NEET UG 2024 Syllabus : मेडिकल प्रवेश परीक्षा NEET UG चा नवीन अभ्यासक्रम जारी 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नीट पदवीधर 2024 परीक्षेसाठी (NEET UG 2024 Syllabus) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अभ्यासक्रम जाहीर केला आहे. अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड कडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर हा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे. पुढील वर्षी ५ मे २०२४ रोजी होणाऱ्या परीक्षेस हा अभ्यासक्रम असून नीट प्रश्नपत्रिकेचे दोन विभाग राहतील.

प्रश्नपत्रिकेचे दोन विभाग
एमबीबीएस (MBBS), बिडीएस (BDS) व इतर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे घेतली जाणारी ही सर्वात मोठी परीक्षा असते. यातील प्रश्नपत्रिकेच्या अ भागात ३५ तर ब भागात १५ प्रश्न असतील. पात्रता परीक्षेत उमेदवारांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयात किमान५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
पुढील वर्षी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करत असलेल्या NEET UG 2024 उमेदवारांसाठी ही महत्वाची माहिती आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे सरकारी आणि खाजगी वैद्यकीय, दंत, आयुष आणि नर्सिंग कॉलेजमध्ये (NEET UG 2024 Syllabus) आयोजित पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षा दिनदर्शिकेद्वारे एजन्सीने या प्रवेश परीक्षेची नियोजित तारीख 5 मे 2024 जाहीर केली होती. यानंतर आता नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) NEET UG 2024 चा अभ्यासक्रम जारी केला आहे.

NEET UG 2024 सुधारित अभ्यासक्रम राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान आयोगाने (NMC) जारी केला आहे. तत्पूर्वी, नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) UG 2024 साठी 5 मे ची नियोजित तारीख नुकत्याच जाहीर झालेल्या परीक्षा दिनदर्शिकेद्वारे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे जाहीर करण्यात आली होती. उमेदवार NMC च्या अधिकृत वेबसाइट nmc.org.in वरील सक्रिय लिंकवरून डाउनलोड करू शकतात.
NEET UG अभ्यासक्रम PDF या लिंक वरुन करा डाउनलोड
पुढील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षेच्या अधिकृत पोर्टल neet.nta.nic.in वरुन NEET UG अभ्यासक्रम 2024 PDF डाउनलोड करू शकतात. तसेच NMC चे अधिकृत पोर्टल nmc.org.in या वेबसाइटवरील सक्रिय लिंकवरून अभ्यासक्रम  डाउनलोड करू शकता.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात अधिसूचना जारी होवू शकते (NEET UG 2024 Syllabus)
NEET UG 2024 प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना जारी करणे आणि अर्ज प्रक्रिया सुरू होण्याच्या तारखा अद्याप NTA द्वारे घोषित केलेल्या नाहीत. एजन्सीने गेल्या वर्षी घेतलेल्या या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा नमुना पाहिल्यास, नियोजित परीक्षेच्या तारखेच्या 3 महिने आधी अधिसूचना जारी केली जाऊ शकते. या क्रमाने, NEET UG 2024 दि. 5 मे रोजी होणार आहे.  तेव्हा NTA मार्चच्या पहिल्या आठवड्यात NEET UG 2024 अधिसूचना जारी करू शकते. अधिसूचना जारी झाल्यानंतर neet.nta.nic.in या परीक्षा पोर्टलवर NEET UG 2024 साठी अर्ज देखील सुरू होतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com