Home Blog Page 174

BAVMC Recruitment 2024 : परीक्षा न देता थेट द्या मुलाखत; अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे भरती सुरु

BAVMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (BAVMC Recruitment 2024) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 04 आणि 09 जानेवारी 2024 आहे.

संस्था – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी
पद संख्या – 44 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 04 आणि 09 जानेवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

वय मर्यादा – (BAVMC Recruitment 2024)
1. सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४५ वर्ष
2. वरिष्ठ निवासी – ४५ वर्ष
3. कनिष्ठ निवासी खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक 14 पदे
वरिष्ठ निवासी 19 पदे
कनिष्ठ निवासी 11 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक MD/MS/DNB in the concerned subject.
वरिष्ठ निवासी
  • Registered to pursue DM/Mch in concerned subject OR
  • MD/MS/DNB qualified post graduates in concerned broad specialty.
  • This post of senior resident is tenured position not exceeding 03 years.
  • The candidate must be below 45 years of age at the time of initial appointment.
कनिष्ठ निवासी Medical graduates (MBBS) from recognized / permitted medical college

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
सहाय्यक प्राध्यापक रु.१,००,०००/-
वरिष्ठ निवासी रु. ८०,२५०/-
कनिष्ठ निवासी रु. ६४,५५१/-

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी (BAVMC Recruitment 2024) जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर दिलेल्या तारखेला हजर राहावे.
4. मुलाखत 04 आणि 09 जानेवारी 2024 ला घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bavmcpune.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : ‘इथे’ मिळवा सरकारी नोकरी!! अर्जासाठी काही दिवसच शिल्लक…

Government Job (43)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी कोणाला नको असते? आपण (Government Job) पाहतो अनेकजण सरकारी नोकरीसाठी धडपडत असतात. पण अनेकवेळा प्रयत्न करूनही सरकारी नोकरी मिळत नाही. पण आता सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कसं? ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.

ही भरती प्रक्रिया दिल्ली सबऑर्डिनेट सर्विसेस सेलेक्शन बोर्डकडून राबवली जात आहे. या माध्यमातून थेट 108 पदे भरली जातील. भरती प्रक्रिया सुरु असून सेक्शन अधिकारी (उद्यान)साठी ही भरती होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 7 जानेवारी 2024 आहे. अर्ज करण्यासाठी (Government Job) अवघे काही दिवस शिल्लक असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी dsssb.delhi.gov.in. या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्जदार उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा विज्ञान विषयात पदवी घेतलेली असावी. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 18 ते 27 पर्यंत उमेदवाराचे वय असावे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : राज्याच्या ‘या’ बँकेत व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी; संधीचं सोनं करा!!

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । श्री छत्रपती राजर्षी शाहू (Job Notification) अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड येथे रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक सरव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2024 आहे.

बँक – श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड
भरले जाणारे पद – सहाय्यक. सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – बीड

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
सहाय्यक. सरव्यवस्थापक 01
शाखा व्यवस्थापक 02
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक. सरव्यवस्थापक C.A. (Chartered Accountant)
शाखा व्यवस्थापक एम. कॉम प्रथम स श्रेणी उत्तीर्ण, GDC&A

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. या पदांकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2024 आहे.
3. इच्छुक उमेदवारांनी आपला (Job Notification) अर्ज मुदती अगोदर सादर करावा.
4. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेची छायांकीत प्रत व अनुभव प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्राची एक प्रत (Hard Copy) बँकेच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर प्रत्यक्ष जमा करणे अथवा बँकेच्या शाखेच्या ठिकाणी देणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://shahubank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : 25 वर्षाचा तरुण सांभाळणार जिल्ह्याचा कारभार; कष्टकरी बापाचं पोर बनलं डेप्युटी कलेक्टर

Career Success Story of Deputy Collector Samadhan Ghutukade

करिअरनामा ऑनलाईन । “सरकारी अधिकारी होण्याचं (Career Success Story) आकर्षण मला लहानपणापासूनच खुणावत होतं. म्हणून मी जिद्दीने अभ्यास केला. MPSC आयोगाच्या वेगवेगळ्या भरती परीक्षा दिल्या. हाती आलेलं यश थोडक्यासाठी हुकत होतं. वारंवार पदरी निराशा पडत होती. मागे झालेल्या चुकांमधून शिकत पुन्हा परीक्षा दिली आणि शेवटी तो दिवस उगवला आणि मी अधिकारी झालो.” ही कहाणी आहे समाधान घुटुकडे या तरुणाची. सर्व सामान्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या तरुणाने उपजिल्हाधिकारी पदावर बाजी कशी मारली; हे आपण पाहणार आहोत. त्याची ही कहाणी निश्चित मरगळलेल्या तरुणांना प्रेरणा देईल.

