करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या (One State One Uniform) मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना लागू करण्यात येणार आहे; यासाठीचा आदेश देखील सरकारकडून जारी करण्यात आला आहे. दरवर्षी 15 जूनपासून शाळा सुरू होत असतात. त्यामुळे शाळा सुरू होण्याआधी सगळेच मुले नवीन गणवेश, दप्तर त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य विकत घेत असतात. परंतु जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी यावर्षी नवीन गणवेश विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
महिला बचत गटामार्फत गणवेश उपलब्ध होणार
पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला- मुलींना मोफत (One State One Uniform) गणवेश योजना दिली जाते. आता शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये महिला बचत गटामार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता हे गणवेश वेगवेगळ्या इयत्तांसाठी मुलांसाठी वेगवेगळे असणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस घालायचा हे देखील ठरवण्यात आलेले आहे. आता याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया
इयत्ता 1 ली ते 7 वी मुले –
1. नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट
2. स्काऊट आणि गाईड – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट
इयत्ता 8 वी मुले (One State One Uniform) –
1. नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची फुल पँट
2. स्काऊट गाईड – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि काळ्या निळ्या रंगाची फुल पँट
इयत्ता पहिली ते चौथी मुली –
1. नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक
2. स्काऊट गाईड गणवेश – मंगळवार, गुरुवार, शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हर ऑल फ्रॉक
इयत्ता पाचवी मुली –
1. नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाश रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट
2. स्काऊट गाईड गणवेश – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्राक
इयत्ता 6 वी ते 8 वी मुली आणि 1 ली ते 8वी मुली (उर्दू माध्यम)
नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी निळ्या रंगाची कमिशन या गडद रंगाचा सलवार आणि गडद निळ्या रंगाची ओढणी
स्काऊट गाईड गणवेश – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
गडद आकाशी रंगाची कमीज गळ्यात निळ्या रंगाची सलवार गडद निळ्या रंगाची ओढणी
शासनाने दिलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी या दिवशी गणवेश धारण करायचा आहे. आणि स्काऊट गाईड या विषयाचा गणवेश (One State One Uniform) मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी परिधान करायचा आहे. या दिवशी स्काऊट गाईड विषयाच्या तासिका देखील घेण्यात येणार आहे. राज्यातील 15 जून 2024 पासून सर्व शाळा सुरू होत आहे. त्यामुळे महिला बचत गटामार्फत गणवेशाच्या शिलाईचे काम वेगाने सुरू आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com