Home Blog Page 163

ISRO Recruitment 2024 : इस्रोसोबत काम करण्याची मोठी संधी!! ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

ISRO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2024) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ/अभियंता SC, वैद्यकीय अधिकारी SC, नर्स B, ग्रंथालय सहाय्यक A पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था
भरले जाणारे पद – शास्त्रज्ञ/अभियंता SC, वैद्यकीय अधिकारी ‘SC’, नर्स ‘B’, ग्रंथालय सहाय्यक ‘A’
पद संख्या – 41 पदे (ISRO Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे

भरतीचा तपशील – (ISRO Recruitment 2024)

पद पद संख्या 
शास्त्रज्ञ/अभियंता SC 35
वैद्यकीय अधिकारी ‘SC’ 01
नर्स ‘B’ 02
ग्रंथालय सहाय्यक ‘A’ 03

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ISRO Recruitment 2024)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ/अभियंता SC Graduation
वैद्यकीय अधिकारी ‘SC’ M.B.B.S
नर्स ‘B’ SSLC/SSC + First Class Diploma of three years duration in General Nursing and Midwifery recognized by State/Central Government
ग्रंथालय सहाय्यक ‘A’ Graduation in First Class + First Class Master’s Degree in Library Science/ Library & Information Science or equivalent from a recognized University/Institution.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
शास्त्रज्ञ/अभियंता SC ₹. 81,906/-
वैद्यकीय अधिकारी ‘SC’ ₹. 81,906/-
नर्स ‘B’ ₹. 65,554/-
ग्रंथालय सहाय्यक ‘A’ ₹. 65,554/-

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार खाली दिलेल्या (ISRO Recruitment 2024) लिंक वरुन थेट अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career in Dance Choreography : डान्स कोरिओग्राफीमध्ये करता येईल करिअर; कुठे घ्याल शिक्षण?

Career in Dance Choreography

करिअरनामा ऑनलाईन । नृत्य असो की संगीत…. यांच्याविषयी (Career in Dance Choreography) आकर्षण कोणाला नाही? देशातील प्रत्येक प्रांताला स्वतःची नृत्यकला लाभली आहे. भारतीय पारंपरिक नृत्यकला सादरीकरणाला जगभरात मोठी मागणी आहे. ज्यांना आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. पाश्चात्य नृत्य प्रकारांना, ज्याप्रमाणे मागणी असते; तशीच मागणी कथ्थक, भरतनाट्यम अशा पारंपारीक भारतीय नृत्य प्रकारांनाही देशात आणि जगभरात मागणी आहे.

करिअरमधील विविध संधी
तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे, की या क्षेत्रात प्रसिद्धी मिळविण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. या क्षेत्रात पूर्णपणे करिअर करायचे असेल तर शाळा, महाविद्यालयांमध्ये संगीत, नृत्य शिक्षक म्हणूनही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याबरोबर नृत्य, संगीत यांचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्थांमध्ये कलाकारांना प्रशिक्षण देण्याचे काम मिळू शकते. नृत्य, संगीत प्रशिक्षणाच्या खासगी संस्थांमध्ये शिक्षण देण्याचे काम पार्टटाइमही केले जाऊ शकते. आपली नोकरी सांभाळून नृत्य, संगीत, गाण्याचे कार्यक्रम करणारे अनेक कलाकारही समाजात आहेत.

स्वतःची नृत्य अकादमी सुरु करु शकता
ओडिसी, कुचीपुडी, कथ्थक, भरतनाट्यम, लोकनृत्य या परंपरागत नृत्य प्रकारांबरोबरच आधुनिक नृत्य हा प्रकारही या शिक्षणात समाविष्ट झालेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्य दिग्दर्शकांना (Dance Choreographer) सध्या मोठी मागणी आहे. नृत्यशिक्षक, नृत्य संयोजक, स्टेज सेटिंग संयोजक, रिहर्सल सुपरवायझर म्हणून तुम्ही करिअरची सुरुवात करु शकता. नृत्य कलेचे शिक्षण घेणाऱ्यांना अनेक नाट्यसंस्था, लोककला विषयक संस्था यामध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच तुम्ही स्वतःची नृत्य अकादमी सुरु करू शकता.

