशभरातील सर्व महाविद्यालयांना एम. फील डिग्रीचं अ‍ॅडमिशन न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही डिग्री आता कायमची बंद होणार आहे. यूजीसीचे सेक्रेटरी मनीष जोशी यांनी महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांनादेखील या कोर्ससाठी अ‍ॅडमिशन न घेण्याचं आवाहन केलं आहे. यूजीसीकडून याबाबतचा आदेश आजच पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढच्या शैक्षणिक वर्षापासून एम. फील डिग्रीसाठी अ‍ॅडमिशन अधिकृतपणे बंद होणार आहे.

एम. फील मान्यताप्राप्त डिग्री नाही – UGC
यूजीसीने याबाबत एक नोटीस जारी केली आहे. एम. फील मान्यताप्राप्त डिग्री नाही, असं युसीजीचे म्हणणे आहे. एम. फील म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री ही दोन वर्षांची (M. Phil Degree) पोस्टग्रॅज्युएट अ‍ॅकेडमिक रिसर्च प्रोग्राम होतं, जे पीएचडीसाठी प्रोव्हिजन इनरोलमेंटसारखं काम करतं. पण आता युजीसीने डिग्रीची मान्यता रद्द केल्याने आता विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी अ‍ॅडमिशन घेता येणार नाही.

3 वर्षापूर्वी करण्यात आली होती शिफारस (M. Phil Degree)
काही महाविद्यालये एम.फीलच्या शिक्षणासाठी प्रेवश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करत आहेत. पण महाविद्यालयांनी तसं करु नये. कारण ही डिग्री मान्यता प्राप्त नाही, असं यूजीसीने म्हटलं आहे. या डिग्रीला डिस्कन्टीन्यू करण्याची शिफारस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून या डिग्रीला अमान्य करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHAI Recruitment 2024 : नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदावर भरती सुरु; पदवीधर करु शकतात अर्ज

NHAI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक (राजभाषा), हिंदी अनुवादक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

संस्था – नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया
भरले जाणारे पद आणि 
1. व्यवस्थापक (राजभाषा)
2. हिंदी अनुवादक (NHAI Recruitment 2024)
पद संख्या – 2 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 9,300/- रुपये ते 39,100/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (NHAI Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://nhai.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : कौटुंबिक न्यायालय, मुंबई येथे ‘या’ पदावर भरती सुरु

Government Job (40)

करिअरनामा ऑनलाईन । कौटुंबिक न्यायालय, मुंबई येथे विविध रिक्त (Government Job) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सफाईगार पदाच्या 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

संस्था – मुंबई
भरले जाणारे पद – सफाईगार
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय, मुंबई.
वय मर्यादा – (Government Job)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 33 वर्षापर्यंत असावे
[मागसवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही (Government Job)
मिळणारे वेतन – 15,610/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.districts.ecourts.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Nursery Admission Age : नर्सरी प्रवेशासाठी आता बालकाचे ‘एवढं’ वय पूर्ण असणं आवश्यक

Nursery Admission Age

करिअरनामा ऑनलाईन । पालकांसाठी एक महत्वाची (Nursery Admission Age) अपडेट आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ तीन वर्षे वयाच्या मुलांनाच नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. शाळा प्रवेशाचे नियम NEP-2020 च्या नियमांनुसार असावेत, यासाठी धोरण तयार केले जात आहे. NEPच्या नियमानुसार इयत्ता पहिलीत प्रवेश करताना मुलाचे वय सहा वर्षे असावे.

नर्सरी प्रवेशासाठी ३ वर्षाची अट असतानाही दोन-अडीच वर्षांच्या अनेक मुलांना प्रवेश दिले जातात. परंतु, आता तसे करता येणार नाही. मूल पहिलीत जाताना त्याचे वय सहा वर्षे पूर्ण असावे लागणार आहे. या नव्या धोरणानुसार विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील.

शाळेच्या वेळा बदलणार (Nursery Admission Age)
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी चिमुकल्यांच्या (बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या) ज्या शाळा सकाळी सात- साडेसात वाजता भरतात, त्यांच्या वेळा बदलतील आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल; असे यापूर्वी स्पष्ट केले आहे. तत्कालीन व विद्यमान राज्यपालांनीही त्यासंदर्भातील पत्र शिक्षण खात्याला दिले आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच शाळांच्या वेळा (खासगी व शासकीय) सकाळी 9नंतर असणार आहेत; अशी माहिती राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

‘एक राज्य एक गणवेश’
यापुढे राज्यातील खासगी अनुदानित व शासकीय शाळांमधील सर्वच मुलांना एकच गणवेश असणार आहे. नवीन गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरुप असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट (Nursery Admission Age) किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची, अशा स्वरूपात गणवेशाची रचना असणार आहे. याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासंर्दभातील घोषणा यापूर्वीच केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com