करिअरनामा । केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात, मात्र ही सुविधा नागरी सेवा परीक्षांच्या उमेदवारांना मिळत नव्हती.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने पहिल्यांदाच हा नियम आणला आहे. आता नागरी सेवा परीक्षांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. इच्छुक उमेदवार 18 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतात.
अर्ज मागे घेताना उमेदवारांना नोंदणीच्या वेळी दिलेला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडीची आवश्यकतेची गरज आहे. उमेदवारांनी केलेला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आणि ईमेलवर आयोग दोन वेगवेगळे ओटीपी पाठवेल. ते दोन्ही ओटीपी दिल्यानंतरच अर्ज मागे घेण्याची विनंती स्वीकारली जाईल.
अर्ज मागे घेता येणार असला तरी उमेदवारांना एकदा भरलेले परीक्षा फी मात्र परत मिळणार नाही.
नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”