वडील आहेत माथाडी कामगार
समाधान घुटुकडे याचं बालपण महाराष्ट्रातील सांगोला तालुक्यातील घेरडी या दुष्काळग्रस्त भागात गेलं. या भागात  उदरनिर्वाहाच्या साधनांची कमतरता असल्याने समाधानचे आई–वडील आपल्या कुटुंबाला घेऊन नोकरीच्या शोधात मुंबईला गेले. त्यानंतर ते माथाडी कामगार म्हणून चेंबूर येथे काम करू लागले. त्यातून मिळालेल्या तुटपुंज्या उत्पन्नातून ते  घर चालवत होते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते कष्ट घेत होते. मुलांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि कर्तुत्व गाजवावे अशी त्यांची अपेक्षा होती. मुलाने देखील वडिलांची अपेक्षा पूर्ण केली आणि जिद्दीने एमपीएससी (MPSC) परीक्षेत घवघवीत यश मिळवत थेट उपजिल्हाधिकारी पदावर वर्णी लावली.

लहानपणापासून अधिकारी होण्याचं आकर्षण (Career Success Story)
समाधान याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मानखुर्द (मुंबई) येथे झाले. तर मोहिते पाटील विद्यालय येथे उच्च माध्यमिक शिक्षण झाले. नंतर त्याने मेकॅनिकल हा अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. लहानपणापासून अभ्यासात हुशार असल्याने त्याला स्पर्धा परीक्षेचेही आकर्षण होते. त्याने पदवीच्या पहिल्या वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा व परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.

इंजिनिअरिंगसह केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास
एकीकडे अभियांत्रिकीचा अभ्यास तर दुसरीकडे या अभ्यासातून वेळ मिळाला की एमपीएससीचा अभ्यास असा दिनक्रम सुरु होता. हातात कोणतीही पदवी नव्हती, परंतू त्याने अनुभव घेण्यासाठी एमपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. कारणही तसंच होतं. त्याने गावाकडची परिस्थिती (Career Success Story) जवळून बघितली होती. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयाशी त्याचा संबंध यायचा. त्यावेळी एकेक कागद काढण्यासाठी दिवस जायचा. छोट्या कामासाठी लोकांची होणारी तारांबळ दिसायची. सरकार दरबारी काम न झाल्याने हताश झालेले लोक पाहून, समाजातील या लोकांसाठी आपण काहीतरी करावे; अशी त्याची इच्छा होती. या कारणामुळे त्याला महसूल खात्यात अधिकारी व्हायचे होते.

संपूर्ण राज्यात पटकावला 11 वा क्रमांक
समाधानने जिद्दीने अभ्यास केला. अभ्यासाच्या जोरावर त्याने कर निरीक्षक, वनसेवा, राज्यसेवा अशा विविध परीक्षा दिल्या. या सर्व परीक्षांत अगदी थोडक्या गुणांनी त्याला अपयशास सामोरे जावे लागले. त्याने पहिल्या परिक्षेत झालेल्या चूकातून वाट काढत परीक्षेची तयारी केली. इतकेच नव्हे तर MPSC च्या परिक्षेत महाराष्ट्र राज्यातून तो 11व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यास उपजिल्हाधिकारी पद मिळाले आहे. या पदावर काम करताना त्याला सर्वसामान्यांची सेवा करायची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Entrance Exam Schedule : MHT CET, CUET UG, NEET UG परीक्षांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी महत्वाची अपडेट

Entrance Exam Schedule

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (Entrance Exam Schedule) अपडेट हाती आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अभियांत्रिकी (Enginerring), वैद्यकीय (Medical) आणि फार्मसी (Pharmacy) यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे.
यामध्ये जेईई मेन सेशन-1 (JEE Main Session 1) ची परीक्षा 24 जानेवारीपासून सुरू होणार आहे. जेईई मेनसाठी नोंदणी आधीच झाली आहे. तर CUET PG 2024 साठी नोंदणी प्रक्रिया 26 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यात ज्या परीक्षांसाठी नोंदणी सुरू होणार आहे त्यांची सविस्तर माहिती पाहूया.

1. महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET)
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा (MHT CET) द्वारे आयोजित केली जाते. MHT CET 2024 परीक्षेसाठी (Entrance Exam Schedule) नोंदणी जानेवारी महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. MHT CET 2024 परीक्षा 16 एप्रिल ते 5 मे 2024 या कालावधीत घेण्यात येईल. याविषयी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्या.

