Home Blog Page 177

Job Notification : पुण्याच्या ‘या’ कॉलेजमध्ये प्राध्यापक, ग्रंथपाल पदावर भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । फॉरेस्ट कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे अंतर्गत (Job Notification) विविध पदावर भरती सुरु आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

संस्था – फॉरेस्ट कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
भरली जाणारी पदे – ग्रंथपाल, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 09 पदे (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज संबंधित पत्त्यावर सादर करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी वेबसाईटला भेट द्या.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिकृत वेबसाईट – https://fccpune.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Army Public School Recruitment 2024 : B.Ed. असाल तर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये मिळेल नोकरीची मोठी संधी

Army Public School Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी पब्लिक स्कूल, कामठी (Army Public School Recruitment 2024) अंतर्गत PGT, TGT, PRT पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

संस्था – आर्मी पब्लिक स्कूल, कामठी
भरले जाणारे पद – PGT, TGT, PRT
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शाळेचे कार्यालय (PDF पहा)
नोकरीचे ठिकाण – कामठी
वय मर्यादा – ४० ते ५७ वर्षे

भरतीचा तपशील – (Army Public School Recruitment 2024)

पद पद संख्या 
PGT 01
TGT 01
PRT 03

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
PGT Post Graduation in respective subject with B.Ed
TGT Graduation in respective subject with B.Ed
PRT Graduation in respective subject with B.Ed

 

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी कार्यालयीन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. E-MAIL किंवा इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्जा सोबत आवश्यक (Army Public School Recruitment 2024) कागदपतत्राची प्रत जोडवी.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2024 आहे.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.apskamptee.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Prison Department Recruitment 2024 : राज्याच्या कारागृह विभागात मोठी भरती जाहीर; नोकरीची ही नामी संधी सोडू नका!!

Prison Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । अपर पोलीस (Prison Department Recruitment 2024) महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, यांनी भरतीची जाहिरात प्रकाशीत केली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपि निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलींग पर्यवेक्षक, शारिरिक कवायत निदेशक, शारिरिक शिक्षक निदेशक पदांच्या एकूण 255 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.

विभाग – अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य
भरली जाणारी पदे – लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक, करवत्या, (Prison Department Recruitment 2024) लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपि निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलींग पर्यवेक्षक, शारिरिक कवायत निदेशक, शारिरिक शिक्षक निदेशक
पद संख्या – 255 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2024
वय मर्यादा – 18 ते 55 वर्षे

भरतीचा तपशील – (Prison Department Recruitment 2024)

पदाचे नाव पद संख्या 
लिपिक 125
वरिष्ठ लिपिक 31
लघुलेखक निम्न श्रेणी 04
मिश्रक 27
शिक्षक 12
शिवणकाम निदेशक 10
सुतारकाम निदेशक 10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
बेकरी निदेशक 04
ताणाकार 06
विणकाम निदेशक 02
चर्मकला निदेशक 02
यंत्रनिदेशक 02
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक 01
करवत्या 01
लोहारकाम निदेशक 01
कातारी 01
गृह पर्यवेक्षक 01
पंजा व गालीचा निदेशक 01
ब्रेललिपि निदेशक 01
जोडारी 01
प्रिप्रेटरी 01
मिलींग पर्यवेक्षक 01
शारिरिक कवायत निदेशक 01
शारिरिक शिक्षक निदेशक 01

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परिक्षा उत्तीर्ण
लघुलेखक निम्न श्रेणी एस एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण तसेच शॉटहँड उत्तीर्ण स्पीड १०० प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -४० प्रति शब्द मि.
मिश्रक एसएससी/एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायीक म्हणून Bombay state Pharmacy council ला नांव नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य)
शिक्षक एसएससी/एचएससी किंवा तत्सम, व शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पुर्वानुभव असल्यास प्राधान्य)
शिवणकाम निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
सुतारकाम निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. (Prison Department Recruitment 2024)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे १ वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
बेकरी निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
ताणाकार एसएससी/एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
विणकाम निदेशक शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे. (प्रथम आणि व्दितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य )
चर्मकला निदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
यंत्रनिदेशक एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक एसएससी/एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
करवत्या चौथी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.
लोहारकाम निदेशक एसएससी/एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
कातारी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
गृह पर्यवेक्षक एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र. (प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य
पंजा व गालीचा निदेशक एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
ब्रेललिपि निदेशक एसएससी/ शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक
जोडारी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक.
प्रिप्रेटरी एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
मिलींग पर्यवेक्षक एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग व वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
शारिरिक कवायत निदेशक एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथ्वा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र
शारिरिक शिक्षक निदेशक एसएससी / शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य

