Home Blog Page 147

Central Bank of India Recruitment 2024 : सर्वात मोठी बातमी!! सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 3 हजार पदांवर भरती; ही संधी सोडू नका

Central Bank of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मोठी भरती (Central Bank of India Recruitment 2024) जाहीर केली आहे. या अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या तब्बल 3000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.

बँक – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 3000 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Central Bank of India Recruitment 2024)
Graduate degree in any discipline from a recognized University or any equivalent qualifications recognized as such by the Central Government.
मिळणारे वेतन – Rs. 15,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर (Central Bank of India Recruitment 2024) सादर करावा; उशिरा आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CCIL Recruitment 2024 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची संधी; 1,60,000 पर्यंत मिळेल पगार

CCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत (CCIL Recruitment 2024) कंपनी सचिव पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या पदावर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.

संस्था – कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई
भरले जाणारे पद – कंपनी सचिव
पद संख्या – 01 पद (CCIL Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deputy General Manager (HRD), The Cotton Corporation of India Ltd., 5th Floor, Kapas Bhavan, Plot No.3 A, Sector-10, C.B.D Belapur, Navi-Mumbai-400 614 (M.S).

आवश्यक शैक्षणिक पात्रता – कायद्यातील पदवी/किंवा एमबीए पात्रता हा एक अतिरिक्त फायदा असेल.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 35 वर्षापर्यंत
मिळणारे वेतन – 50,000/- ते 1,60,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (CCIL Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.cotcorp.org.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदासाठी उद्या होणार मुलाखत; जे.जे. रुग्णालय अंतर्गत भरती सुरु

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Job Notification) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई येथील नामांकित सर जे.जे.समूह रुग्णालयाअंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – GOVT. MEDICAL COLLEGE & SIR J. J. GROUP OF HOSPITALS, MUMBAI
भरले जाणारे पद – डाटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या – 05 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कोणत्याही शाखेतील पदवी
2. MS-CIT (Job Notification)
3. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 फेब्रुवारी 2024 रोजी 38 वर्षांपर्यंत
मिळणारे वेतन – 10,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 23 फेब्रुवारी 2024
मुलाखतीची वेळ – 10:00 AM ते 05:00 PM
मुलाखतीचा पत्ता – महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालय मुंबई-400008

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.webmaxtechnologies.in/ggmcjjh/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2024 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ‘या’ शहरात विविध पदांच्या 142 जागांसाठी भरती

NHM Recruitment 2024 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (National Health Mission, Nagpur)
पद संख्या – 142 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैद्यकीय अधिकारी – 48 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – MBBS/BAMS
2. स्टाफ नर्स – 45 पदे (NHM Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शासन मान्यताप्राप्त संस्था नोंदणीपासून 3 आणि 1½ वर्षांचा जनरल नर्सिंग कोर्स आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा डिप्लोमा, B.Sc Nursing
3. MPW पुरुष – 49 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्ररिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत
2. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
परीक्षा फी –
150/- रुपये (NHM Recruitment 2024)
SC/ST – 100/- रुपये
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये दरमहा
2. स्टाफ नर्स – 20,000/- रुपये दरमहा
3. MPW पुरुष – 18,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nagpurzp.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; पदवीधर करु शकतात अर्ज

BMC Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन पदावर (BMC Recruitment 2024) भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मानव संसाधन समन्वयक (Human Resources Coordinator) पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
भरले जाणारे पद – मानव संसाधन समन्वयक (Human Resources Coordinator)
पद संख्या – 38 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment 2024)
1. उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात पास असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
1. 18 वर्षे ते 38 वर्षे
2. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी 1000/- रुपये
2. मागासवर्गीय – 900/- रुपये (BMC Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Tips : UPSCची मुलाखत देताना ‘या’ टिप्स ठरतील महत्वाच्या

Career Tips (16)

करिअरनामा ऑनलाईन । पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत (Career Tips) अशा तीन टप्प्यांमध्ये UPSC परीक्षा घेतली जाते. हे तीन टप्पे यशस्वीपणे पार करणारा उमेदवारच IAS, IPS किंवा IRS, IFS होऊ शकतो. या तीन टप्प्यांपैकी मुलाखत फेरी ही सर्वात कठीण फेरी आहे. या फेरीवर कोणत्याही उमेदवाराचे भविष्य अवलंबून असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आयएएस होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला मुलाखतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला UPSC मुलाखत क्रॅक करण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्याचे पालन करून तुम्ही तुमचे IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

1. अर्ज काळजीपूर्वक भरा
तुम्ही तुमचा अर्ज अतिशय काळजीपूर्वक भरा. मुलाखतीच्या फेरीसाठी हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि तुमची संपूर्ण मुलाखत त्यावर आधारित असेल. वास्तविक, मुलाखतीत, पॅनेलद्वारे तपशीलवार अर्जामध्ये तुम्ही भरलेल्या माहितीशी संबंधित प्रश्नच विचारले जातात. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचं आहे.

