NEET PG 2024 : NEET PG परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार; सर्वोच्च न्यायालयाने सांगितले…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नीट पीजी (NEET PG) परीक्षेबाबत महत्वाची (NEET PG 2024) अपडेट हाती आली आहे. नीट पीजी परीक्षा ही येत्या रविवारी दि. ११ ऑगस्ट रोजी घ्यावी; असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. NEET PG 2024 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने NEET PG 2024 परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. याचा अर्थ NEET PG परीक्षा आधीच ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाईल. NEET PG परीक्षा दि. 11 ऑगस्ट 2024 (रविवार) रोजी होणार आहे.

NEET PG प्रकरणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले आहे?
NEET PG प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी हा निकाल दिला आहे. खंडपीठाने सांगितले की NEET PG परीक्षेच्या काही दिवस आधी ते पुढे ढकलण्याचे आदेश देऊ शकत नाही. ही याचिका विशाल सोरेन नावाच्या उमेदवाराने दाखल केली आहे. यामध्ये असे लिहिले होते की NEET PG उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागेल.

सर्वोच्च न्यायालयाने NEET PG प्रकरणी सुनावणी पूर्ण करताना म्हटले आहे की, आजकाल लोक फक्त परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करतात. पण आम्ही 5 याचिकाकर्त्यांसाठी 2 लाखांपेक्षा (NEET PG 2024) जास्त उमेदवारांशी खेळू शकत नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेची आधीच तयारी केली आहे आणि परीक्षेच्या २ दिवस आधी पुढे ढकलल्याने त्यांचा वेळ वाया जाईल. NEET PG 2024 परीक्षेशी संबंधित प्रत्येक तपशील nbe.edu.in आणि natboard.edu.in वर तपासला जाऊ शकतो.

170 शहरांमध्ये 416 केंद्रांवर होणार परीक्षा (NEET PG 2024)
NBEMS 11 ऑगस्ट 2024 रोजी देशातील 170 शहरांमध्ये स्थापन केलेल्या 416 केंद्रांवर NEET PG परीक्षा आयोजित करेल. NEET PG परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. यावर्षी NEET PG परीक्षेसाठी 2,28,542 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळाने NEET PG प्रवेशपत्र देखील जारी केले आहे. NEET PG परीक्षेस बसलेले सर्व उमेदवार NBEMS च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com