 

मिळणारे वेतन –

पद वेतन 
लिपिक एस-६ः १९९००-६३२००
वरिष्ठ लिपिक एस-८ः २५५००-८११००
लघुलेखक निम्न श्रेणी एस-१४ः ३८६००-१२२८००
मिश्रक एस-१०: २९२००-९२३००
शिक्षक एस-८ः २५५००-८११००
शिवणकाम निदेशक एस-८ः २५५००-८११००
सुतारकाम निदेशक एस-८ः २५५००-८११००
प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस-८ः २५५००-८११००
बेकरी निदेशक एस-८ः २५५००-८११००
ताणाकार एस-८ः २५५००-८११००
विणकाम निदेशक एस-८ः २५५००-८११००
चर्मकला निदेशक एस-८ः २५५००-८११००
यंत्रनिदेशक एस-८ः २५५००-८११००
निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक एस-८ः २५५००-८११००
करवत्या एस-८ः २५५००-८११००
लोहारकाम निदेशक एस-८ः २५५००-८११००
कातारी एस-८ः २५५००-८११००
गृह पर्यवेक्षक एस-८ः २५५००-८११००
पंजा व गालीचा निदेशक एस-८ः २५५००-८११००
ब्रेललिपि निदेशक एस-८ः २५५००-८११००
जोडारी एस-८ः २५५००-८११००
प्रिप्रेटरी एस-८ः २५५००-८११००
मिलींग पर्यवेक्षक एस-८ः २५५००-८११००
शारिरिक कवायत निदेशक एस-८ः २५५००-८११००
शारिरिक शिक्षक निदेशक एस-८ः २५५००-८११००

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. खाली अर्ज दिलेल्या (Prison Department Recruitment 2024) वेबसाईट वरून अर्ज करायचे आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahaprisons.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIESL Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी एयर इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी!! मिळवा भरघोस पगार

AIESL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL Recruitment 2024) अंतर्गत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी सहाय्य सेवा पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (Air India Engineering Services limited)
भरले जाणारे पद – पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी – सहाय्य सेवा
पद संख्या – 74 पदे (AIESL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
वय मर्यादा –
1. General/EWS : Category: Not above 28 yrs.
2. OBC : Not above 31 years.
3. SC/ST : Not above 33 years.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidates with B.E/ B. Tech Degree
असा करा अर्ज – (AIESL Recruitment 2024)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज करण्याची शेवटची 15 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – ttps://www.aiesl.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ‘या’ उमेदवारांसाठी शिक्षक बँकेत नोकरीची संधी; अर्ज करा E-MAIL

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक सहकारी बँक, नागपूर अंतर्गत (Job Alert) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – शिक्षक सहकारी बँक, नागपूर
भरले जाणारे पद – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा – 55 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी
  • Qualification in banking / Co-operative banking such as CAIIB/Diploma in Banking and Finance/Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification:
  • Chartered/Cost Accountant/MBA(Finance)/ICWA: or
  • Post graduation in any discipline
महाव्यवस्थापक
  • Qualification in banking such as JAIIB/CAIIB/Diploma in Banking and Finance/ Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification
  • Chartered/Cost Accountant/MBA(Finance)/ICWA
उपमहाव्यवस्थापक Minimum L.L.B. For D.G.M legal post and Graduate for D.G.M. of other department posts with minimum 50% marks

