Niti Aayog Internship : मिळवा सरकार दरबारी कामाचा अनुभव; देशाच्या ‘नीति’ आयोगांतर्गत इंटर्नशिप करण्याची मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तरुणांसाठी देशाच्या नीती आयोगात (Niti Aayog Internship) काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. National Institution for Transforming India ने ही संधी निर्माण केली आहे. NITI आयोगाने इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार आयोगाची अधिकृत वेबसाइट workforindia.niti.gov.in वर जाऊन या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासंदर्भात सर्व माहिती घेण्यासाठी पुढे वाचा…

इंटर्नशिपसाठी आवश्यक पात्रता – (Niti Aayog Internship)
1. ही इंटर्नशिप मिळवण्यासाठी उमेदवारांनी भारतातील किंवा परदेशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठात किंवा महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून नोंदणी केली असणे आवश्यक आहे.
2. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी, त्यांनी बारावीच्या परीक्षेत किमान ८५ टक्के गुण मिळवले असणे आवश्यक आहे.
याशिवाय, त्यांनी पदवीच्या चौथ्या सत्राची किंवा द्वितीय वर्षाची अंतिम परीक्षा पूर्ण केलेली असावी.
3. केवळ PG करणारे विद्यार्थीच अर्ज करण्यास पात्र ठरतील.
4. ज्या उमेदवारांना त्यांच्या पहिल्या वर्षाच्या किंवा दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पूर्ण करायच्या आहेत. या उमेदवारांनी त्यांच्या बॅचलर पदवीमध्ये किमान ७० टक्के गुण मिळवले असावेत.
5. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बॅचलर पदवीमध्ये किमान ७० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

या तारखेपर्यंत अर्ज करता येईल –
इच्छुक उमेदवारांना NITI आयोगामध्ये इंटर्नशिपसाठी १० मे पर्यंत अर्ज करता येईल. उमेदवारांनी ताबडतोब नोंदणी करावी; असं आवाहन करण्यात आलं आहे.

इंटर्नशिप 2024 च्या भरतीसाठी ठेवण्यात आलेले निकष –
1. इंटर्नशिपचा कालावधी किमान ६ आठवडे ते कमाल ६ महिने असेल.
2. इंटर्नशिपनंतर अनुभव प्रमाणपत्र (Niti Aayog Internship) मिळविण्यासाठी प्रशिक्षणार्थींना किमान ७५ टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे.
3. उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास इंटर्नशिपसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com