2. CUET UG 2024 (Entrance Exam Schedule)
केंद्रीय विद्यापीठ आणि अनेक राज्य विद्यापीठांमधील प्रवेश हे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट (CUET 2024) च्या स्कोअरवर आधारित आहेत. CUET UG 2024 परीक्षा 15 मे ते 31 मे 2024 या कालावधीत होणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रियाही जानेवारी महिन्यातच सुरू होणार आहे.
3. NEET UG 2024
NEET UG ही पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. याद्वारे एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएस (BDS) सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. NEET UG NTA द्वारे ही परीक्षा आयोजित केली जाते. NEET UG 2024 ची परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या अखेरीस सुरू होण्याची (Entrance Exam Schedule) शक्यता आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही NEET UG 2024 neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावून माहिती घेवू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2024 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ‘या’ रिक्त पदांच्या 364 जागांवर भरती

NHM Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, पुणे येथे (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 364 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे
रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी – 120 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : MBBS
2. स्टाफ नर्स – 124 पदे (NHM Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
3. बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 120 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 12(विज्ञान) उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
पद संख्या – 364 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2024

वय मर्यादा – 65 ते 70 वर्षे
परीक्षा फी – (NHM Recruitment 2024)
खुला प्रवर्ग – ₹300/-
मागासवर्गीय: ₹200/-
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये दरमहा
2. स्टाफ नर्स – 20,000/- रुपये दरमहा
3. बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 18,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MES Pune Recruitment 2024 : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी!! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे भरती सुरु

MES Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (MES Pune Recruitment 2024) शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.

संस्था – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे
भरले जाणारे पद – शिक्षक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
E-Mail ID – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidates possessing B.Sc./M.Sc., B.Ed. (with relevant special method need) qualifications need apply for the post advertised.
असा करा अर्ज – (MES Pune Recruitment 2024)
1. उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

MES Pune Recruitment 2024

अशी होणार निवड –
1. या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2. पात्र उमेदवारांपैकी फक्त (MES Pune Recruitment 2024) निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
3. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने मुलाखतीसाठी यायचे आहे.
4. मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी संस्थेकडून कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
5. मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांनी त्यांचा CV आणि संबंधित कागदपत्रे सोबत ठेवावीत.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mespune.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GMC Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; दरमहा 47,600 एवढा पगार 

GMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय वैद्यकीय (GMC Recruitment 2024) महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर अंतर्गत गट ड (वर्ग-४) पदांच्या एकूण 680 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
भरले जाणारे पद – गट ड (वर्ग-४)
पद संख्या – 680 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण – नागपूर

वय मर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
अर्ज फी –
1. खुला प्रवर्ग – १०००/- रुपये
2. राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) – ९००/- रुपये
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 15,000/- ते 47,600/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे – (GMC Recruitment 2024)
1. अर्जातील नावाचा पुरावा (एस. एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
2. वयाचा पुरावा
3. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
4. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
7. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
8. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
9. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
11. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
12. भुकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
अराखीव  महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
14. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज सादर (GMC Recruitment 2024) करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या; अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.
6. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://gmcnagpur.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2024 : प्राध्यापकांनो!! MPSC आयोगाने जाहीर केली नवीन भरती; ही संधी सोडू नका

MPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (MPSC Recruitment 2024) विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरली जाणारी पदे – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 31 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी –
1. अराखीव (खुला) – रुपये ७१९/-
2. मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये ४४९/-

भरतीचा तपशील – (MPSC Recruitment 2024)

पद पद संख्या 
प्राध्यापक 06
सहयोगी प्राध्यापक 13
सहायक प्राध्यापक 12

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक A Bachelor’s Degree in Dental Surgery from an Indian University with Masters in Dental Surgery or Diplomat of National Board recognized by the Government of India on the recommendation of Council, in the concerned subject
सहयोगी प्राध्यापक A Bachelor’s Degree in Dental Surgery from an Indian University with Masters in Dental Surgery or Diplomat of National Board recognized by the Government of India on the recommendation of Council, in the concerned subject.
सहायक प्राध्यापक A Bachelor’s Degree in Dental Surgery from an Indian University with Masters in Dental Surgery or Diplomat of National Board recognized by the Government of India on the recommendation of Council, in the concerned subject.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
प्राध्यापक Rs.1,44,200/- to Rs.2,18,200/- plus allowances as per rules.
सहयोगी प्राध्यापक Rs.1,31,400/- to Rs.2,17,100/- plus admissible allowances as per rules.
सहायक प्राध्यापक Rs.57,700/- to Rs.2,11,500/- plus allowances as per rules.

 

असा करा अर्ज –
1. वरील पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या मुदती (MPSC Recruitment 2024) अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करायचे आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2024 : ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज; महावितरणमध्ये 468 पदांवर भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Mahavitaran Recruitment 2024) कंपनी लि. ने भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या एकूण 468 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.
भरले जाणारे पद – कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
पद संख्या – 468 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Mahavitaran Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल
परीक्षा (Online) – फेब्रुवारी/मार्च 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – B.Com/BMS/BBA, MSCIT किंवा समतुल्य
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे
2. मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट
परीक्षा फी – (Mahavitaran Recruitment 2024)
1. खुला प्रवर्ग – ₹500/-
2. मागासवर्गीय/अनाथ – ₹250/-
मिळणारे वेतन – 19,000/- ते 21,000/- रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com