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी वर दिलेल्या ई-मेल (Job Alert) आयडी वरुन अर्ज करायचा आहे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.shikshakbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2024 : 12वी पाससाठी खुषखबर!! महावितरण अंतर्गत तब्बल 5347 पदांवर भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Mahavitaran Recruitment 2024) राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने मेगाभरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल 5347 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

संस्था – महावितरण
भरले जाणारे पद – विद्युत सहाय्यक
पद संख्या – 5347 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल
वय मर्यादा – १८ ते २७ वर्षे

परीक्षा फी – (Mahavitaran Recruitment 2024)
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
2. मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
विद्युत सहाय्यक
  • प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
  • द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
  • तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Mahavitaran Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावर जानेवारी २०२४ मध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील.
4. सविस्तर निवेदन / सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Tips : ‘ही’ 3 कौशल्ये तुम्हाला बनवतील अगदी प्रोफेशनल

Career Tips (13)

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन जीवन हा आयुष्यातील (Career Tips) महत्वाचा टप्पा आहे. कारण येथूनच आयुष्याच्या एका नवीन आणि व्यावसायिक पर्वाची सुरुवात होते. त्यामुळे व्यावसायिक जीवनाची योग्य तयारी कॉलेज कॅम्पसमधूनच होणे आवश्यक आहे. या मालिकेत आज आम्ही तुम्हाला अशाच काही कौशल्यांची माहिती देणार आहोत जी कौशल्ये विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकत असताना आत्मसात करु शकतात.

1. संघ कार्य (TEAM WORK)
प्रोफेशनल लाइफची तयारी करताना हे कौशल्य आत्मसात करणे खूप महत्त्वाचे असते आणि ते म्हणजे टीम वर्क. अनेकवेळा अशी परिस्थिती उद्भवते की लोकांना टीममध्ये काम करावे लागते. ठराविक मुदतीत अनेक लोकांसोबत काम करुन प्रकल्प पूर्ण करावा लागतो. अशा परिस्थितीत कॉलेजमधूनच टीमवर्कची भावना विकसित करणे महत्त्वाचे आहे. टीम वर्क केल्याने आपण अनेक मित्रांसह असाइनमेंट अगदी सहज पूर्ण करु शकतो.

2. तंत्रज्ञान (TECHNOLOGY)
आज AI (Artificial Intelligence) च्या युगात जग झपाट्याने बदलत चालले आहे. अशा परिस्थितीत करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाची जाणीव ठेवण्याचा (Career Tips) सल्ला दिला जातो. यासोबतच तुम्ही तुमच्या करिअरच्या वाढीसाठी सोशल मीडियाचा अधिक चांगला वापर कसा करू शकता. महाविद्यालयातूनच याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात करा.

3. संवाद (Communication)
बर्‍याच वेळा विद्यार्थी संवाद कौशल्याकडे फार लक्ष देत नाहीत. त्यामुळे (Career Tips) अनेक वेळा उमेदवार गटात त्यांचे स्वतःचे मत प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. यामुळे अनेक वेळा चांगले ज्ञान असूनही ते मागे पडतात. अशा परिस्थितीत महाविद्यालयातूनच विद्यार्थ्यांनी या दिशेने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : फक्त 1 वर्ष अभ्यास करुन लघिमा बनली IAS; टॉपर्सच्या मुलाखतींमधून घेतली प्रेरणा

UPSC Success Story of IAS Laghima Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । लघिमाने तिला मिळालेल्या अनपेक्षित यशाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तिने परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) उत्तीर्ण होण्याची कल्पनाही केली नव्हती. ती म्हणते; “ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर माझे पालकही भावूक झाले. त्याहीपेक्षा, मी रिलॅक्स झाले आहे कारण मला आता एकामागोमाग एक प्रिलिम्स परीक्षा देण्याची गरज नाही.”
दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या लघिमा तिवारीने तिच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC CSE 2022 मध्ये ऑल इंडिया रँक 19 मिळवून एक उल्लेखनीय कामगिरी केली. ती मूळची राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील आहे पण तिच्या आयुष्यातील सुरुवातीची काही वर्षे दिल्लीत गेली आहेत.

