करिअरनामा ऑनलाईन । ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’मार्फत (एनटीए) डिसेंबर 2022 च्या ‘नॅशनल (NET Exam) इलिजिबिलिटी टेस्ट’साठी (NET) अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, 17 जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्यान देशभरात ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे ‘एनटीए’मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
देशभरातील महाविद्यालयांमध्ये सहयोगी अधिव्याख्याता म्हणून रुजू होण्यास पात्र ठरण्यासाठी ‘नेट’ उत्तीर्ण बंधनकारक असते. वर्षभरात दोन वेळा ही परीक्षा घेतली जाते. डिसेंबर 2022 साठीची (NET Exam) परीक्षा ‘एनटीए’मार्फत नुकतीच जाहीर झाली असून 12 फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्यान देशभरात ही परीक्षा होणार आहे. यासाठी 29 डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज पक्रिया सुरू करण्यात आली आहे.
1717 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच 18 जानेवारीपर्यंत शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात (NET Exam) आली आहे. अर्जामध्ये काही बदल असल्यास विद्यार्थ्यांना 19 ते 20 जानेवारीदरम्यान दुरुस्ती करता येणार आहे.
परीक्षा केंद्रांची माहिती फेब्रुवारीत समजणार
देशभरातील कोणत्या शहरांमध्ये ‘नेट’ची परीक्षा होणार हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केले जाणार आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये हॉल तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हॉल तिकिटे उपलब्ध झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षेचे केंद्र, तारीख व शिफ्ट समजू शकेल. ‘नेट’बाबतची (NET Exam) सविस्तर माहिती ‘एनटीए’च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 83 विषयांसाठी कॉम्प्युटर बेसड् पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com