NExT Exam : National Exit Test पुढच्या वर्षी होणार; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची घोषणा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी (NExT Exam) दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या NEET PG परीक्षेऐवजी NExT म्हणजेच National Exit Test परीक्षा घेतली जाणार आहे. NExT परीक्षेतील गुणांच्या आधारे MD, MS करिता प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय MBBS अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. त्याशिवाय ते भारतात Medical Practice करू शकणार नाहीत. यासोबतच, परदेशातून (NExT Exam) वैद्यकीय पदवी घेतलेल्या MBBS उमेदवारांनाही भारतात Medical Practice करण्यासाठी ही परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे.

नॅशनल मेडिकल कमिटीने अगोदर जाहीर केलेल्या निर्णयानुसार, नेक्स्टची परीक्षा 2019 मध्ये प्रवेश घेतलेल्या MBBSच्या विद्यार्थ्यांपासून सुरु करण्यात येणार होती. मात्र दि. 6 जुलै 2023 ला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. 2019 च्या MBBS साठी नॅशनल एक्झिट टेस्ट NExT घेता येणार नाही. त्यामुळे, ती परीक्षा पुढील बॅचसाठी म्हणजेच 2020 च्या MBBSच्या विद्यार्थ्यांपासून सुरु होणार आहे. म्हणजेच 2020 ची MBBS विद्यार्थ्यांची नेक्स्ट परीक्षा देणारी पहिली बॅच ठरणार आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), रायपूर येथील क्रिटिकल केअर युनिटची पायाभरणी केल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा (NExT Exam) किंवा त्यांच्यामध्ये तणाव निर्माण करणारा कोणताही निर्णय केंद्र आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 2019 च्या बॅचला NExT अंतर्गत न येता 2020 च्या बॅचपासून NExTची परीक्षा सुरु होणार आहे.

म्हणून घेतली जाते नेक्स्ट परीक्षा (NExT Exam)
NMCच्या मते नॅशनल एक्झिट टेस्ट ही सामान्य पात्रता परीक्षा असेल. MBBSसाठी, आधुनिक वैद्यकशास्त्राचा सराव करण्यासाठी परवानाधारक परीक्षा आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या गुणवत्तेवर आधारित प्रवेशासाठी ही परीक्षा आवश्यक असेल. त्याचवेळी इतर देशांमधून MBBS पदवी घेतलेल्या उमेदवारांना भारतात सराव करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com