अभ्यासातील सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली
कोणतीही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना लघिमा असा सल्ला देते, की “उमेदवारांनी कमी तास अभ्यास केला तरी न चुकता दररोज, सातत्यपूर्ण प्रयत्न केले तरी ते निर्विवादपणे परिक्षेत चांगला निकाल मिळवू शकतात. याउलट, दिवसातून 10-12 तास अभ्यास करणे आणि दुसऱ्या दिवशी अजिबात अभ्यास न करणे हे योग्य नाही. सातत्याने केलेलं कोणतंही काम दीर्घकाळात सकारात्मक परिणाम देतात.”

एक वर्ष केला सखोल अभ्यास (UPSC Success Story)
2021 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर लघिमाने यूपीएससीची तयारी सुरू केली. एका वर्षाच्या कालावधीत, तिने सखोल अभ्यास केला आणि YouTube वर टॉपर्सच्या मुलाखतींमधून प्रेरणा घेत तिची रणनीती संकलित केली. ती सांगते; “मला तयारीसाठी एक वर्ष लागले, ज्यामध्ये मी सर्व स्थिर भाग, मूलभूत जीएस आणि चालू घडामोडींच्या अभ्यासाचा समावेश केला आणि त्यामुळे मी आज हे यश मिळवू शकले आहे.”

कोचिंग क्लासला गेली नाही
इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासात जीवशास्त्र विषयाची पार्श्वभूमी असलेल्या, लघिमाने UPSC मुख्य परीक्षेसाठी तिचा पर्यायी विषय म्हणून मानववंशशास्त्र निवडले. केवळ टेस्ट मालिका आणि स्वयं-अभ्यासावर अवलंबून राहून तिने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय पहिल्याच प्रयत्नात परीक्षेचे सर्व स्तर पार केले.
पालकांना देते यशाचे सर्व श्रेय
लघिमाने तिच्या यशाचे सर्व श्रेय तिच्या पालकांना देते. नागरी सेवांमध्ये करिअर करणारी ती तिच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती आहे. तिने सुरुवातीपासूनच सकारात्मक मानसिकता ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यामुळे तिला परीक्षेच्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यास मदत झाल्याचे ती सांगते.

विद्यार्थ्यांना सांगते.. अशी ठेवा अभ्यासाची रणनिती
लघिमा सांगते; “UPSC देणाऱ्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच (UPSC Success Story) योग्य रणनिती आखली पाहिजे. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करुन त्याचे सातत्याने पालन करणे महत्त्वाचे आहे. सततचे प्रयत्न आणि उजळणी हीच परीक्षेत यश मिळविण्याची गुरुकिल्ली आहे. मॉक टेस्ट द्या आणि त्यामध्ये झालेल्या चुकांमधून शिका. पूर्व परीक्षा झाल्या नंतर  वेळ वाया घालवू नका. तुम्हाला कितीही आत्मविश्वास असला तरी लगेचच मुख्य परीक्षेची तयारी सुरु करा.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mehndi Design Diploma : मेहंदी काढण्याची आवड आहे? ‘हे’ कोर्स करुन सजवा तुमचं करिअर

Mehndi Design Diploma

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्हाला हातावर मेहंदी लावण्याची (Mehndi Design Diploma) आवड असेल तर ही कला पैसे कमावण्याचे उत्तम साधन बनू शकते. आज आम्ही तुमच्यासाठी असे काही डिप्लोमा कोर्सेस घेऊन आलो आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकता.
कोणताही सण, समारंभ, सोहळा आणि लग्न आले की, स्त्रिया मेहंदीने हात सजवतात. त्याचबरोबर हातावर मेहंदी काढण्यामागे धार्मिक महत्त्वही जोडले गेले आहे. ज्याचा वापर अनेक प्रकारे केला जातो. सौंदर्यापासून आरोग्यापर्यंतच्या बाबींमध्ये तुम्ही मेहंदी वापरू शकता. पण तुम्हाला माहित आहे का की या मेहंदीचे विविध प्रोफेशनल कोर्स करुन पैसेही कमावता येतात.

