NRCG Pune recruitment 2024 : पुण्यात ‘या’ उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी; जाणून घ्या सविस्तर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यामध्ये नोकरी करण्याची प्रत्येकाची (NRCG Pune recruitment 2024) इच्छा असते; अशा उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. पुण्यामध्ये नोकरी शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलो आहोत. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे सध्या SRF आणि YP ll या रिक्त पदासाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2024 आहे.

संस्था – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे
भरली जाणारी पदे –
1. SRF – 2 पदे
2. YPII – 2 पदे
पद संख्या – 4 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मे 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक आयसीएआर नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स टीव्ही क्र. 3 मांजरी फार्म पोस्ट सोलापूर रोड, पुणे, 412307

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NRCG Pune recruitment 2024)
1. SRF –
SRF या पदासाठी अर्ज करणारे उमेदवाराकडे बायोइन्फॉर्मेशन बायोटेक्नॉलॉजी अन्विक जीवशास्त्र या क्षेत्रात बॅचलर आणि एमएससी पदवी असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षाचा अनुभवासह कृषी हवामान क्षेत्रफलक पदवी सूक्ष्मजीवशास्त्र यामध्ये एमएससी पदवी गरजेची.
2. YF II –
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कृषी अभियांत्रिकी बी.टेक किंवा कृषी हवामान शास्त्र, मृदा विज्ञान, वनस्पती शरीरिक क्रिया विज्ञान यामध्ये एमएससी गरजेचे आहे.

मिळणारे वेतन –
1. SRF – या पदावर उमेदवाराची निवड झाल्यावर उमेदवारांना दर महिन्याला 31 हजार ते 42 हजार रुपये एवढे वेतन मिळेल.
2. YP II – या पदावर निवड झाल्यावर उमेदवारांना 42 हजार रुपये एवढे वेतन देण्यात येईल.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (NRCG Pune recruitment 2024)
2. उमेदवारांनी आपला अर्ज ‘संचालक आयसीएआर नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स टीव्ही क्र. 3 मांजरी फार्म पोस्ट सोलापूर रोड, पुणे 412307 या पत्त्यावर पाठवायचा आहे.
3. अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर सूचना (PDF) वाचा.

काही महत्वाच्या लिंक्स – (NRCG Pune recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nrcgrapes.icar.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com