12 वी नंतर घेवू शकता पुढील शिक्षण (Career in Dance Choreography)
नृत्यांगना होण्यासाठी तुम्ही 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर प्रतिष्ठित नृत्य संस्थेत प्रवेश घेऊ शकता. नृत्य शिकण्यासाठी, तुम्ही कोणत्याही संस्थेतून नृत्याचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा कोर्स करू शकता किंवा परफॉर्मिंग आर्ट्समध्ये डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री मिळवू शकता. नृत्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तुम्ही फिल्म इंडस्ट्री, टीव्ही इंडस्ट्री, रिअॅलिटी शो किंवा डान्स शोमध्ये डान्स ऑडिशनसाठी अर्ज करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोरिओग्राफर म्हणूनही तुमचे करिअर सुरू करू शकता.

भारतातील टॉप डान्सिंग स्कूल
नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी नामांकित संस्थेतून डिप्लोमा, बॅचलर किंवा मास्टर्स पदवी घेणे हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत. तुम्हाला (Career in Dance Choreography) हवे असल्यास तुम्ही त्यात संशोधनही करू शकता. भारतातील टॉप डान्सिंग स्कूल आहेत- संगीत नाटक अकादमी, बनारस हिंदू विद्यापीठ, भारतीय विद्या भवन, नालंदा नृत्य संशोधन केंद्र, भारतीय विद्या भवन, भारतियार पलकलाईकूडम आणि गांधर्व महाविद्यालय इत्यादि.

अनुभवानुसार मिळतो पगार 
नर्तक अनेक जॉब प्रोफाईलवर काम करतात – डान्स टीचर, कोरिओग्राफी, आर्ट्स अॅडमिनिस्ट्रेशन, योगा आणि पिलेट्स टीचर, डान्स फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर, डान्सर मेडिसिन स्पेशालिस्ट इत्यादि. या क्षेत्रात अनुभवानुसार तुमचा दर्जा आणि पगार वाढतो. एक यशस्वी नर्तक त्याच्या शोद्वारे लाखो रुपये कमवू शकतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही नृत्याच्या विशिष्ट प्रकारातही निष्णात होऊ शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Tips : कॉलेज लाईफमध्येच शिका ‘हे’ स्किल्स; करिअर घडवताना येणार नाही अडचण

Career Tips (15)

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन जीवन प्रत्येकासाठी (Career Tips) खूप महत्वाचे आहे, कारण येथूनच आयुष्याच्या एका नवीन टप्प्याचा पाया घातला जातो. त्यामुळे व्यावसायिक जीवनाची योग्य तयारी कॉलेज कॅम्पसमधून होणे अत्यंत आवश्यक आहे. या मालिकेत आज आम्ही तुम्हाला अशाच काही कौशल्यांची माहिती देणार आहोत जी कौशल्ये विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकत असतानाच आत्मसात करु शकतात. ही कौशल्ये त्यांना भविष्यात कार्यालयीन जीवनात खूप उपयोगी ठरणार आहेत. आज आम्ही याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देत आहोत.

1. संवाद
बर्‍याच वेळा विद्यार्थी संवाद कौशल्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना असे वाटते की, यात काय मोठे आहे? संवाद कौशल्याकडे विशेष लक्ष न दिल्याने अनेक वेळा उमेदवार गट चर्चेत (Group Discussion) किंवा सर्वसाधारणपणे त्यांचे विचार प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. यामुळे अनेक वेळा चांगले ज्ञान असूनही ते मागे पडतात. अशा परिस्थितीत महाविद्यालयातूनच विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य प्रभावीपणे करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

2. तंत्रज्ञान
आज AI च्या युगात जग झपाट्याने बदलत आहे. अशा (Career Tips) परिस्थितीत करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच तुम्ही तुमच्या करिअरच्या वाढीसाठी सोशल मीडियाचा अधिक चांगला वापर कसा करू शकता; याबाबत महाविद्यालयातूनच माहिती गोळा करण्यास सुरुवात केली पाहिजे.

