Home Blog Page 164

JEE Mains 2024 : JEEचे प्रवेशपत्र आले!! असं करा डाउनलोड

JEE Mains 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल परीक्षा एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Mains 2024) 2024 सत्र-1 साठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
या बातमी सोबत महत्वाची दुसरी अपडेट अशी आहे; बीटेक (B. Tech) आणि बीईचा (BE) पेपर आता 27, 29, 30, 31 आणि 1 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. बीआर्क (B.Arch) आणि बीप्लानिंगचा पेपर हा 24 जानेवारीला होणार आहे.

प्रवेश पत्र कसं डाउनलोड करायचं?
1. सर्वात अगोदर jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. Download Admit Card B.Arch/B.Planning वर क्लिक करा.
3. तिथे एक लिंक दिसेल.
4. तुमचा अॅप्लिकेशन नंबर आणि तुमची जन्म तारीख आणि तुमचा पासवर्ड टाका.
5. त्यानंतर लाॅगिंन करा. (JEE Mains 2024)
6. तिथेच तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र दिसले.
7. ते डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.

परीक्षेसाठी महत्वाच्या सुचना – (JEE Mains 2024)
1. परीक्षेत कोणीही काॅपी करताना आढळल्यास त्या विद्यार्थ्याला परीक्षेस बसू दिले जाणार नाही. त्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
2. टॉयलेट ब्रेकनंतर विद्यार्थ्याची तपासणी केली जाईल.
3. बायोमेट्रिक सिस्टमधून परत विद्यार्थ्यांला प्रोसेस करावी लागेल.
जेईई (मेन) 2024 ही परीक्षा तब्बल 13 भाषांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : ग्रॅज्युएट असणाऱ्यांना ‘या’ बँकेत मिळेल भरभक्कम पगाराची नोकरी 

Banking Job (24)

करिअरनामा ऑनलाईन । लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, लातूर (Banking Job) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, लिपीक, रिस्क बेस्ड इंटरनल ऑडीटर, आयटी मॅनेजर (सहाय्यक) पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

संस्था – लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, लातूर
भरली जाणारी पदे – शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, लिपीक, रिस्क बेस्ड इंटरनल ऑडीटर, आयटी मॅनेजर (सहाय्यक)
पद संख्या – 26 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर

भरतीचा तपशील – (Banking Job)

पद पद संख्या 
शाखा व्यवस्थापक 06
वरिष्ठ अधिकारी 07
लिपीक 10
रिस्क बेस्ड इंटरनल ऑडीटर 01
आयटी मॅनेजर (सहाय्यक) 02

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापक B.Com/M.Com. /MBA/CA/ICWA/CAIIB
वरिष्ठ अधिकारी B.Com./M.Com. /MBA/ICWA/CAIIB
लिपीक B.Com./M.Com. /B.A. /BCA/MCA/ BSc./BCS
रिस्क बेस्ड इंटरनल ऑडीटर B.Com./M.Com./MBA/CA/ICWA/CAIIB
आयटी मॅनेजर (सहाय्यक) BE (Computer/IT/Electronics), MCA, CBS, Digital Chanel, Banking & Database Knowledge

मिळणारे वेतन – (Banking Job)

पद वेतन
शाखा व्यवस्थापक रु.५०,०००/- ते ७०,०००/-
वरिष्ठ अधिकारी रु.२०,०००/- ते ३०,०००/-
लिपीक रू.१५,०००/- ते २०,०००/-
रिस्क बेस्ड इंटरनल ऑडीटर रु.२५,०००/- ते ५०,०००/-
आयटी मॅनेजर (सहाय्यक) रू.२५,०००/- ते ५०,०००/-

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आपलोड करेही आहेत.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Banking Job) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
5. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://laturbank.co.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RCFL Recruitment 2024 : ऑफिसर, इंजिनिअर पदावर नोकरी मिळवा; राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सने काढली जाहिरात

RCFL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन ।  राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCFL Recruitment 2024) लिमिटेड, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी, अभियंता पदाच्या 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई
पद संख्या – 06 पदे (RCFL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
अधिकारी MBBS with completion of Internship and registration with Medical Council of India / Maharashtra Medical Council/ other State Medical Council
अभियंता Regular full time B.E /B.Tech./ B.Sc Engg. (Environmental Engg.) from university recognized by UGC/ Government institution / AICTE approved

