नवी दिल्ली । नीट 2020 (NEET Result 2020) चा निकाल आज जाहीर झाला आहे. ओडिशाच्या शोएब आफताबने (Shoyeb Aftab) याने इतिहास रचत परीक्षेमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत. NEET Exam मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. (NEET 2020 Topper) यापूर्वी कोणालाही शंभर टक्के मार्क मिळवता आले नाहीत. शोएबने 720 पैकी 720 गुण मिळवले आहेत. तर मुलींमध्ये दिल्लीची आकांक्षा सिंग पहिली तर देशात दुसरी आली आहे. महाराष्ट्रतून आशिष जांते पहिला तर तो देशात 19 वा आला आहे.
यावर्षीचा नीट परीक्षेचा कट ऑफ मागील वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. यावर्षी जनरल कॅटेगरीसाठी 50 टक्के म्हणजे 720 पैकी 147 मार्क्सचा कटऑफ आहे. तर ओबीसी, एससी,एसटी कॅटेगरीसाठी हा कट ऑफ 40 टक्के म्हणजे 720 पैकी 113 मार्क्सचा असणार आहे. NEET Result 2020 मागील वर्षी हा जनरल कॅटेगरी साठी 720 पैकी 134 गुणांचा तर ओबीसी, एससी, एसटी कॅटेगरीसाठी कट ऑफ 720 पैकी 107 गुणांचा होता. यावर्षी एकूण 13,66,945 नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यापैकी 7,71,500 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर झाला आहे. निकाल NEET Result 2020 पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन आवश्यक आहे. नीट परीक्षेचा निकाल घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 12 ऑक्टोबर रोजी ट्वीट करत देखील माहिती दिली होती.
असा पाहा निकाल –
1) सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा.
2) यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3) आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा.
4) NEET Result 2020 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
5) आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल.
अधिकृत वेबसाईट – ntaneet.nic.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.