Nursery Admission Age : नर्सरी प्रवेशासाठी आता बालकाचे ‘एवढं’ वय पूर्ण असणं आवश्यक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पालकांसाठी एक महत्वाची (Nursery Admission Age) अपडेट आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ तीन वर्षे वयाच्या मुलांनाच नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. शाळा प्रवेशाचे नियम NEP-2020 च्या नियमांनुसार असावेत, यासाठी धोरण तयार केले जात आहे. NEPच्या नियमानुसार इयत्ता पहिलीत प्रवेश करताना मुलाचे वय सहा वर्षे असावे.

नर्सरी प्रवेशासाठी ३ वर्षाची अट असतानाही दोन-अडीच वर्षांच्या अनेक मुलांना प्रवेश दिले जातात. परंतु, आता तसे करता येणार नाही. मूल पहिलीत जाताना त्याचे वय सहा वर्षे पूर्ण असावे लागणार आहे. या नव्या धोरणानुसार विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील.

शाळेच्या वेळा बदलणार (Nursery Admission Age)
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी चिमुकल्यांच्या (बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या) ज्या शाळा सकाळी सात- साडेसात वाजता भरतात, त्यांच्या वेळा बदलतील आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल; असे यापूर्वी स्पष्ट केले आहे. तत्कालीन व विद्यमान राज्यपालांनीही त्यासंदर्भातील पत्र शिक्षण खात्याला दिले आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच शाळांच्या वेळा (खासगी व शासकीय) सकाळी 9नंतर असणार आहेत; अशी माहिती राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

‘एक राज्य एक गणवेश’
यापुढे राज्यातील खासगी अनुदानित व शासकीय शाळांमधील सर्वच मुलांना एकच गणवेश असणार आहे. नवीन गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरुप असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट (Nursery Admission Age) किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची, अशा स्वरूपात गणवेशाची रचना असणार आहे. याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासंर्दभातील घोषणा यापूर्वीच केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com