3. टीम वर्क (Career Tips)
विद्यार्थी दशेत प्रोफेशनल लाइफची तयारी करत असताना आणखी एक कौशल्य अवगत करणे खूप महत्त्वाचे असते ते म्हणजे टीमवर्क. अनेकवेळा अशी परिस्थिती उद्भवते की लोकांना संघ म्हणून काम करावे लागते. ठराविक मुदतीत अनेक लोकांसोबत काम करून प्रकल्प पूर्ण करावा लागतो. अशा परिस्थितीत कॉलेजमधूनच टीमवर्कची भावना विकसित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अनेक मित्रांसोबत मिळून असाइनमेंट पूर्ण करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DRDO Recruitment 2024 : DRDO अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी; थेट द्या मुलाखत

DRDO Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO Recruitment 2024) अंतर्गत JRF, RA पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
भरले जाणारे पद – JRF, RA
पद संख्या – 14 पदे (DRDO Recruitment 2024)
वय मर्यादा – 28 ते 35 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
मुलाखतीचा पत्ता – DIHAR बेस लॅब, 3 BRD जवळ, औद्योगिक क्षेत्र, फेज-II, चंडीगढ 160002

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
JRF 13
RA 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (DRDO Recruitment 2024)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
JRF
  • M.Sc./M.V.Sc in first division with NET qualification.
  • M.Tech in first division at both Graduate and Post-graduate level
RA Ph.D in Agriculture Extension with atleast one research paper in SCI journal.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
JRF Rs. (37,000/- + HRA) per month
RA Rs. (67000/- + HRA) per month

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. मुलाखतीची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
5. मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BOB Recruitment 2024 : बँकेत नोकरी!! बँक ऑफ बडोदामध्ये निवड झाल्यास मिळेल महिन्याला 69,810 एवढा पगार 

BOB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार नोकरीच्या शोधात (BOB Recruitment 2024) आहेत आणि ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2024 आहे.

बँक – बँक ऑफ बडोदा
भरले जाणारे पद – सुरक्षा अधिकारी (Manager Security)
पद संख्या – 38 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारी 2024
मिळणारे वेतन –  49,910/- रुपये ते 69,810/- रुपये दरमहा

श्रेणीनुसार भरतीचा तपशील –
1. SC श्रेणी – 5 पदे
2. ST श्रेणी – 2 पदे
3. OBC प्रवर्ग – 10 पदे
4. EWS श्रेणी – 3 पदे
5. UR श्रेणी – 18 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BOB Recruitment 2024)
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. यासह, उमेदवारास आर्मी/नेव्ही/एअर फोर्समधील कमिशन्ड सेवेचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.
वय मर्यादा –
1. किमान वय – २५ वर्षे
2. कमाल वय – ३५ वर्षे (BOB Recruitment 2024)
3. एससी/एसटी – ५ वर्षांची सूट
4. ओबीसी – ३ वर्षांची सूट
अर्ज फी –
1. सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांना 600/- रुपये
2. SC, ST आणि महिला उमेदवारांना 100/-

अशी होणार निवड –
1. ऑनलाइन चाचणी
2. सायकोमेट्रिक चाचणी किंवा गट चर्चा
3. मुलाखत
काही महत्वाच्या लिंक्स – (BOB Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bankofbaroda.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahatransco Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी मोठी बातमी!! महापारेषण मध्ये 130 पदांसाठी नवीन भरती सुरु

Mahatransco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Mahatransco Recruitment 2024) पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक अभियंता (संसर्ग) या पदाच्या एकूण 130 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद – सहाय्यक अभियंता (संसर्ग)
पद संख्या – 130 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळविण्यात येईल
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी घेतली असावी.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 57 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी – 700/- रुपये (Mahatransco Recruitment 2024)
– राखीव प्रवर्ग / EWS / अनाथ – 350/- रुपये
– अपंग – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 49,210/- रुपये ते 1,19,315/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahatransco Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Oil India Recruitment 2024 : पात्रता फक्त 10वी पास; ऑईल इंडियाने जाहीर केली 421 पदांवर भरती

Oil India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध (Oil India Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून GRADE-III पदांच्या एकूण 421 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

संस्था – ऑईल इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – GRADE-III
पद संख्या – 421 पदे (Oil India Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
मिळणारे वेतन – 26,600/- ते 90,000/- रुपये दरमहा
असा करा अर्ज – (Oil India Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.
6. दिलेल्या मुदती नंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.oil-india.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahavitaran Recruitment 2024 : 10वी/ITI पास असणाऱ्यांना महावितरणमध्ये उत्तम नोकरीची संधी

