करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने NEET UG 2024 च्या (NEET UG Counselling 2024) पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. पण NEET UG पेपर लीकचा वाद अजूनही संपलेला नाही. एकीकडे CBI या प्रकरणाचा तपास करत आहे तर दुसरीकडे, 8 जुलै रोजी या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे; ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यावर्षी 13.16 लाख मुले वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत. जे NEET UG 2024 समुपदेशन सुरू होण्याची वाट पाहत आहेत. वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC), MBBS, BDS आणि BSc नर्सिंग जागांच्या वाटपासाठी जबाबदार असलेल्या प्राधिकरणाने 6 जुलै रोजी NEET UG समुपदेशन वेळापत्रक जाहीर करणे अपेक्षित आहे.
NEET UG 2024 समुपदेशनाची घोषणा झाल्यानंतर, वैद्यकीय समुपदेशन समितीच्या https://mcc.nic.in या वेबसाइटला भेट देऊन उमेदवारांना नोंदणी करावी लागेल. समुपदेशनाचे (NEET UG Counselling 2024) वेळापत्रकही या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. समुपदेशनाचा टप्पा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कळेल. याशिवाय, NEET समुपदेशनासाठी नोंदणी प्रक्रिया केव्हा सुरू होईल? समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी, चॉईस फाइलिंग आणि रिपोर्टिंगची प्रक्रिया केव्हा सुरू होईल? याची माहिती देखील उपलब्ध होईल.
NEET UG समुपदेशनासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी – (NEET UG Counselling 2024)
NEET UG समुपदेशन लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी आपली कागदपत्रे तयार ठेवायची आहेत. समुपदेशनादरम्यान कोणती कागदपत्रे आवश्यक असतील; त्याची यादी पुढे देत आहोत….
1. NEET UG 2024 प्रवेशपत्र
2. NEET UG 2024 स्कोअरकार्ड (पुनर्परीक्षार्थींसाठी सुधारित आवृत्तीसह)
3. दहावीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका (जन्म तारखेसाठी)
4. बारावीचे प्रमाणपत्र आणि मार्कशीट
5. 6 ते 8 पासपोर्ट साइज फोटो
6. तात्पुरते वाटप पत्र
7. पासपोर्ट आकाराचे सहा फोटो
8. फोटो आयडी पुरावा जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ.
9. शेवटच्या अटेंडंट संस्थेकडून चारित्र्य प्रमाणपत्र
10. स्थलांतर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
11. श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
12. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने NEET UG 2024 च्या समुपदेशनावर बंदी घालण्यास नकार दिला असला तरी, सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. अशा परिस्थितीत (NEET UG Counselling 2024) सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय येण्यापूर्वीच वैद्यकीय समुपदेशन समिती NEET समुपदेशनाची घोषणा करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंवा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ती दोन दिवस वाट पाहणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच एमसीसी समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. एमसीसीच्या वेबसाइटवर आतापर्यंत NEET UG 2024 समुपदेशनाशी संबंधित कोणतेही अपडेट आलेले नाही. वेबसाइटवर फक्त NEET MDS 2024 च्या समुपदेशनावर अपडेट आहे. एमडीएसच्या समुपदेशनाच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी सुरू झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com