New India Assurance Recruitment 2024 : न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनीमध्ये 300 पदांवर निघाली भरती; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी (New India Assurance Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद – सहाय्यक
पद संख्या – 300 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024
वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे
मिळणारे वेतन – Rs.37,000/- दरमहा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (New India Assurance Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यकGraduate from a recognized University / Equivalent. Knowledge of Regional Language of the State / UT for which the candidate is applying is essential.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. येथे दिलेल्या लिंक वरुन उमेदवार अर्ज करु शकतात.
3. अर्ज करण्यापूर्वी (New India Assurance Recruitment 2024) उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करायचा आहे. उशीरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
5. अर्ज प्रक्रिया 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.newindia.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com