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (Mahavitaran Recruitment 2024) कं. मर्या. अमरावती ग्रामीण विभागा अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या. अमरावती ग्रामीण विभाग
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 56 पदे (Mahavitaran Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2024
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती
नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

भरतीचा तपशील – (Mahavitaran Recruitment 2024)

पदाचे नाव पद संख्या
इलेक्ट्रिशियन 25 पदे 
लाईनमन 25 पदे
कोपा 06 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिकल / कोपा ट्रेड मध्ये ITI पास असणे आवश्यक.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. सदर भरती ही फक्त अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आहे.
6. नोंदणी झाल्यानंतर अर्जाची प्रत स्वतः संबंधित पत्त्यावर जमा करायची आहे.
7. अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
8. अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
9. ऑनलाईन अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर जमा करायची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Mahavitaran Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Linkedin Survey : नोकरी करणारेच आहेत नोकरीच्या शोधात; अहवालातून समोर आले धक्कादायक खुलासे

Linkedin Survey

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल नोकरी मिळवणे (Linkedin Survey) खूप अवघड झाले असताना अनेकजण नोकरी सोडण्याच्या तयारीत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. एकीकडे नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागत असताना दुसरीकडे असा अहवाल समोर येणं म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल. या अहवालानुसार 2024 मध्ये भारतातील सुमारे 88 टक्के नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत. या लोकांना त्यांच्या सध्याच्या कंपनीतून अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे राजीनामा द्यायचा आहे.

लिंक्डइनने केलं सर्वेक्षण
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LinkedIn ने 24 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 दरम्यान देशभरातील 1097 नोकरदार लोकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणादरम्यान असे समोर आले आहे; की प्रत्येक 100 नोकरदार लोकांपैकी 88 लोक त्यांच्या सध्याच्या नोकरीवर खुष नाहीत. त्यांना नोकरी (Linkedin Survey) बदलायची आहे. या सर्वेक्षणात अर्धवेळ आणि पूर्णवेळ अशा दोन्ही प्रकारच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला होता.

नोकरी बदलण्याचं मुख्य कारण काय?
लिंक्डइनने सर्वेक्षणाबाबत लोकांना अनेक प्रश्न विचारले, ज्यात ते काम करत असलेल्या कंपनीची कार्यसंस्कृती कशी आहे? तो त्याच्या पगारावर समाधानी आहे की नाही? त्याला नोकरी बदलायची असेल तर त्याची मुख्य कारणे कोणती? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. या अहवालानुसार असं समोर आलं आहे; की 42 टक्के लोकांना त्यांचे काम आणि आयुष्य यात संतुलन साधायचे आहे. तर 37 टक्के लोकांना पगारवाढीसाठी नोकरी बदलायची आहे.

नोकरी सोडून व्यवसाय सुरु करायचा (Linkedin Survey)
79 टक्के लोकांना त्यांची सध्याची नोकरी सोडून नवीन व्यवसायसुरु करायचा आहे. हे लोक त्यांच्या सध्याच्या पगार वाढीबद्दल अजिबात समाधानी नाहीत. त्यांना विश्वास आहे की त्यांनी नवीन व्यवसायात नशीब आजमावले तर त्यांची परिस्थिती सुधारू शकते.
रिझ्युमे बनवण्यासाठी डिजिटल फॉरमॅटची मदत
याशिवाय आता लोक नोकरीच्या शोधात रिझ्युमे बनवण्यासाठी डिजिटल फॉरमॅटचीही मदत घेत आहेत. अहवालानुसार, 72 टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी नोकरीसाठी (Linkedin Survey) डिजिटल रीझ्युमे तयार केला आहे, ज्यामध्ये त्यांनी व्हिडिओ फॉरमॅट देखील वापरला आहे. याशिवाय सुमारे 81 टक्के लोकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे तंत्रज्ञान नोकरी शोधण्यासाठी प्रभावी असल्याचे मानले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Success Story : “अधिकारी होणार यावर ठाम विश्वास होता; सासर-माहेरच्या भक्कम पाठिंब्यामुळे यश मिळवू शकले”- पूजा वंजारी

MPSC Success Story of Pooja Vanjari

करिअरनामा ऑनलाईन । “साधारण 2015 पासून मी परीक्षेची (MPSC Success Story) तयारी करीत होते. 2020 मध्ये परिक्षेत पास झाल्यानंतर सहाय्यक निबंधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझं लग्न झालं आहे. लग्नानंतरही घर-संसार सांभाळत मी राज्यसेवेची तयारी सुरु ठेवली आणि अभ्यासात सातत्य ठेवले. त्याचे फळ मला मिळाले आहे. कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळेच नोकरी सांभाळत यश मिळवता आले आहे”; हे संगत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमधून अव्वल ठरलेली पूजा वंजारी.