 

वय मर्यादा – (RCFL Recruitment 2024)
1. अधिकारी – UR साठी – 34 वर्षे/ओबीसी प्रवर्गासाठी – ३७ वर्षे.
2. अभियंता – 30 वर्ष
अर्ज फी – ₹1000/-
मिळणारे वेतन – 40,000/- ते 1,40,000/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahagenco Recruitment 2024 : माहिती व जनसंपर्क अधिकारी पदावर नोकरीची संधी; तब्बल 45,800 ते 1,15,905 रुपये पगार मिळवा

Mahagenco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahagenco Recruitment 2024) लिमिटेड येथे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी पदावर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी
भरले जाणारे पद – सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahagenco Recruitment 2024)
1. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पत्रकारितेत किंवा मास कम्युनिकेशन मध्ये प्रथम श्रेणीतील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पत्रकारिता किंवा जनसंवादात प्रथम श्रेणीसह बॅचलर पदवी 2. इंग्रजी, मराठी आणि हिंदीचे ज्ञान आवश्यक आहे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत
परीक्षा फी – 944/- रुपये. (Mahagenco Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 45,800/- रुपये ते 1,15,905/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : भारतीय संविधानात एकूण किती भाषा आहेत? परीक्षेत विचारले जाऊ शकतात असे महत्वाचे प्रश्न

GK Updates 21 Jan.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1: लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते ऍसिड असते?
उत्तर – साइट्रिक एसिड (GK Updates)
प्रश्न 2: महाराणा प्रताप यांनी ‘बुलबुल’ कोणाला म्हटले?
उत्तर – आपल्या घोड्याला
प्रश्न 3: सिंधू संस्कृतीचे बंदर कोठे होते?
उत्तर – लोथल

प्रश्न 4: सम्राट अशोक कोणाचा उत्तराधिकारी होता?
उत्तर – बिंदुसार (GK Updates)
प्रश्न 5: भारतीय संविधानात किती भाषा आहेत?
उत्तर – 22 भाषा
प्रश्न 6: मिल्खा सिंग यांना काय म्हणतात?
उत्तर – फ्लाइंग शीख ऑफ इंडिया

प्रश्न 7: (GK Updates) ‘शाहनामा’ हे कोणाचे कार्य आहे?
उत्तर – फिरदौस
प्रश्न 8: रणथंबोर चित्ता अभयारण्य कोठे आहे?
उत्तर – राजस्थान
प्रश्न 9: कोणता देश नोबेल पारितोषिक प्रदान करतो?
उत्तर – यूएसए (USA)
प्रश्न 10: ‘भारतरत्न पुरस्कार’ प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते?
उत्तर – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : शिक्षण संचालनालयात ‘विशेष शिक्षक’ पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण संचालनालय UT प्रशासन (Job Alert) दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे विशेष शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.

संस्था – शिक्षण संचालनालय UT प्रशासन दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. विशेष शिक्षक (माध्यमिक) – 02 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर सह बी.एड. (विशेष शिक्षण)
2. विशेष शिक्षक (प्राथमिक) – 02 पदे
12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि 2 वर्षांचा डी.एड. अपंगत्वाच्या कोणत्याही श्रेणीतील विशेष शिक्षण

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Alert)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The office of the Department of Education, 3rd Floor, Room No. 312, Lekha Bhavan, 66 KV road Amli-Silvassa – 396230.
वय मर्यादा –
1. उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – (Job Alert)
1. विशेष शिक्षक (माध्यमिक) – 27,000/- रुपये दरमहा
2. विशेष शिक्षक (प्राथमिक)- 26,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – दमण

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.daman.nic.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSSC Recruitment 2024 : निवड झाल्यानंतर 50,000 पर्यंत मिळेल पगार; राज्याच्या सुरक्षा महामंडळात विविध पदांवर भरती सुरु

MSSC Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
पद संख्या – 17 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005.

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सह संचालक- 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
2. सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी -01
आवश्यक शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून किंवा राज्य राखीव पोलीस बलातून सहा. पोलीस आयुक्त / पोलीस उप अधिक्षक (सशस्त्र / निशस्त्र) या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असावी.
3. सेवानिवृत्त ACP -05 (MSSC Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असावी.
4. सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक – 10 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असावी.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 61 वर्षापर्यंत.
मिळणारे वेतन – 45,000/- रुपये ते 50,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण – पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005.

