NHPC Recruitment 2024 : इंजिनियर्सना NHPC मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; 269 पदे भरली जाणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC Recruitment 2024) लिमिटेडच्या अंतर्गत भरती राबवली जात आहे. या भरती अंतर्गत ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने http://www.nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.

ही एक सरकारी नोकर भरती आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत ही भरती सुरु आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीमध्ये सहभागी व्हायचे आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, रिक्त पदे आणि पद संख्या, निवड प्रक्रिया, अर्ज फी याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.

रिक्त पदे – ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स
पद संख्या – 269 पदे (NHPC Recruitment 2024)
अर्ज फी – (NHPC Recruitment 2024)
1. यूआर/ ईडब्ल्यूएस/ ओबीसी (NCL) श्रेणीतील उमेदवारांसाठी – ६०० रुपये (नॉन-रिफंडेबल)
2. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/माजी सैनिक/महिला श्रेणीतील उमेदवारांना नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रिया – उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये GATE २०२३ च्या पेपरमधील १०० पैकी गुण, गट चर्चा, वैयक्तिक मुलाखत यांचा विचार केला जाईल.

अर्ज कसा करायचा –
1. प्रथम नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या http://www.nhpcindia.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. नंतर होम पेजवर करिअर टॅबवर क्लिक करा.
3. एनएचपीसी लिमिटेड ॲण्ड इट्स जॉईंट व्हेन्टचर (NHPC Limited and its Joint Venture)साठी GATE २०२३ स्कोअरद्वारे ‘ट्रेनी इंजिनीयर / ट्रेनी ऑफिसर्स’ पदासाठी भरतीची अधिसूचना यावर क्लिक करा.
4. त्यानंतर उमेदवारांनी नोंदणी करावी आणि अर्जासह पुढे जावे.
5. नंतर उमेदवारांनी फॉर्म भरावा.
6. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
7. अर्ज Submit करा. (NHPC Recruitment 2024)
8. पुढील संदर्भासाठी या फॉर्मची एक प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com