2. कागदपत्रे नीट तपासा (Career Tips)
मुलाखतीच्या तारखेच्या फक्त एक किंवा दोन दिवस आधी, तुमची सर्व कागदपत्रे नीट तपासा. मुलाखतीपूर्वी तुमचे कोणतेही दस्तऐवज चुकले असल्यास, तुम्ही ते री-चेकिंग दरम्यान काळजीपूर्वक जतन करा जेणेकरुन मुलाखतीदरम्यान तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. याशिवाय उमेदवारांनी मुलाखतीस जाताना त्यांची मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

3. पुरेशी झोप घ्या
मुलाखतीपूर्वी स्वत:वर जास्त दबाव टाकू नका, अन्यथा त्याचा (Career Tips) परिणाम मुलाखतीदरम्यान तुमच्या व्यक्तिमत्त्वावर दिसून येईल. त्यामुळे मुलाखतीला जाण्यापूर्वी रात्री पुरेशी झोप घ्या.

4. पोषाखाची विशेष काळजी घ्या
फक्त औपचारिक पोषाख घालूनच मुलाखतीला जा. पुरुष उमेदवारांना सांगायचे झाल्यास त्यांनी हलक्या रंगाचे शर्ट आणि गडद रंगाची पॅन्ट घालावी. महिला उमेदवारांनी साधा सलवार-सूट किंवा साडी परिधान करावी. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व भावी अधिकाऱ्यासारखे दिसेल.

5. खोटे उत्तर देणे टाळा
UPSC (UPSC) मुलाखती दरम्यान, उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि निर्णयक्षमतेची चाचणी घेतली जाते. त्यामुळे मुलाखतीदरम्यान खोटे उत्तर देणे टाळा. जर तुम्हाला (Career Tips) कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर तुम्ही थेट पॅनेलला तसं सांगू शकता. त्याचबरोबर चुकीचे उत्तर दिल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : UPSC क्रॅक करुन मनोजनं ठोकला षटकार; उत्कृष्ठ रणजी क्रिकेटपटू असा बनला IAS

IAS Success Story of IAS Manoj Maharia

करिअरनामा ऑनलाईन । मनोज महारिया हा राजस्थानमधील कुदान (IAS Success Story) गावचा रहिवासी आहे. त्याने संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत संपूर्ण भारतातून 628 वा क्रमांक मिळवून IAS पद मिळवलं आणि संपूर्ण गावाचं नाव उंचावलं आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या पश्चात कुटुंबाची काळजी घेत मनोजने हे यश मिळवले आहे. मनोज हा उत्कृष्ठ रणजी क्रिकेटपटू राहिला आहे. मनोजने आपल्या यशाचा प्रवास कसा केला आणि आपले मिशन कसे पूर्ण केले ते जाणून घेऊया…

वडिलांच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी पेलली
मनोजचे वडील राजेंद्र महरिया यांचे अचानक निधन झाले. 3 भावंडांमध्ये सर्वात मोठा असल्याने मनोजने वडिलांच्या पश्चात कुटुंबाची अगदी जबाबदरीने काळजी घेतली. UPSC चा निकाल आल्यावर (IAS Success Story) त्याची आई तारादेवी भावूक झाल्या. आपल्या दिवंगत पतीचे स्वप्न मुलाने पूर्ण केल्याने त्यांना कृतार्थ वाटले. या आनंदी बातमीमुळे घरातही जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. ही आनंदाची बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी मनोज आणि त्याच्या कुटुंबीयांचे जोरदार स्वागत केले.

….यामुळे क्रिकेट खेळणे सोडले (IAS Success Story)
मनोजने (IAS Manoj Maharia) 10 वीपर्यंतचे शिक्षण गावातील शाळेतूनच घेतले. यानंतर त्याने सीकरमधून बारावी पूर्ण केली. यानंतर त्याचा क्रिकेटकडे ओढा वाढला आणि त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हा उत्कृष्ठ रणजी क्रिकेटपटू राहिला आहे. मनोजने क्रिकेट सोडण्यामागचे कारण म्हणजे 2018 मध्ये त्याला दुखापत झाली होती त्यामुळे तो पुढे खेळू शकत नव्हता. यानंतर तो पुन्हा अभ्यासाकडे वळला आणि अनेक सरकारी नोकरीच्या परीक्षा पास झाला. पण त्याला यामधून समाधान मिळाले नाही; म्हणून त्याने अधिक चांगले करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला.