काही महत्वाच्या लिंक्स – (MSSC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.mahasecurity.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

TMC Recruitment 2024 : राज्याच्या ‘या’ महापालिकेत विविध पदांवर भरती; दरमहा 60 हजार एवढा पगार

TMC Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध (TMC Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, टीबीएचव्ही पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.

संस्था – ठाणे महानगरपालिका
पद संख्या – 3 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी घेतली असावी. (TMC Recruitment 2024)
2. टीबीएचव्ही – 02 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – विज्ञानात पदवीधर, इंटरमिजिएट (10+2) विज्ञान आणि अनुभव MPW/LHV/ANM/आरोग्य कर्मचारी/प्रमाणपत्र म्हणून काम केल्याचे आरोग्य शिक्षण / समुपदेशन उच्च अभ्यासक्रम

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, 4था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – 400 602.
वय मर्यादा – (TMC Recruitment 2024)
1. 38 ते 70 वर्षे
2. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
मिळणारे वेतन – 15,000/- रुपये ते 60,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIASL Recruitment 2024 : परीक्षा नाही… थेट मुलाखत!! एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये ग्रॅज्युएट असलेल्यांना नोकरीची संधी

AIASL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर सर्विसेस (AIASL Recruitment 2024) लिमिटेडमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सिक्युरिटी एक्सिक्युटीव्ह पदांच्या 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 01, 02, आणि 03 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड
भरले जाणारे पद – सिक्युरिटी एक्सिक्युटीव्ह (SECURITY-EXECUTIVE)
पद संख्या – 130 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 28 वर्षांपर्यंत
2. SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट (AIASL Recruitment 2024)
मिळणारे वेतन – रु. 27,450/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – चेन्नई आणि मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 01, 02 आणि 03 फेब्रुवारी 2024
मुलाखतीची वेळ – 09:00 AM ते 12:00 PM
मुलाखतीचे ठिकाण – (AIASL Recruitment 2024)
1. चेन्नई – AI Airport Services Limited, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai 600043.
2. मुंबई – AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai 40099.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BARTI Scholarship : बार्टीतील पीएचडीचे विद्यार्थी अधिछात्रवृत्तीपासून वंचित; UGCचे नियम धाब्यावर; न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

BARTI Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । BANRF-२०१८ अधिछात्रवृत्ति पीएचडी (BARTI Scholarship) संशोधक विदयार्थी कृति समिती यांच्या मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे यांच्याकडे युजीसी च्या नियमांनुसार ५ वर्षे संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी गेली तीन वर्षे झाले रीतसर पाठपुरावा सुरु आहे; तरीदेखील त्यांना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही; विशेष म्हणजे BANRF-२०१८ M.Phil संशोधकांना युजीसी चा नियम लागु केला जातो. परंतु BANRF-२०१८ च्या पीएचडी संशोधकांना युजीसी चे नियम लागू का केले जात नाहीत? असा संतप्त सवाल विद्यार्थी समितीमार्फत विचारण्यात येत आहे.
आता महाराष्ट्रात सर्व शिष्यवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच सरकारने BARTI २०१८ संशोधक विद्यार्थ्यांच्या मागणीकडे लक्ष घालून तत्काळ हितकारक निर्णय घेऊन BANRF-२०१८ च्या पीएचडी संशोधकांना न्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थी कृती समिती कडून होत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे.

