NIO Recruitment 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये सरकारी नोकरीची संधी; ‘ही’ पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा (NIO Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (अ‍ॅलोपॅथिक सिस्टीम), प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असिस्टंट पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आणि 08 डिसेंबर 2023 (पदानुसार) आहे.

संस्था – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा
भरले जाणारे पद – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (अ‍ॅलोपॅथिक सिस्टीम), प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असिस्टंट
पद संख्या – 09 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2023 आणि 08 डिसेंबर 2023 (पदानुसार)

निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – CSIR-NIO, Dona Paula, Goa
भरतीचा तपशील – (NIO Recruitment 2023)

पद पद संख्या 
प्रोजेक्ट असोसिएट-II 04
प्रोजेक्ट असोसिएट-I 03
प्रोजेक्ट असिस्टंट 02


असा करा अर्ज –

1. वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जाचा फॉर्म (A-4 आकाराच्या कागदावर) फक्त निळ्या किंवा काळ्या शाईचा वापर करून इंग्रजी कॅपिटल (ब्लॉक) अक्षरांमध्ये भरायचा आहे.
3. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर (NIO Recruitment 2023) सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
6. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
7. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अशी होणार निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे.
4. मुलाखत 08 डिसेंबर 2023 या तारखेला घेण्यात येणार आहे .
5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nio.res.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com