सहा वेळा अपयश आल्यानंतर सातव्या प्रयत्नात मिळाले यश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल काही दीवसापूर्वी जाहीर झाला आहे. एकूण 613 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत विनायक पाटील याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच पूजा अरुण वंजारी हिने 570.25 गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये पिंपरी- चिंचवडची पूजा वंजारी अव्वल आली आहे. एमपीएससी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेली पूजा वंजारी ही मूळची सांगली जिल्ह्यातील आहे. लग्नानंतर ती पिंपरी चिंचवड येथे राहण्यासाठी आली. सहा वेळा अपयश आल्यानंतर सातव्या प्रयत्नात पूजा वंजारीने हे यश मिळवलं आहे. इतकचं नाहीतर ती मुलींमध्ये राज्यात पहिली देखील आली.

पूजाचा आत्मविश्वास आणि पतीचा खंबीर पाठिंबा (MPSC Success Story)
पूजा हिला कुटुंबातून शैक्षणिक आणि शेतकरी पार्श्वभूमी लाभली आहे. तिला आपण अधिकारी होऊ शकतो यावर ठाम विश्वास होता. त्यामुळे या परिक्षेत सहा वेळा अपयश आल्यानंतरही तिने प्रयत्न सोडले नाहीत. सातव्या वेळी पूजा यश संपादन करू शकली आणि नुसती पास नाही तर ती राज्यात मुलींमध्ये पहिली आली. यामध्ये पूजाला तिच्या पतीचा खंबीर पाठिंबा मिळाला. स्पर्धा परीक्षेसाठी पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले, असं पूजा आवर्जून सांगते.

अभियांत्रिकी सोबत केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास 
2014 मध्ये जेव्हा पूजा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. ती सांगते; जेव्हा मी निकाल पाहिला तेव्हा मला खूप आनंद झाला. माझे (MPSC Success Story) स्वप्न पूर्ण झाल्याने आनंदाला पारावार उरला नाही. माझ्या यशात माझे कुटुंब तसेच माझ्या सासरच्या मंडळींचा हातभार आहे. मी दररोज सुमारे आठ तास अभ्यास करायचे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.”

यशापेक्षा अपयश जास्त बघावं लागतं
ती सांगते; “कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना यशापेक्षा अपयश जास्त बघावं लागतं हे तितकंच खरं आहे. ते माझ्या बाबतीतही खरं ठरलं आहे. एमपीएससी परीक्षेत मला सहावेळा अपयश आलं होतं. मात्र मी न थांबता प्रयत्न सुरुच ठेवले. 2019 या वर्षी स्पर्धा परीक्षा देताना यामध्ये मला केवळ 13 गुण कमी पडले आणि पुन्हा दुर्दैवाने ही संधी हुकली. त्यानंतर मी कसून तयारी केली आणि 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिला येण्याचा मान मिळवला आहे.”

जीद्द आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण
2015 आणि 2016 या दोन्ही प्रयत्नात पूर्वपरीक्षेत पूजा पास होवू शकली नाही. त्यानंतर 2017 मध्ये पूजाने मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली मात्र तिला तिथे यश मिळालं नाही. 2018 मध्ये पूजाला पुन्हा पूर्वपरीक्षेत अपयशाला सामोरं जावं लागलं. हा निकाल पाहिल्यानंतर तासाभरातच तिने (MPSC Success Story) अभ्यासाला सुरुवात केली होती. यामधून कळतं की पूजा जिद्द आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे. 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत पुजाला 13 गुण कमी पडले आणि पुन्हा तिची संधी हुकली. अखेर 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत तिने बाजी मारलीच.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com