करिअरनामा ऑनलाईन । प्रख्यात कला दिग्दर्शक (Nitin Desai) नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनीच उभारलेल्या एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येने मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी हादरली आहे. मराठी आणि बॉलिवूडमधील विविध चित्रपटांचे जिवंत सेट्स उभारणाऱ्या नितीन देसाईंचे शिक्षण माहिती करुन घेण्यासाठी पुढे वाचा…
दापोलीच्या निसर्गाने कलाकार घडवला
नितीन देसाई यांचा जन्म 9 ऑगस्ट 1965 रोजी दापोली येथे झाला. दापोलीतील निसर्गरम्य वातावरण नितीन देसाई यांच्यातील कलाकारांना घडवण्यास कारणीभूत ठरलं. लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत ते निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतेही होते. अनेक सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. अनेक लोकप्रिय सिनेमांच्या निर्मितीत त्यांचं मोलाचं योगदान होतं.
असा आहे शैक्षणिक प्रवास (Nitin Desai)
जन्म दापोलीमध्ये झालेल्या नितीन देसाई यांचं शिक्षण मात्र मुंबईत झालं आहे. मुलुंडच्या वामनराव मुरंजन हायस्कुलच्या मराठी माध्यमाच्या शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे त्यांनी फोटोग्राफीमधील शिक्षण घेण्यासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि एल. एस. रहेजा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी जे.जे कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. कलादिग्दर्शक नितीश रॉय यांच्याकडे त्यांनी सुरुवातीला कलादिग्दर्शनाचे धडेही गिरवले आहेत.
त्यांनी कालांतराने 2D आणि 3D world फॉरमॅट फोटोग्राफी सोबत कलादिग्दर्शनाकडे (Arts Direction) आपला मोर्चा वळवला.
या सुपरहिट सिनेमांचं केलं कला दिग्दर्शन (Art Direction)
‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. जोधा अकबर, अजिंठा, हरिश्चंद्राची फॅक्टरी, हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास आणि बालगंधर्व सारख्या मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांचे जिवंत सेट्स असो, मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाचा लक्षवेधून घेणारा देखावा असो किंवा दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे भव्य चित्ररथ असो… या आणि यांसारख्या (Nitin Desai) अनेक कलाकृती आणि जगातील विविध ठिकाणे आपल्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभी करून त्यात जिवंतपणा आणणारा कलाकार म्हणजे नितीन देसाई.
नितीन देसाईंनी कलादिग्दर्शनात यश मिळू लागल्यानंतर मालिका आणि सिनेमांच्या निर्मितीकडे मोर्चा वळवला. ‘राजा शिवछत्रपती’, ‘बाजीराव मस्तानी’,’मराठी पाऊल पडते पुढे’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांची आणि ‘बालगंधर्व’सारख्या सिनेमाची निर्मिती त्यांनी केली आहे. पुढे ‘अजिंठा’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं.
52 एकरात एन. डी. स्टुडिओची स्थापना (ND Studio)
विविध कलाकृतींच्या माध्यमातून निर्माता, दिग्दर्शक, कलादिग्दर्शक, अभिनेता अशा विविध भूमिकांमधून नितीन देसाई यांनी कायम प्रेक्षकांची मने जिंकली. तर, विविध चित्रपटांच्या (Nitin Desai) सेट्स चा अनुभव प्रेक्षकांनाही घेता यावा म्हणून त्यांनी कर्जतमध्ये तब्बल 52 एकर परिसरात भव्य एन डी स्टुडिओचीही स्थापना केली. चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार, तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कारही नितीन देसाई यांना मिळाला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com