बार्टी ही संस्था राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता अर्थसहाय्य करीत असते. २०१३ पासून युजीसी (UGC) च्या नियमांनुसार पीएचडी संशोधकांना (BARTI Scholarship) अधिछात्रवृत्ती देण्याची तरतूद करण्यात आली व राज्यातील अनु.जाती प्रवर्गातील संशोधकांना एक नवी दिशा निर्माण झाली. सन-२०१८ अर्थात BANRF-२०१८ च्या संशोधक वि‌द्यार्थ्यांच्या लक्षात आले की, बार्टी प्रशासन यु.जी.सी चे नियम आपल्या सोयीने वापरत आहे. कारण  युजीसी व एनएफएससी (NFSC) मध्ये पीएचडी संशोधन अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण कालावधी ५ वर्षाचा आाहे. परंतु बार्टीने BANRF-२०१८ पीएचडी संशोधकांना केवळ 3 वर्षच अधिछात्रवृत्ती मान्य करुन युजीसीच्या नियमांना डावलल्याचे दिसते. बार्टी एकीकडे युजीसी-२०१९ च्या नवीन नियमांचा अवलंब करून BANRF-२०१८ च्या वि‌द्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती रक्कम अदा करते, तर दुसरीकडे संशोधन अधिछात्रवृत्ती फक्त 3  वर्षच देऊ करून अन्याय करते.

BANRF-२०१८ संशोधक कृति समितीच्या वतीने 5 वर्ष अधिछात्रवृत्ति मागणी करिता पहिले बंड पुकारले आणि BANRF-२०१९ च्या बॅच पासून बार्टीने ५ वर्ष अधिछात्रवृत्ति युजीसी च्या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. परंतु BANRF-२०१८ पीएचडी संशोधक (BARTI Scholarship) अजुनही ५ वर्ष अधिछात्रवृत्तीपासून वंचित राहिला आहे. बार्टी प्रशासन जर २०१९ नंतरचे युजीसीच्या नियमाचे अवलोकन करत असेल तर BANRF-२०१८ च्या संशोधक विद्यार्थ्यांना Award Letter हे बार्टी ने ३० जून २०२० रोजी दिले. अर्थातच २०१९ चे युजीसी चे नियम BANRF-२०१८ च्या विदयार्थ्यांना लागू करण्यात यावेत; अशी रास्त मागणी संशोधक विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आज पर्यंत गेली तीन वर्षात बार्टी कार्यालया समोर ५९ दिवस धरणे आंदोलन, ५ वेळेस आमरण उपोषण व मुंबई येथे जलसमाधी आंदोलन इत्यादी मार्गांचा वेळोवेळी अवलंब करून सुद्धा अजूनही विद्यार्थी अधिछात्रवृत्ती पासून वंचित आहेत.
उच्चशिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणासाठी आंदोलने करावी लागतात ही शोकांतिका आहे असे विद्यार्थ्यांचे मत आहे. त्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय खात्याचे सचिव,आमदार,खासदार, केंद्रीय मंत्री यांची विद्यार्थी शिष्टमंडळाने वेळोवेळी भेट घेऊन, निवेदने देऊनही काही फायदा झालेला दिसून येत नाही.

शिंदे, फडणवीस सरकार हे जनसामान्याचे सरकार असेल तर जनसामांन्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कार्य करू नये. बार्टी संस्था स्वायत्त संस्था असून देखील आपल्या अधिकाराचा वापर न करता शासन स्तरावरील आदेशाची वाट पहात आहे. त्यांच्या या शिथिल धोरणामुळे वि‌द्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे.
आता महाराष्ट्रात सर्व शिष्यवृत्तीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच सरकारने BARTI २०१८ संशोधक विद्यार्थ्यांच्या मागणीकडे लक्ष घालून तत्काळ हितकारक निर्णय घेऊन BANRF-२०१८ च्या पीएचडी संशोधकांना न्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थी कृती समिती कडून होत आहे.

BANRF-२०१८ ची बॅच ही कोविड-१९ व लॉकडाऊन मुळे अगोदरच त्रस्त झाली आहे. त्यात बार्टीने तीनच वर्षे फेलोशिप देऊ अशी भूमिका घेतली. मुळात कोविड व लॉकडाऊन व यूजीसी या गोष्टीचा विचार करून BANRF-२०१८ पीएचडी करणाऱ्या २१४ संशोधकांना विशेष बाब तसेच विशेष बॅच म्हणून (BARTI Scholarship) घोषित करून त्यावरील अन्याय दूर करून ५ वर्ष अधीछात्रवृत्ती मान्य करून रक्कम त्यांच्या खात्यामध्ये तत्काळ वर्ग करावी, तसेच येणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्येही हा प्रलंबित विषय अती प्राधान्याने मार्गी लावावा अन्यथा संविधानिक मार्गाचा अवलंब करावा लागेल; असा इशारा BANRF-२०१८ पीएचडी संशोधक विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com