लॉकडाऊन काळात सुरु केली UPSC ची तयारी
IAS अधिकारी होणं हे ध्येय मनोजला साध्य करायचं होतं. यासाठी कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये त्याने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी सुरू केली. मनोजच्या म्हणण्यानुसार, त्याला कोचिंग क्लासमध्ये शिकणे सोयीचे नव्हते, म्हणून त्याने स्वतः अभ्यास केला आणि परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात यूपीएससी (UPSC) मध्ये चांगली रँक मिळवली.

अभ्यास करताना ही काळजी घ्या…
मनोज सांगतो की, त्याला कोचिंगमध्ये अभ्यास करताना आराम मिळत नव्हता, म्हणून त्याने घरीच स्वतः अभ्यास केला. त्याने चांगली रँक घेऊन UPSC पास केली आणि त्याचे IAS (IAS) होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. UPSC च्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना तो सांगतो; अभ्यास करत असताना तुम्हाला कुठूनही मिळत असलेल्या माहितीचा वापर करू नका. तुमचे स्त्रोत मर्यादित ठेवा जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. तयारी दरम्यान, नातेवाईक आणि विविध सोहळ्यांना हजर राहणं सोडावं लागतं. असं केल्याशिवाय तुम्हाला परिक्षेत अपेक्षित निकाल मिळवता येत नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shikshak Bharti 2024 : शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरु; उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार

Shikshak Bharti 2024 (5)

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या (Shikshak Bharti 2024) माध्यमातून राज्यभर शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या पदभरती प्रक्रियेबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे; अशी माहिती शालेय शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.

शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार उमेदवारांच्या अध्यापनाच्या विषयांचे गट, माध्यम, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त केलेले गुण, उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्या त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध असलेले आरक्षण, विषय इत्यादी बाबींचे (Shikshak Bharti 2024) संगणकीय प्रणालीतून परीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल; असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

फसवणूक झाल्यास पोलिसांकडे जा (Shikshak Bharti 2024)
शिक्षक भरतीबाबत उमेदवारांची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या व्यक्तींबाबत पोलिसांकडे किंवा शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे यापूर्वी करण्यात आले आहे. पवित्र पोर्टल (Pavitra Portal) मार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पद भरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार केली जात आहे. या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून 14 फेब्रुवारीपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहेत. याच उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : अशोक स्तंभ छापण्यापूर्वी भारतीय चलनावर कोणाचे चित्र छापले जायचे? सामान्य ज्ञान वाढवणारे प्रश्न

GK Updates 21 Feb

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न – भारतीय नाणी आणि नोटांवर अशोक स्तंभ पहिल्यांदा कधी छापण्यात आला?
उत्तर – अशोक स्तंभ प्रथमच 1949 मध्ये भारतीय नाणी आणि नोटांवर छापण्यात आला.
प्रश्न 2 – अशोक स्तंभ छापण्यापूर्वी भारतीय (GK Updates) चलनावर कोणाचे चित्र छापले होते?
उत्तर – अशोक स्तंभ छापण्यापूर्वी भारतीय नाण्यांवर किंग जॉर्जचे चित्र छापले जायचे.

प्रश्न 3 – जगातील सर्वात लांब ट्रेन कोणती आहे? (GK Updates)
उत्तर – जगातील सर्वात लांब ट्रेनचे शीर्षक ‘The Australian BHP Iron Ore’ च्या नावावर आहे. या ट्रेनमध्ये 682 डबे आहेत. ही ट्रेन खेचण्यासाठी 8 इंजिनांची आवश्यकता होती आणि या ट्रेनची एकूण लांबी 7.3 किलोमीटर आहे.
प्रश्न 4 – भारताच्या ईशान्य भागात असलेल्या नागालँड राज्याची अधिकृत भाषा कोणती आहे?
उत्तर – नागालँड राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे.
प्रश्न 5 – (GK Updates) राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते?
उत्तर – राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्षे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mazagon Dock Recruitment 2024 : माझगाव डॉकमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; इंजिनिअर, डिग्रीधारक करु शकतात अर्ज

Mazagon Dock Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत (Mazagon Dock Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

संस्था – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड
भरले जाणारे पद – अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
सुश्री वीणा कालरा, अवर सचिव. भारत सरकार, संरक्षण मंत्रालय. संरक्षण उत्पादन विभाग, कक्ष क्रमांक 206 ‘बी’ विंग, सेना भवन, नवी दिल्ली-110011
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024
वय मर्यादा – 45 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mazagon Dock Recruitment 2024)

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकThe applicant should be Engineering Graduate/Chartered Accountant/Cost Accountant/Post Graduate ORGraduate with MBA/PGDIM from a leading Institute. Candidates with P.G. degree in Naval/Electrical/Electronics/Mechanical/Marine engineering will have preference

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (Mazagon Dock Recruitment 2024) तारीख 20 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com