NHM Recruitment 2024 : नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा अंतर्गत (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. ज्या उमेदवारांना गोव्यात नोकरी करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. इथे भरली जाणारी पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया.

या भरतीच्या माध्यमातून राज्य कीटकशास्त्रज्ञ, दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञ, दंतचिकित्सा सहाय्यक, आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, महिला आरोग्य अभ्यागत, सोनोलॉजिस्ट, जिल्हा माहिती व्यवस्थापक, सल्लागार, समुपदेशक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोवा
भरली जाणारी पदे – राज्य कीटकशास्त्रज्ञ, दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञ, दंतचिकित्सा सहाय्यक, आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, महिला आरोग्य अभ्यागत, सोनोलॉजिस्ट, जिल्हा माहिती व्यवस्थापक, सल्लागार, समुपदेशक, फार्मासिस्ट
पद संख्या – 18 पदे (NHM Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे

भरतीचा तपशील – (NHM Recruitment 2024)

पदपद संख्या 
राज्य कीटकशास्त्रज्ञ02
दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञ01
दंतचिकित्सा सहाय्यक01
आरोग्य अधिकारी01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
महिला आरोग्य अभ्यागत03
सोनोलॉजिस्ट01
जिल्हा माहिती व्यवस्थापक02
सल्लागार01
समुपदेशक02
फार्मासिस्ट02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
राज्य कीटकशास्त्रज्ञएम.एस्सी. (प्राणीशास्त्र) ज्यामध्ये एक विषय हा कीटकशास्त्र असणे आवश्यक आहे आणि एमएस ऑफिस सह संगणकाचे ज्ञान असावे.
दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञXII विज्ञान उत्तीर्ण असावा.दंतचिकित्सा तंत्रज्ञ हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेला असावा.
दंतचिकित्सा सहाय्यकइ. X वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.इंग्रजी लिहू आणि वाचू शकणारा असावा.संगणक साक्षर असावा.
आरोग्य अधिकारीबीडीएस आणि सोबत गोवा दंतचिकित्सा परिषदेची नोंदणी असावी.कोंकणी भाषेचे ज्ञान असावे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञमट्रिक उत्तीर्ण असावा.गोवा सरकारकडून मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेकडून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मधील पदविका (डीएमएलटी) यशस्वीरीत्या पूर्ण केलेली असावी.
महिला आरोग्य अभ्यागतनिवृत्त एलएचव्ही ज्यांचे वय ६४ वर्षापेक्षा अधिक नसावे किंवाएएनएम म्हणून किमान ५ वर्षे अनुभवासह सेवा दिलेली असावी
सोनोलॉजिस्टएमडी / डीएमआरडी (रेडीओलॉजी)इस्पितळात काम केल्याचा ५ वर्षांचा अनुभव असावा.
जिल्हा माहिती व्यवस्थापकबी. एस्सी. (संगणक विज्ञान)। बीसीए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन
सल्लागारबीई (स्थापत्यशास्त्र/सिव्हील)बांधकाम, अंदाजपत्रक, बिलिंग आणि साईट सुपरव्हिजन मधील ३ वर्षांचा अनुभव असावा. (NHM Recruitment 2024)
समुपदेशकसामाजिक कार्ये (सोशल वर्क) / समाजशास्त्र/मानसशास्त्र मधील पदवीधर. उत्तीर्ण असावा.कॉम्प्युटर अॅप्लिकेशन मधील पदविका.
फार्मासिस्टबी. फार्म / डी.फार्मगोवा राज्य फार्मसी परिषदेकडे नोंदणी केलेली असावी.

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
राज्य कीटकशास्त्रज्ञरु. ४०,०००/-
दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञरु. ११,०००/
दंतचिकित्सा सहाय्यकरु. ८,०००/-
आरोग्य अधिकारीरु. २६,०००/
प्रयोगशाळा तंत्रज्ञरु. ११,०००/-
महिला आरोग्य अभ्यागतरु. १६,०००/-
सोनोलॉजिस्टरु. ८५,०००/-
जिल्हा माहिती व्यवस्थापकरु. १५,०००/-
सल्लागाररु. ४०,०००/-
समुपदेशकरु. ११,०००/-
फार्मासिस्टरु. ११,०००/-

असा करा अर्ज –
1. या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. या भरतीविषयी अधिक माहिती www.goa.gov.in या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
3. अर्ज खाली दिलेल्या लिंक वर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (NHM Recruitment 2024)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.goa.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com