Old Pension Scheme : राज्यातील 17 लाख कर्मचारी ‘या’ दिवशी जाणार बेमुदत संपावर; जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा पुन्हा भडकला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात एक (Old Pension Scheme) मोठी बातमी आहे. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी; या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एकूण 17 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस योजना लागू झाली आहे.

ही योजना शेअर बाजारावर आधारित असल्याने या योजनेत पेन्शनची आणि कौटुंबिक पेन्शनची हमी नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप असून ही योजना रद्दबातल करून पुन्हा एकदा नव्याने जुनी पेन्शन योजना सरसकट राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना बहाल केली पाहिजे; अशी मागणी कर्मचारी करत आहेत.

याच मागणीसाठी आता राज्यातील 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 14 मार्च 2023 पासून बेमुदत राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. राज्य (Old Pension Scheme) सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांच्या नाशिक येथील बैठकीत ओपीएस योजना लागू करण्यासाठी राज्यव्यापी संपाबाबत हा निर्णय झाला आहे.

याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रशांत जामोद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल, प्रदेश झारखंड या पाच राज्यात ओपीएस (Old Pension Scheme) म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे. मग (Old Pension Scheme) महाराष्ट्र या राज्यांच्या तुलनेत अधिक सधन असूनही कर्मचाऱ्यांना ओपीएस योजना बहाल का करू शकत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

निश्चितच, हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरू झालेलं हे ओपीएस योजनेचे वादंग अजून मिटलेलं नसून या राज्यव्यापी संपामुळे सरकार अडचणीत सापडू शकते असं देखील (Old Pension Scheme) काही जाणकार लोक सांगत आहेत. दरम्यान, आता राज्य कर्मचारी आक्रमक भूमिकेत असून ओपीएस योजनेवर आता काय तोडगा निघतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com