आजकाल अनेक मेहंदी डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध झाले आहेत; जे केल्यानंतर चांगले पैसे मिळू शकतात. अनेक महिलांना ही कला न शिकता कळत असली, तरी लग्नसमारंभ, सण-उत्सव यानिमित्त खास डिझाईनसाठी खास बुकिंग केले जाते. यासाठी व्यावसायिक मेहंदी डिझायनरची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही व्यावसायिकपणे मेहंदी लावू शकत नसाल, तर तुम्ही काही महिन्यांत परिपूर्ण मेहंदी लावायला शिकू शकता. इथे सांगितलेले डिप्लोमा कोर्स तुम्ही करु शकता.

– ट्रेडिशनल मेहंदी आर्ट फॉर्म्स (Mehndi Design Diploma)
हा कोर्स अतिशय स्वस्त आणि व्यावसायिक आहे जो ब्राइडल मेहंदी डिझाइन, इंडो अरेबिक मेहंदी डिझाइन, आफ्रिकन मेहंदी डिझाइनमध्ये करता येतो. अनेक खाजगी विद्यापीठे हा अभ्यासक्रम देतात. हा अभ्यासक्रम 3 महिने, 6 महिने किंवा अगदी एक वर्षाच्या कालावधीत सुध्दा करता येतो. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर, आपण नोकरीसह आपला व्यवसाय सुरु करु शकतो.

– मेहंदी डिझायनिंग कोर्स
मेहंदी डिझायनिंग कोर्स 3 महिने किंवा एक वर्ष कालावधीचा आहे, जो कोणत्याही विद्यापीठातून करता येतो. हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही पात्रतेची गरज नाही, पण जर तुम्हाला (Mehndi Design Diploma) चांगल्या विद्यापीठातून कोर्स करायचा असेल तर तुम्ही 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असले पाहिजे. तुम्ही डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तुम्ही बुकिंग घेण्यास तयार होता. पण यासोबत तुम्हाला सतत सरावही करावा लागेल.
-मेहंदी कोन मेकिंग डिप्लोमा कोर्स
भारतातील अनेक फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये ब्युटी पार्लर कोर्स, मेकअप आर्टिस्ट कोर्स, ब्राइडल मेकओव्हर कोर्स इत्यादी डिप्लोमा कोर्सचा एक भाग म्हणून मेहंदी डिझायनिंग कोर्स ऑफर करतात. जर तुम्ही मेहंदी लावण्यासाठी पूर्णपणे नवीन असाल तर कोन मेकिंग डिप्लोमा कोर्स हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
या कोर्समध्ये तुम्हाला मेंदी शंकू, पातळ मेंदीचा शंकू आणि जाड मेंदीचा शंकू वापरण्याचा योग्य मार्ग दाखवला जाईल. तसेच, जर तुम्ही पूर्णपणे नवीन असाल तर मेहंदी लावण्याची योग्य पद्धत देखील सांगितली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : डिग्री धारकांसाठी माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत ‘या’ पदावर भरती; लगेच करा APPLY

Government Job (42)

करिअरनामा ऑनलाईन । माहिती व प्रसारण मंत्रालय (Government Job) अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी, अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 05 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Information And Broadcasting)
भरले जाणारे पद – क्षेत्रीय अधिकारी, अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी
पद संख्या – 05 पदे (Government Job)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (चित्रपट), माहिती आणि प्रसारण मंत्रालय, ‘ए’ विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली-110001
वय मर्यादा – ५६ वर्षे

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
क्षेत्रीय अधिकारी 04
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
क्षेत्रीय अधिकारी Degree of a recognized university or equivalent
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी Degree of a recognized university or equivalent

मिळणारे वेतन – (Government Job)

पदाचे नाव वेतनश्रेणी
क्षेत्रीय अधिकारी (Rs.78800-209200) (Grade Pay-Rs. 7600)
अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी (67700-208700) (Grade Pay Rs. 6600)

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.
4. अपूर्ण अर्ज (Government Job) नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mib.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com