करिअरनामा ऑनलाईन । कोविड-19 चा प्रादुर्भाव झाल्यापासून कंपन्यांकडून (Online Interview Tips) ऑनलाइन मुलाखती घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. HR अधिकारी किंवा नियोक्त्यासमोर प्रेझेंटेबल दिसण्यासाठी ऑनलाइन मुलाखतीदरम्यान उमेदवारांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ऑनलाइन मुलाखतीसाठी पारंपारिक मुलाखतीपेक्षा काही विशेष तयारीही आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखत ही उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरु शकते. यामुळे मुलाखतीपुर्वी तयारी करणे आवश्यक असते. ऑनलाइन मुलाखतीची तयारी कशी करायची, मुलाखत देताना कोणती काळजी घ्यायची; याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
1. मुलाखत देण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची खात्री करा (Online Interview Tips)
ऑनलाइन मुलाखत देण्यापूर्वी मुलाखतकाराकडून ऑनलाइन मुलाखत ऑडिओ-व्हिडिओ की चॅटद्वारे होणार आहे? याची संपूर्ण माहिती घ्या. ऑनलाइन मुलाखतीचे स्वरूप विचारा. तसेच प्रश्न पूर्व-रेकॉर्ड केले आहेत का ते तपासा. मुलाखतीदरम्यान तांत्रिक त्रास टाळण्यासाठी (Online Interview Tips) आधीच बॅकअप तयार ठेवा.
2. कंपनीविषयी माहिती गोळा करा
तुम्ही ज्या कंपनीत ऑनलाइन मुलाखत देणार आहात त्या कंपनीच्या कार्याविषयी माहिती गोळा करा. यासाठी कंपनीच्या वेबसाइटची मदत घ्या. तेथे काम करणाऱ्या (Online Interview Tips) कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळवा आणि मीडिया कव्हरेज पाहा. अशा प्रकारे तुम्हाला कंपनीबद्दल प्राथमिक माहिती मिळू शकते. कंपनी किंवा संस्थेचा वार्षिक अहवाल पाहा, तिथे कंपनीच्या जोखीमेबद्दल माहिती कळेल.
3. मुलाखतीसाठी योग्य जागा निवडा
ऑनलाइन मुलाखत देताना प्रकाश योजना, कॅमेरा अँगल आणि तुम्ही बसणार आहात त्या जागेची मागील पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे योग्य जागा निवडा. व्यावसायिक (Online Interview Tips) दिसणारा पोशाख परिधान करा. जेणेकरून मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला तुमच्यातला आत्मविश्वास दिसेल.
4. उपकरणे तपासा
ऑनलाइन मुलाखतीदरम्यान तांत्रिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे तांत्रिक उपकरणे नीट तपासा. Wi Fi किंवा मोबाइल नेटवर्क तपासून घ्या. लॅपटॉप (Online Interview Tips) आणि मोबाईल फोन पूर्णपणे चार्ज करा. मुलाखत सुरु असताना तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा.
5. संभाव्य प्रश्नांसाठी आधीच तयार राहा
ऑनलाइन मुलाखतीसाठी काही प्रश्नांची उत्तरे आधीच तयार करा. तुम्हाला किती अनुभव आहे? आधीची नोकरी सोडण्याचे कारण काय? तुम्हाला किती पगाराची (Online Interview Tips) अपेक्षा आहे? ऑनलाइन मुलाखतीदरम्यान आवश्यक असेल तिथे ‘होय’ आणि ‘ठीक आहे’; असं म्हणायला विसरू नका.
6. नेहमी प्रेझेंटेबल राहा
ऑनलाइन मुलाखती दरम्यान चेहरा हसरा ठेवा. पारंपारिक मुलाखतीप्रमाणेच आत्मविश्वासाने मुलाखत द्या. खुर्चीच्या काठावर बसा जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तुमचे शरीर सरळ दिसेल.
7. वेब कॅमेऱ्याकडे पाहा
मुलाखत देताना स्क्रीनवरील व्यक्तीकडे पाहण्याऐवजी, वेब (Online Interview Tips) कॅमेऱ्याकडे पाहा. प्रशांची उत्तरे देत असताना तुम्ही जर आजूबाजूला बघितले तर तुम्ही मुलाखत गांभीर्याने घेत नाही असे मुलाखत घेणाऱ्याला वाटू शकते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com